Teacher Recruitment : शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून बसलेल्या हजारो नवयुवकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. डीएड आणि बीएड उत्तीर्ण उमेदवारांसाठी लवकरच एक सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. जर तुम्हीही डीएड आणि बीएड उत्तीर्ण असाल आणि तुम्हाला शिक्षक व्हायचे असेल तर तुमच्यासाठी लवकरच केंद्र आणि नवोदय विद्यालयात संधी उपलब्ध होणार असल्याची बातमी राज्यसभेतून समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय आणि नवोदय विद्यालयांमध्ये लवकरच हजारो पदांसाठी शिक्षकांची मेगा भरती आयोजित केली जाणार आहे.

कारण की देशभरातील केंद्र सरकारच्या अधिनस्त येणाऱ्या केंद्रीय विद्यालय संघटना म्हणजे केवीएस आणि नवोदय विद्यालय समिती म्हणजेच एनवीएसच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या शाळांमध्ये बारा हजाराहून अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
यामुळे लवकरच सरकारकडून ही रिक्त पदे भरण्यासाठी अधिसूचना काढली जाणार आहे स्वतः सरकारच्या मंत्र्यांकडूनच केंद्रीय विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ही माहिती देण्यात आली आहे.
केंद्रीय आणि नवोदय विद्यालयमधील एकूण रिक्त पदे
आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या केंद्रीय विधिमंडळाचे म्हणजेच संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. याच पावसाळी अधिवेशनात संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजेच राज्यसभेत केंद्रातील सरकारचे शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी केंद्रीय विद्यालय संघटनेत सध्या 7,765 आणि नवोदय विद्यालय समितीत 4,323 शिक्षकांची पदे रिक्त असल्याची माहिती दिली आहे.
शिक्षकांच्या निवृत्तीनंतर तसेच नवीन शाळा सुरू झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदे रिक्त झाली आहेत. याशिवाय काही शिक्षकांचे प्रमोशन झाले आहे, काही शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत तर काही शिक्षकांनी वेगवेगळ्या कारणास्तव नोकरीचा राजीनामा दिलेला आहे यामुळे देखील हजारो शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत.
दरम्यान शिक्षण राज्यमंत्र्यांनी या रिक्त पदांसाठी लवकरच भरती जाहीर केली जाईल अशी माहिती संसदेत दिली आहे. यामुळे डीएड आणि बीएड झालेल्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी राहणार अशी माहिती जाणकारांकडून दिली जात आहे.
केंद्रीय आणि नवोदय विद्यालयांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांबाबत माहिती देताना शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी असे सांगितले की या पदांची भरती एक निरंतर सुरू असणारी प्रक्रिया आहे. तसेच सरकार या हजारो शिक्षकांच्या रिक्त जागा भरून शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी त्वरित भरती प्रक्रिया सुरू करीत आहे.
केंद्रीय आणि नवोदय विद्यालयातील शिक्षकांचा पगार किती असतो?
तज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय आणि नवोदय विद्यालयातील PGT पदासाठी दरमहा 47,600 ते 1,51,100 रुपये इतके वेतन दिले जाणार आहे. सध्या या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग अंतर्गत वेतन दिले जात आहे. या कर्मचाऱ्यांना दिले जाणारे वेतन हे सर्वस्वी अनुभव आणि पात्रतेनुसार दिले जाते. तसेच TGT आणि PRT पदांसाठी PGT पेक्षा कमी वेतन दिले जाते.