Sujay Vikhe Patil News : गेली तीन-चार महिने सगळे आरोप सहन केलेत, सगळा गलिच्छपणा सहन केला, शांतचित्ताने बसून राहिलो. शांतचित्ताने बसून पारनेर वाल्याला कस गाडायचं तेही गाडल, तो ज्याच्या जीवावर उड्या मारत होता त्या संगमनेरवाल्याला पण गाडलं जे उरलेत त्यांचा आता नंतर हिशोब पाहू, असं म्हणतं सुजय विखे पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. ते जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विजयी सभेत बोलत होते. हम किसी का उधार नही रखते ! आज सगळ्यांचा हिशोब पूर्ण केल्यानंतरच सुजय विखे येथे आलेला आहे.
ज्या-ज्या लोकांनी हा चंग बांधला होता की विखे पाटील परिवाराचा नामोनिशान मिटवू त्या सगळ्यांना संपवल्यानंतर सुजय विखे पाटील स्टेजवर आलाय. अरे हे काही लुंग्यासुंग्याचं राजकारण नाही, सर्वसामान्य माणसाच्या जीवावर राजकारण करणारे आम्ही आहोत. ज्या लोकांना वाटत होत मी उगीच बोलू राहिलो पण त्या लोकांना आज कळलं ना की टायगर अभी जिंदा है ! सर्वसामान्य माणसाच्या आशीर्वादाने आज लागलेला हा निकाल त्या सगळ्या लोकांनाच चपराक आहे जे या ठिकाणी अपप्रचार करून, या ठिकाणी लोकांमध्ये गैरसमज पसरवून सर्व समाजामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करत होते.
आजचा हा विजय सर्वसामान्य माणसाचा आहे, आजचा हा विजय या मतदारसंघातील गोरगरीब युवकांचा आहे, आजचा हा विजय आमच्या लाडक्या बहिणींचा आहे. म्हणून मी आज नामदारसाहेबांना एक विनंती करेन की साहेब हा जो विजय आपल्याला मिळाला, ज्यामध्ये सगळ्यांचे कष्ट होते, प्रत्येक परिवाराचा सदस्य, प्रत्येक संस्था यामध्ये मी आवर्जून उल्लेख करेन प्रवराचे राजेंद्र विखे पाटील साहेबांचे देखील यामध्ये कष्ट होते.
जेव्हा परिवार एक असतो तेव्हा काय होते ते आजच्या निकालाने या ठिकाणी दाखवून दिलय. जस म्हटले ना एक है तो सेफ है! गेली तीन महिने किंबहुना चार महिने कसे गेले हे काही सांगू शकत नाही. सगळे आरोप सहन केलेत, सगळा गल्लीच्छपणा सहन केला, शांत चित्ताने बसून राहिलो. शांततेत बसून पारनेर वाल्याला कसं गाडायचं तेही गाडलं, तो ज्याच्या जीवावर उड्या मारत होता त्या संगमनेरवाल्याला पण गाडल. जे राहिलेत त्यांचा आता नंतर हिशोब पाहू. मला आनंद वाटतो की या संघर्षाच्या काळात आमच्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे लोक उभे राहिलेत.
आज माननीय शिवाजीराव कर्डिले साहेब सुद्धा आमदार झालेत याचा मला विशेष आनंद आहे. राहुरीवाल्यांना लय पुळका आला होता लोकसभेला. त्यांना सांगितलं होतं नाद करू नका पण त्यांना वाटतं हे पोरगं असंच वायफट आहे….. पण, त्यांना 35 हजारांनी गाडून टाकलं. आज या विजयाने फक्त शिर्डीचा विजय नाही, संगमनेरचा निकाल, पारनेरचा निकाल, राहुरीचा निकाल, नेवासाचा निकाल….साहेब जे अश्रू सगळ्यांनी वाहिले होते त्याचे फळ परमेश्वराने दिले.
आज कैलासवाशी बाळासाहेब विखे पाटील यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण झालं, जिल्हा परत विखे पाटील यांच्या ताब्यात आला. अनेकजण या ठिकाणी गद्दार निघालेत, सगळ्यांचे व्हिडिओ आहेत, सगळ्याचे फोटो पण आहेत. मी या शिर्डी मतदारसंघातील गद्दारांना सांगतो फक्त एक वर्ष लागेल तुमच्या खुट्ट्या नाही उपटल्या तर नावाचा सुजय विखे पाटील नाही. सगळ्यांचं सहन केलं, मी 23 तारखेपर्यंत गप्प राहिलो. पण आता गप्प राहणार नाही. ज्यांना संदेश जायचा होता तो गेला.
आम्ही दोन पावले पुढे जात पुढाकार घेतला पण ज्या लोकांना तो पुढाकार समजला नाही त्यांना जशास तसे उत्तर मिळेल. आज तुमचा सगळ्यांचा हिशोब सुजय विखेंच्या माध्यमातून या जिल्ह्यात पूर्ण झाला. आज सगळ्यांना गाडून एक नवीन सूर्य उदय होणार आहे. यापुढे या जिल्ह्यात हे जे गवत होतं ते परत उगणार नाही, हे आज उखडून फेकलेत ते परत उगू द्यायचे नाही. जोपर्यंत आपण लोणीमधून एक आहोत, प्रवरा परिसरातून एक आहोत, शिर्डी विधानसभामधून एक आहोत कोई माईका लाल हमारा बाल भी बांका नही कर सकता! आज मी परत म्हणतो नामदार ते नामदारच राहणार.
आज मी तुम्हाला सांगतो सामान्य माणसाला सुजय विखे पाटलाकडे येण्यासाठी कुठल्याही पुढार्याची गरज पडणार नाही. तुम्ही सगळेजण आमदार आहात, सगळेजण मंत्री आहात, सगळेजण खासदार आहात. यापुढे मतदारसंघात कोणीच पुढारी नाही फक्त साहेब आणि तुम्ही, मध्यस्थी संपल्या, सगळ्यांचे दुकाने बंद. साहेब आता गाडीमध्ये कोणाला बसवायचं नाही या बसवणाऱ्यांनी आपला कार्यक्रम लावला होता, पण या ठिकाणी सामान्य माणसांनी आपल्याला वाचवलं, अशा शब्दात विखे पाटील यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
पुढे बोलताना सुजय विखे पाटील यांनी सर्वसामान्य माणसाचा विखे पाटलावर अधिकार आहे. जो अधिकार मोठ्या माणसाचा आहे तोच अधिकार सर्वसामान्य माणसाचा आहे. कारण की आज जो विखे पाटील परिवार उभा आहे तो समोर बसलेल्या तमाम सर्वसामान्य जनतेमुळे उभा आहे. हा आशीर्वाद, ही ताकद जेवढ्या कष्टाने आपण उभी केली अपेक्षा अधिक काय पाहिजे. उद्या मी 42 वर्षांचा होईन आणि तुम्ही मला माझ्या वाढदिवसाचे सगळ्यात मोठे गिफ्ट दिलं म्हणून मी तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो.
या ठिकाणी आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात आपल्या सगळ्यांचे आभार. उद्या सकाळी 9 ते 2 मी ऑफिसला राहील, ज्यांना कुणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत ते तिथे येऊ शकतात. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे कुणाकडेही आपल्यामधल्या काही लोकांनी गद्दारी केल्याचा पुरावा असेल…. मला तर माहीतच आहे, सावळी बुद्रुक ते जोरणपर्यंत सगळा हिशोब मी येता-येता काढलाय. तरीसुद्धा तुम्ही आपल्या लोकांच्या गद्दारीचा पुरावा देऊ शकलात तर ती मला वाढदिवसाची सगळ्यात मोठी भेट ठरणार आहे.
आता या पुढील वर्षभरामध्ये ही घाण काढायची आहे. पहिले पद घेतात, पोरांना नोकरी लावून घेतात आणि आपल्याबद्दल वाईट बोलतात असे हे लोक आपण ठेवलेत. साहेब हा तुमचा दोष आहे, हे मी ओपनली सांगतो आता या लोकांना तुम्ही मागे ठेवा तुमच्या स्वभावाचा या लोकांनी फायदा घेतलाय. यांनी बंगले बांधलेत, घरे बांधलेत पण हे आपल्या मागे उभे राहिले नाहीत. गरीब माणूस आपल्या मागे राहिला आणि हा विजय गरीबाचाच आहे.
यापुढे विधानसभेत साहेबांचे काही होणार नाही जे सुजय विखे पाटील सांगेल तेच होणार. हे पण तुम्हाला सांगतो यापुढे हे गद्दार लोक सोडले जाणार नाहीत. ज्यांनी गद्दाऱ्या केल्यात त्या गद्दारांना क्षमा नाही. गरिबांना आपण पुढे आणू, नवी ताकद देऊ, उमेद देऊ. कोणाला वाटत असेल आमच्या शिवाय होणार नाही हे विसरून गेलेत. तर मी सांगतो नामदार साहेब ज्याच्या डोक्यावर हात ठेवतील तोच या मतदारसंघांमध्ये निवडून येणार.
आपल्याला आता नवीन दृष्टिकोनातून एक सकारात्मक बदल मतदारसंघात करायचा आहे. कृपया करून पुढच्या एका आठवड्यामध्ये सगळ्या गद्दारांचे पुरावे माझ्याकडे आणून द्या, माझी हात जोडून विनंती आहे कोणीही गद्दारी केली असेल त्या गद्दाराचे पुरावे एकदा आणून द्या. एवढे मोठे उधळून टाकले तर बाकीच्यांचे काय ? असं म्हणत सुजय विखे पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विजयी सभेतून अनेकांवर निशाणा साधलाय.