ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; आज रात्रीपासून ‘हा’ महत्त्वाचा मार्ग राहणार ‘इतके’ दिवस बंद, पर्यायी मार्ग कोणता? पहा….

Ajay Patil
Published:
Thane Mumbra Bypass News

Thane Mumbra Bypass News : ठाणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची अशी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मुंब्रा बाह्यवळण मार्ग संदर्भात. जसं की आपणास ठाऊकच आहे की, मुंब्रा बाह्य वळण हा रस्ता ठाण्यातील वाहतुकीचा एक गेम चेंजर आहे. या बाह्यवळण रस्त्यावर रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात तसेच मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक या रस्त्यावर होत असते. दरम्यान, हा बाह्य वळण रस्ता दुरुस्तीच्या कामानिमित्त बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे.

त्यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसणार असून वाहतूक कोंडीची समस्या प्रकर्षाने जाणवणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बाह्यवळण रस्त्यावर असलेल्या रेती बंदर पूलाकडील भागाचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून केल जाणार आहे. दुरुस्तीसाठी मात्र बाह्य वळण रस्ता बंद करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर आज रात्री उशिरा हा बाह्य वळण रस्ता हलक्या आणि जड वाहनांसाठी बंद राहणार आहे.

हे पण वाचा :- पुणे, सातारकरांसाठी महत्त्वाची बातमी; पुणे-सातारा हायवेमधील रखडलेले काम ‘या’ महिन्यात होणार पूर्ण, NHI ने थेट तारीखच सांगितली

यामुळे वाहतुकदारांना इतर पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. हलक्या वाहनांना मात्र शहरातून प्रवास यादरम्यान करता येणार आहे. मात्र जी जड वाहतूक आहे ती जड वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ठाणे शहरातून नवी मुंबई कडे दैनंदिन कामानिमित्त, उद्योगानिमित्त जाणारे बहुतांशी प्रवासी या बाह्य वळण रस्त्याचा वापर करत असतात.

यासोबतच उरण जेएनपीटीहून नासिक, भिवंडी आणि गुजरातच्या दिशेने जाणारी अवजड वाहने याच बाह्य वळण रस्त्याच्या माध्यमातून जातात. अशा परिस्थितीत आता हा बाह्य वळण रस्ता बंद राहणार असल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; भोगवटदार वर्ग 2 जमिनी वर्ग 1, NA करण्याची नामी संधी; खर्च लागणार मात्र ‘इतका’, पहा अर्ज करण्याची पद्धत

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून बाह्यवळण रस्त्यावरील दुरुस्तीच्या कामामुळे ही वाहतूक आज रात्रीपासून बंद करण्यात येणार आहे. यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण शहरात वाहतूक कोंडी जाणवू शकते. दरम्यान आता आपण बाह्यवळण रस्त्याला दुसरा पर्यायी मार्ग जड वाहतुकीसाठी कोणता राहील याविषयी जाणून घेऊया.

ठाणे वाहतूक पोलिसांनी बाह्यवळण रस्ता रात्रीपासून बंद राहणार असल्याने अवजड वाहनांची वाहतूक पूर्व द्रुतगती महामार्ग, कशेळी- काल्हेर, भिवंडी शहरातून वळविली आहे. साहजिकच यामुळे उद्या अर्थात रविवारपासून वाहतूक कोंडीचा फटका प्रवाशांना सहन करावा लागणार आहे. दरम्यान हलक्या वाहनांची वाहतूक शहरातून सुरू राहणार आहे यामुळे शहरात देखील वाहतूक कोंडी अधिक जाणवणार आहे.

हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! 8 वी पास तरुणांना एसटी महामंडळात नोकरीची संधी; जाहिरात पहा अन आजच अर्ज करा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe