Tata News : भारत ही वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था, देशाची अर्थव्यवस्था सध्या जगात चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून ओळखले जाते. महत्त्वाची बाब म्हणजे येत्या काळात भारत चीन आणि अमेरिका सारख्या देशांना सुद्धा याबाबतीत टक्कर देण्याच्या तयारीत आहे.
अर्थतज्ज्ञांनी भारत लवकरच आणखी मोठी अर्थव्यवस्था बनणार असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र ही गोष्ट भारतासाठी आशादायी असली तरी देखील देशात असणारे बेरोजगारीचे प्रमाण नक्कीच मोठे चिंताजनक आहे.

दरम्यान बेरोजगारीने ग्रस्त सर्वसामान्य तरुण वर्गासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे टाटा समूहाच्या एका बड्या कंपनीकडून लवकर देशातील सर्वाधिक मोठा कारखाना उभारला जाणार आहे आणि यामुळे हजारो हातांना काम मिळणार आहे.
हजारो नवयुवक तरुणांना टाटा समूहाच्या या मोठ्या इन्वेस्टमेंट मुळे रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. खरे तर भारतात पारंपारिक ऊर्जा ऐवजी आता हरित ऊर्जेला अधिक महत्त्व प्राप्त होत आहे. देशात सौर ऊर्जेचा वापर गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
स्वतः शासन सुद्धा सौर ऊर्जेच्या उत्पादनाला आणि वापराला प्रोत्साहन देत आहे आणि ही गोष्ट सौरऊर्जेच्या वापर वाढीमागे महत्त्वाची भूमिका निभावत आहे. आता भारत सौर ऊर्जेच्या क्षेत्रात स्वावलंबी बनू पाहत असून याच पार्श्वभूमीवर आता टाटा समूहाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
टाटा समूहाच्या टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी कंपनीकडून देशातील सर्वाधिक मोठा कारखाना उभारला जाणार आहे. दरम्यान आज आपण या कंपनीच्या या प्रकल्पाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
टाटा समूह कुठे उभारणार सर्वाधिक मोठा कारखाना
देशातील हा सर्वात मोठा कारखाना आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात उभारला जाणार आहे. येथे 10 गीगावॉट क्षमतेचा ‘इनगॉट आणि वेफर’ निर्मितीचा मेगा प्रकल्प कंपनीकडून विकसित होणार असून यामुळे हजारो लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अशा प्रकारचा हा देशातील सर्वाधिक मोठा कारखाना ठरणार आहे. यासाठी जवळपास 6700 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार अशी पण माहिती समोर आली आहे.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सौर सेल आणि मॉड्यूल तयार करण्यासाठी ‘इनगॉट’ आणि ‘वेफर’ हे कंपोनेंट अति आवश्यक असतात. या गोष्टी शिवाय सौर सेल आणि मॉड्यूल तयार होऊ शकत नाही.
मात्र हे जे रॉ मटेरियल आहे सध्या स्थितीला हे रॉ मटेरियल चीनमधून मोठ्या प्रमाणात आयात केले जात आहे. पण जर टाटा समूहाचा हा कारखाना सुरू झाला तर चीनवरील अवलंबित्व कमी होणार आहेत.
हा कारखाना केंद्र शासनाच्या मेक इन इंडिया धोरणाला आणखी बळ देणारा ठरणार आहे. सौर ऊर्जेच्या सुट्या भागांसाठी चायना वरील अवलंबित्व यामुळे नक्कीच कमी होणार आहे.
प्रकल्पाला मिळाली मंजुरी?
खरे तर टाटा समूहाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आंध्रप्रदेश सरकारची मंजुरी सुद्धा मिळालेली आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखालील स्टेट इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डकडून या प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. यासाठी इफको किसान सेझमध्ये 200 एकर जमीन सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दरम्यान उपलब्ध जमिनीपैकी 120 एकर जमिनीवर हा प्रकल्प उभा राहणार आहे. या प्रकल्पामुळे थेट 1000 लोकांना रोजगार मिळणार अशी माहिती दिली जात असून अप्रत्यक्षरीत्या अनेक जण या कारखान्यामुळे आपली उपजीविका भागवू शकणार आहेत.
विशेष म्हणजे या कंपनीला जी वीज लागणार आहे ती पण सौर ऊर्जेतूनच घेतली जाणार असून यासाठी 200 मेगावॉटचा प्रकल्प उभारला जाईल आणि या प्रकल्पासाठी पण सरकार जागा उपलब्ध करून देणार आहे.
गेल्यावर्षी टाटा समूहाच्या टाटा पावर आणि आंध्र प्रदेश राज्य सरकारमध्ये 49 हजार कोटी रुपयांचा अक्षय ऊर्जा प्रकल्पांसाठी सामंजस्य करार झाला होता. याच करारानुसार आता टाटा पावर कडून इथे हा भारतातील सर्वाधिक मोठा कारखाना उभा राहणार आहे.













