हवामान बदलाचा असाही परिणाम

Published on -

Marathi News : सध्या चीनमध्ये एका २० वर्षीय विद्यार्थ्याची चर्चा सुरू आहे. पूर्व चीनच्या जियांगसू प्रांतात दुसर्‍या वर्षाला शिकणारा हा विद्यार्थी आपल्या वर्गातील सर्व मुलींच्या प्रेमात पडला आहे. त्याने सर्व मुलींना मागणी तर घातलीच,

पण त्यांच्यावर पैसेही लुटण्यास सुरुवात केली. लियू असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. फेब्रुवारी महिन्यात हा प्रकार उघडकीस आला होता. लियूला वाटले की तो विद्यापीठातील सर्वात देखणा मुलगा आहे आणि सर्व मुलींना तो आवडला.

हा अनुभव येताच त्याने सर्व मुलींना प्रपोजही करायला सुरुवात केली. हवे तेव्हा तो कुठल्याही मुलीकडे प्रपोज करण्यासाठी फुले आणि इतर भेटवस्तू घेऊन पोहोचायचा.

‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार, त्याने प्रत्येक मुलीला प्रपोज केले होते, मात्र, सर्व मुलींनी त्याला नकार दिला, पण त्यांनीही ते सकारात्मक अर्थाने घेतले आणि मुली लाजाळू असतात असे मानले, म्हणून त्या थेट बोलल्या नाहीत.

अशा तन्हेने सर्व मुलींना तो आवडतो असे त्याला वाटू लागले. हळूहळू त्याच्या स्वभावातही बदल होत गेला. त्याचा मूड स्विंग होऊ लागला. तो अनेकदा वर्गात गैरहजर असायचा आणि विनाकारण पैशांची उधळपट्टी करायचा.

अखेर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. तेव्हा त्याला त्याच्या या अवस्थेचे खरे कारण कळाले. काही काळ सातत्याने मानसोपचार आणि औषधे घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे.

लियू यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, फेब्रुवारी- मार्चमध्ये हवामान बदलते. यादरम्यान, शरीरातील अंतःस्रावी संप्रेरकांमध्ये चढ-उतार होतात, ज्यामुळे मेंदू असामान्य क्रिया करू लागतो.

जेव्हा या संप्रेरकाचा त्रास होतो, तेव्हा पुरुषामध्ये खूप उत्तेजना निर्माण होते, तो खूप बोलू लागतो आणि कधी कधी त्याला शारीरिक संबंध ठेवण्याची जबरदस्त इच्छा होऊ लागते. प्रकरण बिघडले तर अशी व्यक्ती इतरांवरही हल्ला करू शकते.

डॉक्टरांनी सांगितले की, काही लोकांमध्ये फेब्रुवारी-मार्चदरम्यान हवामानातील बदलामुळे अंतःस्रावी हार्मोन्सची समस्या उद्भवते. यामुळे त्यांना खूप ऊर्जावान आणि अतिसक्रिय वाटू लागते.

या आजाराला भ्रामक प्रेमविकार म्हणतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या आजारावर उपचार करण्यासाठी मानसोपचार आणि औषधांचा वापर केला जाऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News