Success Story: अतिशय साधी राहणीमान असलेल्या ही महिला आहे तब्बल 36 हजार कोटींची मालकीण! कोण आहेत राधा वेम्बू?

Ajay Patil
Published:
radha vembu

Success Story:- साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही संकल्पना खूप महत्त्वपूर्ण असून आपण अनेक यशस्वी व्यक्ती पाहिले तर त्यांचे राहणीमान आज देखील अगदी साधे अशा पद्धतीचे असते व ते आज देखील त्यांच्या श्रीमंतीचा कुठलाही प्रकारचा गाजावाजा करत नाहीत. परंतु अशा व्यक्तींची विचारसरणी ही अत्यंत उच्च दर्जाचे असते. याबाबतीत जर महिलांचा विचार केला तर आजपर्यंत चूल आणि मूल या संकल्पनेपलीकडे महिलांचे कर्तुत्व हे खूप मोठ्या प्रमाणावर विस्तारल्याचे आपण पाहत आहोत.

आज जीवनातील असे कुठलेही क्षेत्र नाही की त्यामध्ये महिला पुढे नाहीत. यशस्वी उद्योजिका तसेच वैमानिका पासून ते देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर देखील महिला तैनात आहेत. महिलांच्या बाबतीत जर साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणीचा विचार केला तर आपण सुधा मूर्ती यांचे उदाहरण घेऊ शकतो.

अगदी त्याच पद्धतीने एक भारतातील महत्त्वाचे नाव म्हणजे राधा वेम्बू हे होय. अत्यंत साधा पेहराव करणाऱ्या राधा वेम्बु यांच्याकडे जर कोणी पाहिले तर त्या अतिशय सर्वसाधारण महिला आहेत असं वाटते. परंतु जर त्यांचे कर्तृत्व आणि त्यांची संपत्ती पाहिले तर आपल्याला मोठा झटका बसेल अशा पद्धतीची आहे. राधा वेम्बु या आज 36 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीच्या मालकिन आहेत.

 राधा वेम्बु यांचा परिचय

राधा वेम्बू यांचा जन्म हा 1972 यावर्षी झाला व त्यांचे वडील हे मद्रास हायकोर्टामध्ये स्टेनोग्राफर म्हणून नोकरीला होते. राधा वेम्बू यांचा शैक्षणिक प्रवास पाहिला तर मद्रास आयआयटी मधून त्यांनी शिक्षण पूर्ण केले व पुढे इंडस्ट्रियल मॅनेजमेंट मध्ये देखील पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी 1996 यावर्षी त्यांचे दोन भाऊ म्हणजेच श्रीधर वेम्बू आणि शेखर वेम्बू यांना सोबत घेऊन ऍडव्हेंटनेट नावाची कंपनी सुरू केली व झोहो कॉर्प ही खाजगी आयटी कंपनी देखील या तिघांनी स्थापन केली.

या कंपनीमध्ये सर्वात जास्तीचा वाटा हा राधा यांच्या नावावर असून या सोबतच त्या जानकी हायटेक ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड या  शेतीशी संबंधित असलेल्या एनजीओमध्ये देखील डायरेक्टर असून रियल इस्टेट क्षेत्रातील जी काही हायलँड व्हॅली कार्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे

देखील त्या डायरेक्टर आहेत. त्यांना एक मुलगा आहे व त्यांची जर एकूण आजची संपत्ती पाहिली तर ती 36000 कोटी रुपयाची आहे. या संपत्तीसह राधा वेम्बू या भारतातील 100 सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत चाळीसाव्या क्रमांकावर आहेत. स्वतःच्या प्रयत्नांनी श्रीमंत झालेल्या भारतीय महिलांमध्ये त्यांना एक मानाचे स्थान आहे.

 कोणत्या क्षेत्रात काम करते राधा वेम्बु यांची झोहो कंपनी

झोहो ही एक सॉफ्टवेअर कंपनी असून ही कंपनी सॉफ्टवेअर सोल्युशन या क्षेत्रामध्ये काम करते. मागच्या आर्थिक वर्षात या कंपनीने सर्वात जास्त नफा कमवला होता व सर्वात जास्त नफा कमावणाऱ्या कंपन्यांच्या यादीमध्ये ही कंपनी अग्रस्थानी होती. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये या कंपनीने तब्बल 2749 कोटी रुपयांचा नफा कमवला होता.

यावरून आपल्याला दिसून येते की तुमची राहणीमान साधी जरी असली परंतु तुमचे विचार तसेच तुमचे कर्तुत्व उच्च दर्जाचे असेल तर तुम्ही जीवनामध्ये अफाट असे यश मिळवू शकतात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला कितीही जरी यश मिळाले तरी तुमचे पाय जमिनीवर असणे खूप गरजेचे असते हे राधा वेम्बू यांच्या उदाहरणावरून दिसून येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe