‘ह्या’ आहेत 3 वर्षांच्या एफडीवर 8.4% पर्यंत व्याज देणाऱ्या टॉप 4 बँका ! एका लाखाच्या गुंतवणुकीवर किती रिटर्न मिळणार?

3 वर्षांच्या फिक्स डिपॉझिट योजनेत पैसा गुंतवायचा असेल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. आज आम्ही तुम्हाला तीन वर्षांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची माहिती सांगणार आहोत.

Published on -

FD News : तुम्ही फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहात का? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. एफडी म्हणजेच फिक्स डिपॉझिट हा सुरक्षित गुंतवणुकीचा एक लोकप्रिय प्रकार आहे. मात्र गेल्या काही महिन्यांच्या काळात एफडी मधून ग्राहकांना अपेक्षित व्याज मिळत नाहीये. कारण म्हणजे देशातील अनेक प्रमुख बँकांनी गेल्या काही महिन्यांच्या काळात एफडीचे व्याजदर कमी केले आहेत.

आरबीआयने रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरातील बँकांकडून विविध कालावधीचे एफडीवरील व्याजदर कमी करण्यात आले आहेत. मात्र, असे असतानाही देशात अशा काही स्मॉल फायनान्स बँका आहेत ज्या की आपल्या ग्राहकांना तीन वर्षांच्या एफडीवर 8.4% पर्यंतचे व्याज देत आहेत. म्हणून आज आपण तीन वर्षांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या याच प्रमुख बँकांची माहिती जाणून घेणार आहोत.

या आहेत 3 वर्षांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँका

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक : ही बँक सध्या स्थितीला तीन वर्षांच्या एफडीवर आपल्या ग्राहकांना आठ टक्के दराने व्याज देत असल्याची माहिती समोर आली आहे. अशा परिस्थितीत जर एखाद्या ग्राहकाने या योजनेत एका लाखाची गुंतवणूक केली तर त्यांना मॅच्युरिटी वर 1.24 लाख रुपये मिळणार आहेत.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक : मीडिया रिपोर्टनुसार ही बँक सध्या स्थितीला तीन वर्षांच्या FD योजनेवर सर्वाधिक व्याज देत आहे. या बँकेकडून तीन वर्षांच्या एफडी योजनेवर आपल्या ग्राहकांना 8.40% दराने व्याज दिले जात आहे. अशा स्थितीत जर या योजनेत एखाद्या ग्राहकाने एक लाख रुपये गुंतवले तर त्याला मॅच्युरिटीवर म्हणजेच तीन वर्षांचा काळ पूर्ण झाल्यानंतर 1.25 लाख रुपये मिळणार आहेत.

जना स्मॉल फायनान्स बँक : ही स्मॉल फायनान्स बँक तीन वर्षांच्या एफडीवर गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सध्या स्थितीला 7.75 टक्के दराने व्याज देत असल्याची माहिती समोर आली आहे. अशा स्थितीत जर या बँकेच्या तीन वर्षांच्या एफडी योजनेत एखाद्या ग्राहकाने एका लाखाची गुंतवणूक केली तर त्याला मॅच्युरिटीवर 1.23 लाख रुपये मिळणार आहेत.

बंधन बँक : ही बँक सध्या स्थितीला तीन वर्षांच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.40% दराने व्याज देत आहे. अशा स्थितीत जर एखाद्या ग्राहकाने सदरील बँकेच्या तीन वर्षांच्या एफडी योजनेत एका लाखाची गुंतवणूक केली तर त्याला मॅच्युरिटीवर 1.22 लाख रुपये मिळणार आहेत.

 

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe