भारतात आहे ‘हे’ अद्भुत गाव! पहाटे 3 वाजता होतो सूर्योदय आणि दुपारी 4 ला होतो सूर्यास्त; जाणून घ्या माहिती

भारत विविधतेने नटलेला देश आहे व ही विविधता आपल्याला भौगोलिक तसेच नैसर्गिक, प्रत्येक राज्याच्या परंपरा तसेच चालरीती व बोलीभाषा अशा अनेक दृष्टिकोनातून दिसून येते. दुसरे म्हणजे भारतामध्ये अशी काही अद्भुत असे ठिकाणे आहेत की त्यांची ती वैशिष्ट्ये नक्कीच मनाला भावणारी आणि आश्चर्यचकित करणारी ठरतात.

Ajay Patil
Published:

Dong Village In India:- भारत विविधतेने नटलेला देश आहे व ही विविधता आपल्याला भौगोलिक तसेच नैसर्गिक, प्रत्येक राज्याच्या परंपरा तसेच चालरीती व बोलीभाषा अशा अनेक दृष्टिकोनातून दिसून येते. दुसरे म्हणजे भारतामध्ये अशी काही अद्भुत असे ठिकाणे आहेत की त्यांची ती वैशिष्ट्ये नक्कीच मनाला भावणारी आणि आश्चर्यचकित करणारी ठरतात.

याच मुद्द्याला धरून जर आपण अरुणाचल प्रदेश राज्याचा विचार केला तर याला भारतात सगळ्यात अगोदर म्हणजेच प्रथम सूर्योदय होणारे राज्य म्हणून ओळखले जाते व सूर्याची पहिली किरणे भारतातील ज्या गावावर पडतात ते गाव देखील अरुणाचल प्रदेश राज्यांमध्येच आहे व त्या गावाचे नाव आहे डोंग होय.

हे अतिशय छोटे गाव आहे परंतु खूपच सुंदर असे ठिकाण आहे. डोंग हे गाव भारत-चीन- म्यानमार ट्राय जंक्शनवर वसलेले आहे. इतकेच नाही तर भारताची जी काही पूर्वोत्तर सीमा आहे त्यावरचे भारत हद्दीतील हे पहिले गाव आहे.

काय आहे डोंग गावाचे वैशिष्ट्ये?
डोंग हे गाव अरुणाचल प्रदेश राज्यातील अंजाव या जिल्ह्यात वसलेले गाव असून त्या ठिकाणी अतिशय छोटी वस्ती आहे. या गावाला पहाटेचे स्वागत करणारे भारतातील पहिले ठिकाण समजले जाते.

1240 मीटर उंचीवर वसलेले हे गाव लोहित नदी आणि तिची उपनदी सती यांच्या संगमावर वसलेले आहे. हे गाव त्याच्या सांस्कृतिक समृद्धीसाठी देखील खूप प्रसिद्ध असून या ठिकाणी राहणाऱ्या स्थानिक मिश्मी जमातींनी निसर्गाच्या सानिध्यात या ठिकाणी विकसित केलेला सांस्कृतिक वारसा खूप समृद्ध आहे.

या ठिकाणी होणाऱ्या पहिल्या सूर्योदयाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमी गर्दी करतात व पर्यटकांचे हे एक आवडते ठिकाण आहे.डोंग गावाच्या प्रवासात आठ किलोमीटरचा ट्रेक समाविष्ट आहे व या अंतरामध्ये अनेक चित्तथरारक दृश्य आणि हिमालयाच्या शिखरांच्या मागे अद्भुत असा सूर्योदयाचा अनुभव घेता येतो.

या गावाची लोकसंख्या बघितली तर त्या बाबतीत देखील एक वेगळाच विक्रम आहे. निसर्गाने समृद्ध असलेल्या या गावात फक्त 35 लोक राहतात व शेती हा या ठिकाणच्या लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून मात्र या ठिकाणी अजून पुरेशा सुविधा उभारण्यात आलेल्या नाहीत.

परंतु इरिगेशन डिपार्टमेंटच्या माध्यमातून वालोंग या शेजारच्या गावामध्ये पर्यटकांसाठी राहण्याची सुविधा देण्यात आली आहे. याच गावी सैन्याचा मोठा तळ देखील आहे. तुम्हाला जर डोंग या गावचा सूर्योदय पहायचा असेल तर आठ किलोमीटरचा ट्रेक करून जावे लागते.

या ठिकाणी जर भेट द्यायची असेल तर साधारणपणे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा कालावधी योग्य समजला जातो.कारण या कालावधीत ट्रेकिंग करिता या ठिकाणचे हवामान अनुकूल असते. या कालावधीमध्ये आकाश स्वच्छ व निरभ्र असते व त्यामुळे सूर्योदयाचा अनुभव चांगल्या पद्धतीने घेता येतो.या गावाला पहाटे तीन वाजता सूर्य उगवतो आणि दुपारी चार वाजता सूर्यास्त होतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe