Talathi Bharati Maharashtra 2023 : राज्यातील लाखो उमेदवार तलाठी भरतीची वाट पाहत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून तलाठी भरती संदर्भात वेगवेगळ्या चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये पहावयास मिळत आहेत. उमेदवारांकडून देखील तलाठी भरतीसाठी तयारी जोरात सुरू आहे. दरम्यान आता तलाठी भरती बाबत एक मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा तलाठी भरती लांबणीवर पडणार आहे. खरं पाहता राज्यातील लाखो नवयुवक तरुण तलाठी भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत. राज्यात जवळपास साडेचार हजार तलाठ्यांची रिक्त पदे असून ही पदे लवकरात लवकर भरण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. खरं पाहता, राज्यातील 36 जिल्ह्यात तलाठ्यांची रिक्त पदे आहेत.

यामध्ये 11 आदिवासीबहुल जिल्ह्यांचा देखील समावेश आहे. दरम्यान आता या आदिवासीबहुल जिल्ह्यांमुळे तलाठी पद भरती लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यपालांनी 2019 मध्ये आदिवासी बहुल जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील बिंदू नामावलीनुसार पदभरतीबाबत शासनाला आदेश दिले होते.
हे पण वाचा :- उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ! अंगणवाडी भरतीला न्यायालयाची स्थगिती; पुन्हा होणार का भरती?, पहा
यानुसार आता 11 आदिवासी जिल्ह्यांतील पेसा क्षेत्राची कोणती लोकसंख्या धरायची याची बिंदू नामावली काढण्यासाठी राज्य शासनाने मार्गदर्शन मागविले आहे. यामुळे 36 जिल्ह्यातील साडेचार हजाराहून अधिक तलाठ्यांचे रिक्त पदे भरण्यासाठी ची भरती पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान राज्यपालांच्या 2019 मध्ये काढण्यात आलेल्या आदेशाचा विचार करून महाराष्ट्र राज्य शासनाने पेसाबाबत गेल्या महिन्यात अध्यादेश काढला आहे. या आदेशानुसार आता पेसाबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. या पेसा बिंदु नामावलीमध्ये काही दुरुस्त्या आहेत का? तसेच पेसा बिंदु नामावलीप्रमाणे रिक्त पदे किती आहेत. या रिक्तपदांमध्येही आदिवासी आणि बिगर आदिवासी यांचे प्रमाण किती आणि कसे आहे.
याबाबत शासनाकडून माहिती, मार्गदर्शन मागविण्यात आली आहे. दरम्यान विभागीय आयुक्तालयाकडे यासंदर्भातील निर्णय प्रलंबित आहे. हा निर्णय तसेच मार्गदर्शन प्राप्त होईपर्यंत आता तलाठी पदभरती होणार नसल्याचे चित्र आहे. हा निर्णय किंवा मार्गदर्शन प्राप्त झालं की, आदिवासी व बिगर आदिवासी यांची पदे अंतिम केली जाणार आहेत.
हे पण वाचा :- तुमचा सिबिल स्कोर चुकलाय का? तक्रार करायचीय का? मग ‘या’ ठिकाणी सादर करा तक्रार
यानंतर मग तलाठी भरती होईल असं सांगितलं जात आहे. एकंदरीत तलाठी भरती आता पुन्हा एकदा लांबणीवर पडली असून लाखो तलाठी भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या आशेवर पाणी फेरले आहे. आता या तलाठी पदभरती संदर्भात उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था असून वेगवेगळे तर्क वितर्क देखील लावले जात आहेत. यामुळे तलाठी भरती नेमकी केव्हा होते हाच मोठा प्रश्न उमेदवारांना भेडसावत आहे.
दरम्यान अतिरिक्त आयुक्त भूमीअभिलेख विभाग यांनी दिलेल्या माहितीनुसार तलाठी पदभरती अंतर्गत होणाऱ्या परीक्षेसाठी टीसीएस कंपनी सोबत चर्चा सुरू आहे. हा या कंपनीसोबत प्राथमिक स्तरावर चर्चा झाली असून कंपनीशी सामंजस्य करार झाला की पुढील कारवाई सुरू केली जाणार आहे. एकंदरीत भरतीसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून तयारी सुरू आहे.
मात्र, राज्यपालांनी 2019 मध्ये काढलेल्या एका आदेशाचे पालन करण्यासाठी मार्गदर्शन राज्य शासनाकडून मागविण्यात आले असून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच तलाठी भरती होईल आणि लाखो उमेदवारांचे यामुळे स्वप्न पूर्ण होईल.
हे पण वाचा :- पंजाबराव डख यांचा मोठा दावा; यंदा ‘या’ भागात महापूर येणार, पहा आणखी काय म्हटले डख