Tata च्या ‘या’ नव्या इलेक्ट्रिक कारला मिळाली फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग ! एकदा चार्ज केली की 600 किमी पर्यंत धावणार, पहा डिटेल्स

नव्याने कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात का? मग तुमच्यासाठी टाटा कंपनीची अलीकडेच लॉन्च झालेली हॅरियर ईव्ही हा एक बेस्ट ऑप्शन राहू शकतो. दरम्यान टाटा कंपनीच्या या एसयूव्ही बाबत नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे.

Updated on -

Tata Harrier EV Crash Test : टाटा मोटर्स ही देशातील एक दिग्गज ऑटो कंपनी. या कंपनीचा इलेक्ट्रिक सेगमेंट चा पोर्टफोलिओ हा फारच स्ट्रॉंग आहे. दरम्यान कंपनीने अलीकडेच बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक एसयूव्ही हॅरियर ईव्ही लाँच केली आहे. ही गाडी लॉन्च झाल्यापासूनच चर्चेत आहे.

ही गाडी लॉन्च झाल्यानंतर टाटा कंपनीचा इलेक्ट्रिक सेगमेंटचा पोर्टफोलिओ आणखी मजबूत झाला आहे. तर दुसरीकडे आता या SUV ला फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग देण्यात आली आहे. प्रौढ आणि मुलांच्या सुरक्षेसाठीच्या क्रॅश टेस्टमध्ये भारत एनसीएपीने टाटा हॅरियर ईव्हीला 5-स्टार रेटिंग दिली आहे.

यामुळे जर तुम्हाला सेफ्टी एसयुव्ही कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी टाटा कंपनीची ही इलेक्ट्रिक कार एक बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रौढ लोकांच्या सुरक्षेमध्ये टाटा हॅरियर ईव्हीने 32 पैकी 32 गुण मिळवले आहेत.

तर मुलांच्या सुरक्षेसाठी हॅरियर ईव्हीने 49 पैकी 45 गुण मिळवले आहेत. याशिवाय फ्रंटल आणि साइड इम्पॅक्ट टेस्टमध्ये हॅरियर ईव्हीने 16 पैकी 16 गुण मिळवले आहेत. दरम्यान आता आपण या कारच्या NACP क्रॅश टेस्टिंग बाबत माहिती पाहणार आहोत. 

टाटा हॅरियर ईव्हीला भारत एनसीएपी क्रॅश टेस्टिंग मध्ये मिळाली 5 स्टार रेटिंग

दोन दिवसांपूर्वी टाटा मोटर्सने हॅरियर ईव्हीच्या सर्व आरडब्ल्यूडी प्रकारांच्या किंमती जाहीर केल्या होत्या आणि आता भारत एनसीएपीचे हॅरियर ईव्हीच्या क्रॅश टेस्टिंगचे रिजल्ट समोर आले आहेत. टाटा मोटर्स वाहन सुरक्षेसाठी विशेष ओळखली जाते. दरम्यान हॅरियर ईव्हीने भारत एनसीएपी क्रॅश टेस्टिंगमध्ये 5 स्टार रेटिंग मिळवून हीच गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

टाटा मोटर्स म्हणजे सुरक्षेच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज हे पुन्हा एकदा सिद्ध झाल आहे. खरेतर, हॅरियर ईव्ही ही कंपनीची प्रमुख इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. महत्त्वाचे म्हणजे सुरक्षेच्या बाबतीत या कारने कोणतीच कसर सोडलेली नाही. acti.ev प्लॅटफॉर्मवर स्थित, हॅरियर ईव्ही ही पूर्णतः सुरक्षित कार असल्याचे या चाचणीतून सिद्ध झाले आहे.

भारत एनसीएपीने जाहीर केले आहे की, टेस्टिंग केलेले व्हेरिएंट हॅरियर ईव्ही एम्पॉवर्ड 75 केडब्ल्यूएच आणि एम्पॉवर्ड 75 केडब्ल्यूएच एडब्ल्यूडी (टाटा नुसार क्यूडब्ल्यूडी) होते. ही एक दोन रो असणारी एसयूव्ही आहे ज्यामध्ये जास्तीत जास्त पाच प्रवासी बसू शकतात. क्रॅश टेस्ट केलेल्या वाहनाचे वजन 2 हजार 574 किलोग्रॅम होते. 

भारत NACP ची रेटिंग काय सांगते?

रेटिंगबद्दल बोलायचे झाले तर, हॅरियर ईव्हीने प्रौढ प्रवासी संरक्षण आणि बाल प्रवासी संरक्षण या दोन्ही चाचण्यांमध्ये 5 स्टार रेटिंग मिळवले आहे. अलीकडेच लॉन्च झालेल्या हॅरियर ईव्हीमध्ये फ्रंट आणि साइड एअरबॅग्जसह ईएससी (इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल), सर्व सीटवर सीट बेल्ट रिमाइंडर्स, फ्रंट सीटवर बेल्ट प्रीटेन्शनर्स आणि लोड लिमिटर्स आणि मागील बाजूस ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स देण्यात आले आहेत. 

प्रौढ प्रवाशांच्या संरक्षण चाचण्यांमध्ये, हॅरियर ईव्हीने 32 पैकी 32 गुण मिळवलेले आहेत, कारण तिने फ्रंटल ऑफसेट डिफॉर्मेबल बॅरियर टेस्ट आणि साइड मूव्हेबल डिफॉर्मेबल बॅरियर टेस्ट दोन्हीमध्ये 16 पैकी 16 गुण मिळवले. समोरच्या सीटवर बसलेल्या ह्यूमन बॉडीच्या सर्व मूल्यांकन बिंदूंनी ग्रीन झोनसह ‘चांगले’ संरक्षण दाखवले आहे. 

भारत NCAP च्या चाइल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शन टेस्टमध्ये, हॅरियर ईव्हीने 49 पैकी तब्बल 45 गुण मिळवले आहेत कारण डायनॅमिक स्कोअरमध्ये या गाडीला 24 पैकी 24 गुण देण्यात आले आहेत, तसेच सीआरएस इंस्टॉलेशन स्कोअरमध्ये या गाडीला 12 पैकी 12 गुण मिळाले आहेत  आणि व्हेईकल असेसमेंट स्कोअरमध्ये 13 पैकी 9 गुण मिळाले आहेत.

दरम्यान, कंपनीचा असा दावा आहे की ही इलेक्ट्रिक व्हेईकल एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल सहाशे किलोमीटरची रेंज देण्यास सक्षम आहे. म्हणजेच चांगली ड्रायव्हिंग रेंज देण्यासोबतच ही गाडी पूर्णपणे सुरक्षित सुद्धा आहे. यामुळे ग्राहक या गाडीला चांगला प्रतिसाद दाखवतील असा विश्वास कंपनीने व्यक्त केलाय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!