जगाच्या पाठीवर आहे अनोखा देश जिथे रात्र असते फक्त काही मिनिटांची! इतर वेळेस कायम असते कडकडीत ऊन; जाणून घ्या या देशाची माहिती

जगाच्या पाठीवर जर आपण बघितले तर अनेक विस्मयकारक आणि मनाला आश्चर्याचा झटका देतील अशा अनेक गोष्टी असल्याचे आपल्याला दिसून येते. भौगोलिक दृष्टिकोनातून असो किंवा इतर यामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी खूप मोठी विविधता अनेक देशांमध्ये दिसून येते.

Ajay Patil
Published:
norwey

Amazing Country In World:- जगाच्या पाठीवर जर आपण बघितले तर अनेक विस्मयकारक आणि मनाला आश्चर्याचा झटका देतील अशा अनेक गोष्टी असल्याचे आपल्याला दिसून येते. भौगोलिक दृष्टिकोनातून असो किंवा इतर यामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी खूप मोठी विविधता अनेक देशांमध्ये दिसून येते.

जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये असलेला जर प्रमुख फरक बघितला तर तो दिवस आणि रात्र याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. जेव्हा काही ठिकाणी रात्र असते तर काही दुसऱ्या देशांमध्ये तेव्हा दिवस असतो. हा फरक बऱ्याच जणांना माहिती आहे.

परंतु जगाच्या पाठीवर असा एक देश आहे की त्या ठिकाणी दिवस आणि रात्र यांचा जो काही कालावधी किंवा त्यांचे वेळापत्रक आहे ते मुळातच अस्तित्वात नाही. म्हणजे या देशांमध्ये तुम्हाला रात्र हा विषय शोधून सापडणार नाही.

त्या ठिकाणी 24 तास सूर्याचे दर्शन तुम्हाला पाहायला मिळेल व कडकडीत ऊन अनुभवायला मिळेल. हा देश युरोप खंडामध्ये असून त्या देशाचे नाव नार्वे असे आहे. म्हणजे या देशात जर बघितले तर रात्र अत्यंत कमी कालावधीची असते.

अवघे चाळीस मिनिटांची असते रात्र
हा देश युरोपात उत्तरेला असून उत्तर ध्रुवाच्या सर्वात जवळ असल्याने अत्यंत थंड प्रदेश म्हणून ओळखला जातो. या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फाळ डोंगरे असून हिमनद्या देखील मोठ्या प्रमाणावर आहेत.

असे म्हटले जाते की नार्वे मध्ये कधीच सूर्य अस्ताला जात नाही. या देशाच्या हॅमर फेस्टमध्ये केवळ चाळीस मिनिटांची रात्र होते व इतर वेळी कडकडीत ऊन पडलेले असते. या देशामध्ये सूर्य दुपारी 12:43 मिनिटांनी मावळतो आणि चाळीस मिनिटानंतर लगेच सूर्योदय होतो.

म्हणजेच दीड वाजले की लगेच सूर्य उगवतो. विशेष म्हणजे हा क्रम एक-दोन दिवस नाही तर तब्बल अडीच महिने असतो व त्यामुळेच नार्वेला अर्धी रात्र आणि अर्ध्या सूर्योदय असलेला देश देखील म्हणतात. साधारणपणे या ठिकाणी मे महिन्यापासून तर जुलै पर्यंत संपूर्ण 76 दिवस सूर्यास्त होत नाहीत.अशीच परिस्थिती हॅमरफेस्ट शहरात देखील बघायला मिळते.

नार्वे हा असा एकमेव देश आहे जिथे शंभर वर्षांपासून सूर्याचे किरणच पोचलेले नाहीत.तसेच हे शहर व हा देश संपूर्णपणे डोंगरांनी वेढलेला असून पर्यटकांची या देशाला खूप मोठ्या प्रमाणावर पसंती असते. या ठिकाणी असलेले बर्फाच्छादित डोंगर आणि निसर्ग सौंदर्य यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटक या देशाला भेट देतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe