Success Story: इस्त्रोतील शास्त्रज्ञाची सोडली नोकरी आणि सुरू केला व्यवसाय! वर्षाला करतो 2 कोटींची कमाई, वाचा यशोगाथा

तामिळनाडू राज्यातील एका तरुणाची यशोगाथा पाहिली तर ती इतरांना प्रेरणा देणारी आहे.या तरुणाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात स्रोमधील शास्त्रज्ञाची नोकरी सोडली आणि एसटी कॅब्स नावाने स्वतःचा टॅक्सी व्यवसाय सुरू केला व त्या माध्यमातून तो आज दोन कोटी रुपयांची कमाई वर्षाला करत आहे.

Ajay Patil
Published:
success story

Success Story:- उच्च शिक्षण घेऊन सध्या अनेक बेरोजगार असलेले तरुण आपल्याला दिसून येतात. कारण सध्या मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीची समस्या निर्माण झालेली आहे. दरवर्षी विद्यापीठांमधून पदव्या घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे व त्यामानाने मात्र नोकऱ्यांची उपलब्धता खूपच कमी असल्याने दिवसेंदिवस बेरोजगारीच्या समस्याने उग्र स्वरूप धारण केलेले आहे.

परंतु समाजामध्ये आपल्याला काही उदाहरणे किंवा काही व्यक्ती असे दिसून येतात की त्यांच्याकडे प्रतिष्ठित अशा ठिकाणी नोकरी आहेत व पगार देखील लाखो रुपयात असताना मात्र त्यांनी नोकऱ्या सोडल्या व कुठल्यातरी व्यवसायात पडून यशस्वी होण्याची अवघड वाट साध्य करण्यात यश मिळवले.

तसे पाहायला गेले तर हातात असलेली गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून एखाद्या व्यवसायात पडणे म्हणजे स्वतःला एखाद्या मोठ्या संकटात गुंतवण्यासारखे असून अशा प्रकारचा निर्णय घेणे हे पाहिजे तेवढे सोपे काम नाही.

परंतु असे अनेक व्यक्ती आहेत की ते अशा प्रकारे स्वतःचा आयुष्याच्या मार्ग तयार करतात व त्यांच्या अतुलनीय अशा कामामुळे इतरांसाठी देखील प्रेरणादायी ठरतात.

याच मुद्द्याला धरून जर आपण तामिळनाडू राज्यातील एका तरुणाची यशोगाथा पाहिली तर ती इतरांना प्रेरणा देणारी आहे.या तरुणाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात स्रोमधील शास्त्रज्ञाची नोकरी सोडली आणि एसटी कॅब्स नावाने स्वतःचा टॅक्सी व्यवसाय सुरू केला व त्या माध्यमातून तो आज दोन कोटी रुपयांची कमाई वर्षाला करत आहे.

 उथया कुमारची प्रेरणादायी यशोगाथा

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तामिळनाडू राज्यातील एका छोट्या जिल्ह्यातील रहिवाशी असलेले उथया कुमार भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये  शास्त्रज्ञ म्हणून नोकरीला होते. परंतु या नोकरीमध्ये मन लागत नसल्याने त्यांनी या नोकरीला रामराम ठोकला आणि स्वतःचा एसटी कॅब्ज नावाने स्वतःचा टॅक्सी व्यवसाय सुरू केला.

साधारणपणे 2017 मध्ये उथया यांचे वडील सुकुमार आणि तुलसी यांना श्रद्धांजली म्हणून एसटी कॅब सुरू केली व आज त्यांच्या या व्यवसायाची वार्षिक उलाढाल दोन कोटी रुपये आहे. जर आपण त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली तर त्यांनी एम फिल पूर्ण केले आहे व इतकेच नाही तर स्टॅटिस्टिक्समध्ये  पीएचडी देखील केलेली आहे.

अशाप्रकारे उच्च शिक्षण घेऊन त्यांनी इसरोमध्ये स्वतःच्या स्वप्नातली नोकरी मिळवली व सात वर्ष भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये नोकरी केली. इतकेच नाहीतर एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून देखील त्यांनी काम केले व त्यानंतर स्वतःचा वेगळा मार्ग तयार करून व्यवसायाला सुरुवात केली.

2017 मध्ये त्यांनी एसटी कॅब नावाचा टॅक्सी व्यवसाय सुरू केला व आज त्यांच्याकडे या व्यवसायांतर्गत 37 कार असून यांच्या स्टार्टअपची वार्षिक कमाई दोन कोटी रुपये आहे.

उथया यांचे सामाजिक दृष्टिकोनातून काम देखील महत्त्वाचे असून ते स्थलांतरित कामगार असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी घरांची सुविधा देखील निर्माण करतात व त्याकरिता पैसे वाचवतात. इतकेच नाही तर त्यांनी त्यांच्या गावातील चार मुलांच्या शिक्षणाचा खर्च देखील उचलला असून अनेक प्रकारची विपरीत परिस्थिती व संकटांशी दोन हात करत उथया यांनी हा प्रवास यशस्वी केलेला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe