Success Story : गेल्या काही वर्षांपासून राज्यातील शेतकऱ्यांनी कमी कालावधीत आणि कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या भाजीपाला वर्गीय पिकांच्या शेतीवर अधिक जोर दिला आहे.
पुणे जिल्ह्यातील शेतकरी देखील मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकांची लागवड करत असतात. विशेष म्हणजे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कमी खर्चात चांगली कमाई देखील या पिकातून होत आहे.

पुरंदर तालुक्यातील साकुर्डे येथील हनुमंत काळे या शेतकऱ्याने देखील कारली या भाजीपाला पिकाच्या शेतीतून लाखोंची कमाई करून दाखवली आहे. काळे यांनी मात्र दहा गुंठ्यात कारले पिकाची शेती सुरू केली आणि यातून त्यांना दीड ते दोन लाखांची कमाई झाली आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ भागातील वाहतूककोंडी फुटणार, मुंबई महानगरपालिका विकसित करणार नवीन फ्लायओव्हर, पहा…..
कोणत्या जातीची केली होती लागवड?
काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी दहा गुंठ्यात ऋषाण जातीच्या कारल्याची लागवड केली. त्यांनी कारल्याच्या या जातीच्या बियाण्यांपासून 650 रोपांची निर्मिती केली. मग लागवड करण्यापूर्वी जमिनीची चांगली पूर्व मशागत करण्यात आली.
साडेसहा फूट अंतरावर बेड तयार केले. मग शेणखत आणि कोंबडी खत टाकले. मग मल्चिंग पेपर अंथरूण ठिबक सिंचन केले. त्यांनी साडेसहा बाय अडीच फूट अंतरावर या रोपांची लागवड केली.
जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी रोपांची लागवड केली आहे. त्यांनी मांडव पद्धतीने कारले पीक उत्पादीत केले आहे यामुळे त्यांना चांगले निरोगी आणि विक्रमी उत्पादन मिळतंय.
हे पण वाचा :- 10वी पास, ग्रॅज्युएट तरुणांसाठी आनंदाची बातमी ! सेंट्रल जीएसटी आणि कस्टम्स विभागात निघाली ‘या’ पदासाठी भरती, आजच करा अर्ज
त्यांनी जानेवारी महिन्याच्या शेवटी कारले रोपांची लागवड केली आणि तेथून दोन महिन्यानंतर यातून त्यांना उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली. सध्या दररोज 50 किलो कारल्याचे त्यांना उत्पादन मिळत आहे.
तिसऱ्या दिवशी तोडा होत असून एका तोड्यात दीडशे किलोचे उत्पादन हाती लागत आहे. अशा पद्धतीने त्यांना कारल्याच्या पिकातून जवळपास दीड ते दोन लाखांपर्यंतचे उत्पन्न मिळणार आहे.
केवळ दहा गुंठे जमिनीत दोन लाखांपर्यंतची कमाई होणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. यामुळे काळे यांचा हा प्रयोग इतरांसाठी मार्गदर्शक ठरेल यात तीळमात्र देखील शंका नाही.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! आता मुंबईहुन ‘या’ शहरा दरम्यान सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस, खासदार उदयनराजे यांनी घेतला पुढाकार