Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ विभागात शिपाई पदासाठी निघाली मोठी भरती; पगार मिळणार तब्बल 81 हजार, पहा कसा करायचा अर्ज

Government Job Maharashtra : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आज आम्ही एक मोठी खुशखबर घेऊन हजर झालो आहोत. ED अर्थातच Directorate of Enforcement म्हणजे अंमलबजावणी संचालनालय या विभागात शिपाई आणि वरिष्ठ शिपाई या पदांच्या रिक्त जागेसाठी अधिसूचना नुकतीच काढण्यात आली आहे.

Government Job Maharashtra : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आज आम्ही एक मोठी खुशखबर घेऊन हजर झालो आहोत. ED अर्थातच Directorate of Enforcement म्हणजे अंमलबजावणी संचालनालय या विभागात शिपाई आणि वरिष्ठ शिपाई या पदांच्या रिक्त जागेसाठी अधिसूचना नुकतीच काढण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

24 मार्च 2023 रोजी या विभागाने अधिसूचना काढली असून या अधीसूचनेच्या माध्यमातून इच्छुक आणि पात्र उमेदवार यांना अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे. दरम्यान आज आपण या पदभरती संदर्भात सविस्तर माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा तपशीलवार प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- तलाठी भरतीबाबत महत्वाची बातमी! ‘या’ कारणामुळे भरती पडणार लांबणीवर; पहा केव्हा होणार तलाठी भरती?

कोणत्या आणि किती पदांसाठी आहे भरती?

शिपाई आणि वरिष्ठ शिपाई या रिक्त पदांच्या एकूण 104 जागा या विभागाच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

वयोमर्यादा

कमाल 56 वर्ष वय असलेला उमेदवारी यासाठी अर्ज करू शकणार आहे. वयोमर्यादेबाबत आणि शैक्षणिक पात्रते संदर्भात तसेच इतर माहिती जाणून घेण्यासाठी एकदा अधिसूचना वाचणे गरजेचे आहे. अधिसूचना जाणून घेण्यासाठी आपण ईडीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊ शकता.

enforcementdirectorate.gov.in हे इडीचे अधिकृत संकेतस्थळ असून या ठिकाणी गेल्यानंतर ड्रॉप डाऊन मेनू मध्ये Other या पर्यायावर क्लिक करायचे आहे. या ठिकाणी वेकेन्सी या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर आपल्यासमोर विभागात रिक्त असलेल्या सर्वच पदासंदर्भात माहिती उघडेल. PDF स्वरूपात ही माहिती आपल्याला मिळणार आहे. 

हे पण वाचा :- उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ! अंगणवाडी भरतीला न्यायालयाची स्थगिती; पुन्हा होणार का भरती?, पहा

अर्ज करण्याची पद्धत

यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सहसंचालक (स्थापना), अंमलबजावणी संचालनालय, ए-ब्लॉक, प्रवर्तन भवन, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम रोड, नवी दिल्ली 110011 या पत्त्यावर इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक

यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या पदभरतीसाठी प्राप्त झालेले अपात्र आणि अयोग्य अर्ज विचारात घेतले जाणार नाही. या पदभरती अंतर्गत जोपर्यंत रिक्त पदांची भरती होत नाही तोपर्यंत सादर केलेले अर्ज गृहीत धरले जाणार आहेत. तसेच नवीन अर्ज सादर करणे सुरूच राहणार आहे. प्रत्येक महिन्याच्या तीस तारखेपर्यंत जे र्ज सादर होतील त्यामध्ये पात्र उमेदवारांची निवड होईल आणि यानंतर राहिलेले अर्ज पुढील महिन्यात पुन्हा एकदा विचारात घेतले जातील.

किती मिळणार पगार

या पदभरती अंतर्गत वरिष्ठ शिपाई या पदासाठी Rs. 25,500/- ते Rs. 81,100/- दरमहा वेतन मिळेल. तसेच शिपाई या पदासाठी Rs. 21,700/- ते Rs. 69,100/- दरमहा वेतन मिळणार आहे. 

हे पण वाचा :- तुमचा सिबिल स्कोर चुकलाय का? तक्रार करायचीय का? मग ‘या’ ठिकाणी सादर करा तक्रार