Success Story:- समाजामध्ये बरेच व्यक्ती आपल्याला असे दिसून येतात की परिस्थिती प्रमाणापेक्षा जास्त बिकट असते. पण तरीदेखील असंख्य अडचणींवर मात करत असे व्यक्ती मार्ग काढत असतात व परिस्थिती बदलण्यासाठी झटत असतात. परिस्थितीला कवटाळून बसण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीत संधी शोधून टप्प्याटप्प्याने यशाकडे मार्गक्रमण करणे महत्त्वाच्या असते.
त्यातल्या त्यात स्पर्धा परीक्षांचा विचार केला तर कौटुंबिक हलाखीच्या परिस्थितीमध्ये अशा परीक्षेची तयारी करणे वाटते तितके सोपे काम नाही. त्यातल्या त्यात एखाद्या मुलीचे लग्न झाल्यानंतर अशा परीक्षांची तयारी करून यश मिळवणे हे खूप कठीण काम आहे. परंतु हे कठीण काम अखंड मेहनत आणि संघर्षाने पुनिता कुमारी यांनी करून दाखवले आहे. त्यांचे यशाची कहाणी आपण या लेखात बघणार आहोत.

पुनिता कुमारी यांचे अधिकारी पदाला गवसणी
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, बिहार राज्यातील सुपौल जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या पुनीता कुमारी यांनी बालपणापासून संघर्ष केला. जर त्यांची माहेरची कौटुंबिक परिस्थिती पाहिली तर त्यांचे वडील मजूर म्हणून काम करायचे व त्यांना पाच बहिणी होत्या. एवढा मोठा कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांच्या वडिलांच्या मजुरीवर कसाबसा पार पडत होता.
परंतु पुनिता या अगदी लहानपणापासून अभ्यासामध्ये अतिशय हुशार असल्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना देखील त्यांच्या आई वडिलांनी त्यांना शिकण्यासाठी खूप मोठे प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला. ते अभ्यासामध्ये हुशार असल्यामुळे त्यांना जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश मिळाला.
असेच दिवस जात असताना व आर्थिक परिस्थिती बेताची असताना अभ्यासात हुशार असल्यामुळे त्यांचा प्रवास सुरू होता. एवढेच नाही तर ते खेळामध्ये देखील अव्वल होते. त्यांच्या मनामध्ये होते की कितीही अडथळे आले तरी देखील शिक्षण पूर्ण करायचे व त्यांनी ते बारावी पर्यंत पूर्ण केले. परंतु बारावीनंतर त्यांचे लग्न झाले.
लग्नानंतरही तोच संघर्ष
पुनीता यांचे लग्न झाल्यानंतर सासरी देखील खूपच आर्थिक परिस्थिती बिकट होती व त्यामुळे लग्नानंतर संसाराचा गाडा हाकण्यात त्यांना खूप मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले व त्यांनी तो यशस्वीपणे हाकला. अडचणींचा पर्वत समोर उभा होता व यामधून ते मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होते.
या सगळ्या समस्यांमध्येच त्यांच्या पतीची नोकरी गेली व आर्थिक परिस्थिती आणखीनच खालावली. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये त्या दोन मुलांच्या आई झाल्या. हे सगळे सुरू असताना मात्र 2004 ला नशिबाने त्यांच्या पतीला पुन्हा नोकरी लागली. परंतु तरीदेखील यातून खर्च भागत नव्हता व आर्थिक अडचणी थांबत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी आता परीक्षांची तयारी करण्याचे ठरवले.
येथून अधिकारी पदाचा प्रवास झाला सुरू
बारावीनंतर अर्धवट सोडलेले शिक्षण पूर्ण करण्याचे त्यांनी ठरवले व लग्नानंतर तब्बल तेरा वर्षानंतर पदवी पूर्ण करण्यासाठी त्यांनी ऍडमिशन घेतले. शिक्षण करत असताना घरी आर्थिक हातभार लागावा म्हणून त्यांनी शाळेमध्ये एक नोकरी करण्याच्या ठरवली व नोकरी पत्करली. संसार सांभाळणे व अभ्यासाची तयारी अशा बिकट वाटेवर त्यांचा प्रवास सुरू होता.
सगळ्या कालावधीमध्ये मात्र त्यांचे वय 33 वर्षापर्यंत पोहोचले व सरकारी भरतीतील जे काही वय मर्यादा असते त्याच्या नियमानुसार त्या बऱ्याच स्पर्धा परीक्षांसाठी पात्र न होत्या. परंतु तरीदेखील त्यांनी मनाशी ठरवलेले ध्येय त्यांना शांत बसू देत नव्हते व त्यांनी भरती होण्यासाठी अनेक पर्याय शोधायला सुरुवात केली व या माध्यमातून बिहार पब्लिक सर्विस कमिशन अर्थात बीपीएससीची तयारी केली.
2018 मध्ये पुनिता कुमारी यांनी बीपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली व आज ते बिहारमध्ये सहाय्यक कर आयुक्त या पदावर नियुक्त आहेत. विशेष म्हणजे ही परीक्षा पास होण्याअगोदर त्यांनी उच्च न्यायालयात पॅरा ज्युडीशियरी परीक्षा देखील उत्तीर्ण केली होती व उच्च न्यायालयामध्ये त्यांनी या पदावर काम केले. लहानपणापासून असंख्य अडथळ्यांना तोंड देत व मोठ्या अडचणींवर मात करत त्यांनी परिस्थितीवर मात केली.













