Maharashtra Rain: राज्यात कोसळणार परत जोर’धारा’! शनिवारपासून राज्यात वाढणार पावसाचा जोर, वाचा कोणत्या भागात पडेल पाऊस?

र आपण येणाऱ्या पुढील दोन दिवसांमध्ये राज्यातील पाऊसमानाविषयी हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज पहिला तर त्यांच्यामध्ये येणाऱ्या दोन दिवसात राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात होईल.

Published on -

Maharashtra Rain:- सध्या राज्यामधील जर आपण पावसाची स्थिती पाहिली तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडताना दिसून येत आहे तर काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. ऊन पावसाचा खेळ सुरू असल्याचे देखील आपल्याला दिसून येते.

मागच्या आणि चालू आठवड्यामध्ये राज्यात पावसाने जोरदार कमबॅक केले होते व महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली.

या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहिली आणि इतकेच नाही तर धरणांच्या पाणी साठ्यात देखील लक्षणीय स्वरूपाची वाढ झाली व बरीच धरणे शंभर टक्के भरले.

या सगळ्या पार्श्वभूमीवर  जर आपण येणाऱ्या पुढील दोन दिवसांमध्ये राज्यातील पाऊसमानाविषयी हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज पहिला तर त्यांच्यामध्ये येणाऱ्या दोन दिवसात राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात होईल.

 येत्या दोन दिवसानंतर कशी राहील राज्यात पावसाची स्थिती?

गेल्या एक ते दोन दिवसापासून राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने उघडीप दिल्याचे चित्र आहे. परंतु दोन दिवसात राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे व हवामान विभागाच्या अंदाजानुसार शुक्रवारपासून राज्याच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढेल व विदर्भातील सर्व जिल्हे तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा, नासिक आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे.

त्यासोबतच शनिवारी विदर्भातील अकोला, बुलढाणा तसेच अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर तसेच भंडारा व गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे व त्यासोबत मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देखील वर्तवलेला आहे.

मध्य महाराष्ट्र  आणि कोकणात देखील काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवलेला आहे. अगदी शनिवार प्रमाणे रविवारी आणि सोमवारी देखील राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवलेला

असून रविवारी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आला असून सोमवारी देखील राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे.

 या ठिकाणी तयार झाले आहे कमी दाबाचे क्षेत्र

सध्या जर आपण देशातील एकूण हवामानाची स्थिती पाहिली तर गुजरात राज्यातील कच्छ आणि सौराष्ट्र भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेले असून मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा कच्छ पासून ते सौराष्ट्र,

उदयपूर, शिवपुरी तसेच सिधी, अंबिकापुर, पूरी ते आग्नेय भागात बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे व दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टी पर्यंत किनाऱ्याला समांतर असा कमी दाबाचा पट्टा सध्या अस्तित्वात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!