युवा शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग..! काळे द्राक्ष लागवडीतून एकरी 10 लाखांचे उत्पन्न, परिसरात रंगली चर्चा

Ajay Patil
Published:

Successful Farmer : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आता शेतीमध्ये नाविन्यपूर्ण असा प्रयोग राबवत आहेत. विशेषता पीक पद्धतीत मोठा बदल केला जात आहे. नगदी तसेच फळबाग वर्गीय पिकांची मोठ्या प्रमाणात शेती केली जाऊ लागली आहे. अशातच आता मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातून युवा शेतकऱ्याचा अभिनव असा प्रयोग समोर येत आहे. खरं पाहता तालुक्यातील कडवंची हे गाव द्राक्ष उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो.

या गावात आत्तापर्यंत प्रयोगशील शेतकऱ्यांनी पिवळ्या द्राक्षाची शेती यशस्वी करून दाखवली. आता येथील शेतकऱ्यांनी काळ्या द्राक्षाची देखील लागवड यशस्वी केली असून लाखो रुपयांचे एकरी उत्पन्न कमवून दाखवले आहे. याच गावातील प्रयोगशील द्राक्ष उत्पादक शेतकरी विक्रम क्षीरसागर यांनी उत्पादित केलेल्या काळ्या द्राक्षेला अगदी सुरुवातीलाच तब्बल 121 रुपये प्रति किलो एवढा दर मिळाला आहे.

विक्रम क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावात शेकडो एकर शेत जमिनीवर काळ्या द्राक्षाची लागवड करण्यात आली आहे. येथील शेतकरी या द्राक्ष पिकातून चांगली कमाई करत आहेत. तसेच पिवळ्या द्राक्षाच्या उत्पादनाएवढाच काळ्या द्राक्षेला खर्च येत आहे. यामुळे गावातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी काळ्या द्राक्षाची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे.

दरवर्षी साधारणत: पस्तीस ते ऐंशी रुपयांपर्यंत विकले जाणारे द्राक्श यावर्षी सुरुवातीलाच चिखलीच्या व्यापाऱ्यांनी विक्रमी दरात खरेदी केले आहे. या व्यापाऱ्यांनी तब्बल १२१ रुपये किलो या दराने हे द्राक्ष खरेदी केले आहेत. यामुळे विक्रम क्षीरसागर यांना द्राक्ष पिकातून लाखोंची कमाई होणार आहे.

विक्रम यांच्या मते त्यांना एका एकरमध्ये जवळपास दहा टन द्राक्षाचे उत्पादन निघणार आहे. निश्चितच त्यांना जर एवढे उत्पादन मिळाले तर दहा लाख रुपयांचे उत्पन्न काळ्या द्राक्षतून त्यांना मिळणार आहे. निश्चितच, बदलत्या काळानुसार कोणत्याही व्यवसायात बदल करत राहणे अति आवश्यक आहे.

शेतीमध्ये देखील बदल करणे महत्त्वाचे ठरते. विक्रम यांनी देखील शेतीमध्ये असाच बदल केला असून आधी पिवळे द्राक्ष आणि नंतर काळे द्राक्ष यशस्वीरित्या उत्पादित करून लाखोंची कमाई केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe