तरुणांसाठी आनंदाची बातमी ! तलाठी भरती निघाली; 4625 रिक्त तलाठ्यांची पदे भरली जाणार, केव्हा होणार परीक्षा? वाचा….

Talathi Bharati 2023 : महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या नवयुवक तरुणांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर येत आहे. विशेषता जे तरुण तलाठी भरतीसाठी तयारी करत आहेत अशा तरुणांसाठी ही एक आनंदाची पर्वणी राहणार आहे.

कारण की, बहुचर्चित तलाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. राज्य शासनाकडून 4625 रिक्त तलाठ्यांची पदे भरण्यासाठी नुकतीच अधिसूचना निर्गमित करण्यात केली आहे. महसूल व वन विभागाने याचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.

यानुसार 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान तलाठी भरतीची परीक्षा घेतली जाणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की राज्यातील सर्व 36 जिल्ह्यात या पदासाठी ऑनलाइन परीक्षा आयोजित केली जाणार आहे.

यासाठीची जाहिरात निर्गमित झाली असून गेल्या अनेक दिवसांपासून ज्या तलाठी भरतीची आतुरतेने वाट पाहिली जात होती ती तलाठी भरतीची परीक्षा आता 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर या काळात घेतली जाणार आहे. यामुळे स्पर्धा परीक्षेची विशेषता तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही निश्चितच एक आनंदाची बातमी राहणार आहे.

हे पण वाचा :- ‘या’ जिल्ह्यात आगामी दोन दिवस वादळी पाऊस पडणार ! भारतीय हवामान विभागाचा इशारा

प्रत्येक जिल्ह्याची स्वातंत्र निवड यादी प्रसिद्ध होणार

ही तलाठी भरती जरी राज्यस्तरावरून आयोजित करण्यात आली असली तरी देखील या तलाठी भरतीमध्ये प्रत्येक जिल्ह्याची स्वातंत्र्य निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. म्हणजे उमेदवारास मिळालेले गुण त्याने अर्ज केलेल्या जिल्ह्याकरताच विचारात घेतले जातील. त्याचा अन्य जिल्ह्यातील निवड यादीशी कोणताही संबंध असणार नाही.

किती पदासाठी होणार भरती?

राज्यातील 4625 रिक्त तलाठ्यांची पदे या पदभरतीच्या माध्यमातून भरली जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा किमान पदवीधर असावा. शैक्षणिक पात्रते संदर्भात इतर सर्व आवश्यक माहिती जाणून घेण्यासाठी मात्र एकदा अधिसूचना वाचणे जरुरीचे आहे.

हे पण वाचा :- विविध शेती कामे करण्यासाठी ‘हा’ ट्रॅक्टर ठरणार वरदान ! किंमतही आहे परवडणारी, वाचा….

वयोमर्यादा

खुला प्रवर्ग : 18 ते 38 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र राहतील.

मागासवर्गीय प्रवर्ग : 18 ते 43 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत.

अर्ज कसा करावा लागणार

यासाठी ऑनलाईन पद्धतीने इच्छुक उमेदवारांना अर्ज सादर करता येणार आहेत. mahabhumi या संकेतस्थळावर जाऊन इच्छुक उमेदवारांना आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करता येणार आहे.

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक

अद्याप यासंदर्भात कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही.

जाहिरात कुठे पाहता येणार

या भरतीची सध्या फक्त प्रारूप जाहिरात शासनाच्या महसूल व वन विभागाकडून काढण्यात आली आहे. https://drive.google.com/file/d/1a9qKkfEWSyfiKvFHwD-DMkwJ0nyQ0f0D/view?usp=drivesdk या लिंक वर जाऊन मात्र या पदभरतीची प्रारूप जाहिरात पाहता येणार आहे. 

हे पण वाचा :- पंजाब डख सुधारित मान्सून अंदाज 2023 : 3 जून पासून मुसळधार पावसाला सुरुवात होणार ; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात कोसळणार धो-धो पाऊस !