नांदेडच्या शेतकऱ्याचा नादखुळा ! कोरडवाहू जमिनीवर सुरू केली पेरूची शेती; एकरी 120 टन उत्पादनाची साधली किमया, बनला लखपती

Ajay Patil
Published:
success story

Success Story : शेती हा एक सर्वस्वी निसर्गावर आधारित व्यवसाय आहे. या व्यवसायात पदोपदी आव्हाने शेतकऱ्यांच्या पुढ्यात येत असतात. यामध्ये नैसर्गिक आव्हाने आहेत, तसेच शासनाचे कुचकामी धोरणे देखील शेतकऱ्यांसाठी मारक ठरत आहेत. अनेकदा शासनाकडून सामान्य जनतेसाठी आणि मध्यमवर्गीयांच्या हितासाठी असे काही निर्णय घेतले जातात जे बळीराजासाठी अतिशय घातक ठरतात आणि यामुळे शेतकऱ्यांना फटका बसतो.

शासनाच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारात अपेक्षित भाव मिळत नाही. तसेच व्यापाऱ्यांच्या मुजोरीपणामुळे देखील अनेकदा शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित अशी कमाई काढता येत नाही. मात्र शेतकऱ्याला राजाचा दर्जा दिला आहे ते फुकट नाही. बळीराजा याही संकटातून मार्ग काढतो आणि आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून त्याला राजा का म्हणतात हे वारंवार सिद्ध करून दाखवतो.

हे पण वाचा :- सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ विभागात शिपाई पदासाठी निघाली मोठी भरती; पगार मिळणार तब्बल 81 हजार, पहा कसा करायचा अर्ज

नांदेड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने देखील वेगवेगळ्या संकटांचा सामना करत कोरडवाहू जमिनीत आपल्या कष्टाच्या जोरावर, मनातील उत्तुंग इच्छाशक्तीच्या बळावर पेरूच्या बागेतून लाखो रुपयांची कमाई करत इतरांसाठी मार्गदर्शक काम केल आहे. खरं पाहता मराठवाडा म्हटलं की डोळ्यापुढे उभ राहत ते भयान दुष्काळाचे चित्र.

मात्र येथील शेतकऱ्यांनी आता दुष्काळावर कशी मात करायची हे तंत्र शिकून घेतलं असून दुष्काळामध्येच आता सुकाळाचं पीक येथे बहरु लागल आहे. अनिल हनुमंतराव इंगोले यांनी देखील दुष्काळावर मात करत आपल्या कोरडवाहू शेतजमिनीतून लाखोंची कमाई केली आहे. अनिल देगलूर तालुक्यातील मौजे माळेगाव मक्ता येथील रहिवासी शेतकरी. त्यांच्याकडे एकूण 22 एकर जमीन. पूर्वी ते आपल्या जमिनीवर इतर शेतकऱ्यांप्रमाणे पारंपारिक पिकांची शेती करत.

हे पण वाचा :- तलाठी भरतीबाबत महत्वाची बातमी! ‘या’ कारणामुळे भरती पडणार लांबणीवर; पहा केव्हा होणार तलाठी भरती?

मात्र पारंपारिक पिकांच्या शेतीतून त्यांना फारशी कमाई होत नव्हती. मग शेतीमध्ये बदल करायचा असा त्यांनी निर्णय घेतला आणि 20 एकरात पेरू आणि दोन एकरात सीताफळाची त्यांनी लागवड केली. यासाठी कृषी विभागाचा सल्ला घेतला आणि टप्प्याटप्प्याने या पिकांची लागवड करण्यात आली. त्यांची जमीन ही कोरडवाहू होती. यामुळे त्यांना अधिकची मेहनत घ्यावी लागली.

दरम्यान त्यांच्या मेहनतीला शासनाच्या योजनेची साथ लाभली. शासनाच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेतला फळबाग लागवड केली तसेच शासनाच्या सामूहिक शेततळे योजनेचा लाभ घेऊन सामूहिक शेततळे तयार केले. यामुळे पाण्याची शाश्वत उपलब्धता झाली आणि फळबागेतून आता त्यांना चांगली कमाई होऊ लागली आहे. सध्यास्थितीला ते या दोन्ही फळ पिकातून वर्षाकाठी वीस लाखांची कमाई करत आहेत.

हे पण वाचा :- उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ! अंगणवाडी भरतीला न्यायालयाची स्थगिती; पुन्हा होणार का भरती?, पहा

फळबाग सोबतच ते सोयाबीनची देखील शेती करतात. दरम्यान त्यांनी उत्पादित केलेला पेरू अन सीताफळ हा देशातील वेगवेगळ्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवला जातो. शेतमालाला चांगला दर्जा असल्याने बाजारात त्यांच्या मालाला कायमच भाव राहतो. मात्र असे असले तरी शेती करताना वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचे इंगोले नमूद करतात. ते सांगतात की, रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून सेंद्रिय खतांच्या वापरावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.

हेच कारण आहे की, त्यांना एकरी 125 क्विंटल पर्यंतचे पेरूचे उत्पादन मिळत आहे. निश्चितच मराठवाड्यातील या अवलिया शेतकऱ्याने शेतीमध्ये साधलेली ही किमया इतरांसाठी प्रेरक राहणार आहे. विशेषता तरुण शेतकऱ्यांसाठी ही कहाणी निश्चितच प्रेरणादायी ठरेल आणि भविष्यात इंगोले यांच्याप्रमाणे इतर प्रयोगशील शेतकरी देखील शेती व्यवसायातून चांगली कमाई करतील हीच आशा या निमित्ताने व्यक्त केली जात आहे.

हे पण वाचा :- तुमचा सिबिल स्कोर चुकलाय का? तक्रार करायचीय का? मग ‘या’ ठिकाणी सादर करा तक्रार

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe