Success Story :- बरेच तरुण समाजामध्ये उच्चशिक्षित असतात परंतु ते एखाद्या व्यवसायामध्ये नशीब अजमावतात. नुसते नशिब आजमवण्यासाठी नाही तर अशा व्यवसायाची निवड करिअर म्हणून देखील करतात. परंतु उच्च शिक्षण घेऊन नोकरी न करता आणि नोकरीच्या संधी असलेले शिक्षण घेऊन देखील व्यवसायात पडणारे व्यक्ती खूपच कमी दिसतात. कारण कोणीही जीवन जगत असताना कसलाही बाबतीत धोका पत्करायला तयार नसतो.
परंतु काही तरुण असे असतात की ते उच्च शिक्षण तर घेतात परंतु एखाद्या व्यवसायांमध्ये पडतात. रिस्क है तो पैसा फिक्स है या उक्तीप्रमाणे ते वागतात आणि धाडसाने व्यवसायाला सुरुवात करतात. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण नांदेड मधील प्रज्ञानंद पोहोरे या तरुणाची यशोगाथा पाहिली तर काहीसे असेच कौतुकास्पद काम त्याने केले आहे. त्याचीच यशोगाथा आपण या लेखात पाहू.
प्रज्ञानंदने सुरू केला गांडूळ खत निर्मिती प्रकल्प
नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव या गावचा रहिवासी असलेल्या प्रज्ञानंद याने पिंपळाभत्या गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरू केला असून हा तरुण उच्चशिक्षित आहे व ऑनलाईन पद्धतीने बंगलोर येथे एका कंपनीच्या साठी नोकरी देखील करत आहे. नोकरी करत असताना रिकाम्या वेळेमध्ये काहीतरी व्यवसाय करावा या दृष्टिकोनातून त्याने गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरू केला.
याकरिता हरियाणा या ठिकाणहून ऑस्ट्रेलियन जातीचे गांडूळ आणले व या प्रकल्पातून तो आता गांडूळ खत व वर्मी वाश हे फवारणी औषध देखील तयार करत आहे. प्रज्ञानंद याच्या गांडूळ खत प्रकल्पावरून खताची विक्री आणि कीटकनाशकांचा नायनाट करण्याकरिता वर्मी वाश या फवारणी औषधाची देखील मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात आहे. या दोन्ही उत्पादनांच्या माध्यमातून प्रज्ञानंद हा लाखो रुपयांची कमाई करत असून जिल्ह्यामध्ये त्याचे कौतुक केले जात आहे.