Discount Offer On Tata Electric SUV:- सणासुदीचा कालावधीमध्ये आपण बघितले की बऱ्याच कंपन्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कार खरेदीवर भरघोस असा डिस्काउंट ऑफर केला होता व आता या नवीन वर्षाच्या सुरुवातीला देखील काही महत्त्वाच्या कंपन्यांच्या माध्यमातून कार खरेदीवर डिस्काउंट ऑफर करण्यात आलेला आहे.
जर आपण भारतातील प्रमुख कार उत्पादक कंपनी पाहिली तर ती म्हणजे टाटा मोटर्स होय. टाटा मोटर्सने देखील नवीन वर्ष 2025 च्या सुरुवातीला ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे व ही भेट म्हणजे या कंपनीने त्यांच्या प्रसिद्ध असलेल्या इलेक्ट्रिक एसयूव्ही टाटा पंच ईव्ही आणि टाटा टियागो ईव्ही या दोन कारवर डिस्काउंट ऑफर जारी केलेला आहे.
या दोन्ही कारवर जे काही सवलत देण्यात येत आहे ती त्या कारच्या व्हेरियंटवर अवलंबून असणार आहे व दोन भागांमध्ये त्याला विभागले गेले आहे. या दोन भागांच्या दृष्टिकोनातून बघितले तर यातील पहिला भाग म्हणजे एक्सचेंज किंवा स्क्रॅपिंग बेनिफिट आणि दुसरा म्हणजे ग्रीन बोनस होय.
टाटाच्या या दोन्ही इलेक्ट्रिक कारवर मिळत आहे बंपर सवलत
1- टाटा पंच ईव्ही- या इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या 3.3 kW MR च्या स्मार्ट आणि स्मार्ट + व्हेरियंटच्या 2024 च्या एमवाय स्टॉकवर 40 हजारांची सूट मिळत आहे व इतर सर्व 3.3 kW MR व्हेरियंटवर पन्नास हजार रुपयांची सूट मिळत आहे.
इतकेच नाही तर 3.3 kW LR व्हेरियंटवर देखील 50 हजाराची सूट मिळत असून याशिवाय 7.2 kW फास्ट चार्जर करणाऱ्या एलआरच्या सर्व व्हेरिएंट वर 70000 रुपयांची सूट मिळत आहे. दुसरे म्हणजे MY 2025 साठी स्मार्ट आणि स्मार्ट प्लस सोडून टाटा पंच इलेक्ट्रिकच्या सर्व व्हेरिएंटवर चाळीस हजार रुपयांचा फायदा ग्राहकांना दिला जाणार आहे.
2- टाटा टियागो ईव्ही- टाटा पंच सोबतच टाटा टियागो ईव्हीच्या 3.3 kW XE वेरियंटसाठी 2024 च्या स्टॉकवर 50 हजाराची सूट दिली जात आहे व त्याची किंमत 8.57 लाख रुपये आहे. तसेच 3.3 kW XT MR व्हेरियंटची किंमत नऊ लाख 61 हजार रुपये आहे व या व्हेरियंटवर तब्बल 70 हजाराची सूट मिळत आहे.
तसेच 3.3 kW XT LR व्हेरियंटची किंमत दहा लाख 63 हजार रुपये आहे व या किमतीवर पंचवीस हजारांची सूट मिळत आहे. इतकेच नाही तर 3.3 kW XZ + व्हेरियंटची किंमत अकरा लाख अठरा हजार रुपये आहे व यावर साठ हजारांची सूट मिळत आहे.
तसेच टॉप स्पेक XZ+ टेक LX व्हेरिएंटची किंमत 11 लाख 71 हजार रुपये असून या व्हेरियंटवर देखील 60 हजार रुपयांचा लाभ मिळत आहे. तसेच टियागो ईव्ही XZ+ आणि XZ+ टेक LX व्हेरियंटवर सुद्धा 60 हजारांची सूट मिळत असून 2025 च्या टियागो ईव्हीच्या संपूर्ण लाईनअपवर चाळीस हजार रुपयांची सवलत मिळत आहे.