पावसाळा सुरू झाला की मनात कुठे फिरायला जायचं याचे बेत सुरू होतात. पण यावर्षीच्या सुट्ट्यांमध्ये जर खरोखर काही हटके आणि किफायतशीर करायचं असेल, तर इंडिगो एअरलाइन्सने दिलेली ऑफर एकदा तरी पाहायलाच हवी. अगदी १५०० रुपयांपासून विमानप्रवासाची संधी मिळणं म्हणजे खरंच स्वप्नवत वाटावं अशी गोष्ट आहे! पण हो, ही संधी फार दिवस टिकणारी नाही फक्त दोन दिवसांच्या आत तिकीट बुकिंग करून टाकावं लागेल.
इंडिगोनं त्यांच्या खास मान्सून सेलअंतर्गत ही धमाकेदार ऑफर आणली आहे. देशातल्या निवडक मार्गांवर एकेरी विमानतिकिटं केवळ १४९९ रुपयांपासून उपलब्ध आहेत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठीही फक्त ४३९९ रुपयांत तिकिटं मिळत आहेत. पावसाळ्यात मनसोक्त भटकंती करायची असेल, तरीही खर्चाचं टेन्शन नको असेल, तर ही ऑफर अगदी वेळेवर आलीय. मात्र, लक्षात ठेवा ही संधी फक्त २९ जूनपर्यंतच आहे.

बुकिंग केल्यावर प्रवासासाठीचा कालावधी १ जुलैपासून सुरू होतो आणि २१ सप्टेंबरपर्यंत प्रवास करता येणार आहे. म्हणजे पावसाळ्याचा सगळा आनंद विमानातून वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन घेता येईल. तुम्ही तिकिटं इंडिगोच्या वेबसाईटवरून, मोबाईल अॅपवरून, किंवा अगदी व्हॉट्सअॅपवरूनसुद्धा सहज बुक करू शकता.
IndiGo's Monsoon Sale is live. Enjoy domestic fares starting at ₹1,499, international fares starting at ₹4,399 and much more on #IndiGoStretch.
Book now: https://t.co/GvIBx018Me. Hurry, the offer ends on 29th June, 2025. #goIndiGo pic.twitter.com/9a5P0XV7iq
— IndiGo (@IndiGo6E) June 24, 2025
हे तिकीट सस्तं मिळतंय, पण त्याचबरोबर प्रवास अधिक आरामदायी व्हावा म्हणून काही खास सेवा सुद्धा सूटीत दिल्या जात आहेत. जसं की अतिरिक्त सामानावर ५० टक्क्यांपर्यंत सूट, फास्ट बोर्डिंगची सुविधा, आणि थोडं अधिक मोकळेपण हवं असेल तर ‘इंडिगो स्ट्रेच सीट्स’ची निवड करता येते. या सीट्समध्ये जास्त लेगरूम, चार्जिंगसाठी पोर्ट्स आणि अन्य सुखसोयी असतात. त्यांची किंमत थोडी जास्त असली, तरी अनुभव नक्कीच चांगला असतो.
पण जसं अशा ऑफर्समध्ये असतं, तसंच काही नियम आणि अटीही इथे लागू होतात.आणि ही ऑफर कोडशेअर फ्लाइट्स किंवा ग्रुप बुकिंगसाठी लागू होत नाही. इंडिगोने स्पष्टपणे सांगितलं आहे की, ही ऑफर त्यांच्याच फ्लाइट्ससाठी मर्यादित आहे आणि ते या ऑफरमध्ये कोणताही बदल करण्याचा पूर्ण हक्क राखून ठेवतात.
सविस्तर माहिती साठी व्हिझिट करा पूढील लिंक
https://www.goindigo.in/?cid=monsoonsale|IG|nonfin|24June|2025|