Google Search Top 10 Travelling Destination 2024:- गुगल हे प्रत्येक वर्षी कलाकार किंवा चित्रपट तसेच प्रवासाची ठिकाणी इत्यादींची प्रथम दहा मध्ये असलेल्या ठिकाणांची किंवा चित्रपटांची किंवा कलाकारांची यादी प्रसिद्ध करत असते. या अनुषंगाने जर आपण बघितले तर यावर्षी म्हणजेच 2024 मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केले गेलेल्या पर्यटन स्थळांची यादी देखील गुगलने नुकतीच प्रसिद्ध केली आहे.
यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की भारतीयांना फिरण्यासाठी कुठली पर्यटन स्थळे आवडतात. या गुगल सर्चनुसार जर बघितले तर यामध्ये भारतातील नाहीतर जगातील देखील विविध ठिकाणांचा समावेश आहे.ही ठिकाणे भारतीयांनी सर्वाधिक सर्च केली आहेत.
ज्या लोकांना पर्यटनाची आवड असते असे लोक दररोज वेगवेगळी अशी पर्यटन स्थळे शोधत राहतात व कुटुंब तसेच मित्र किंवा जोडीदारासोबत चांगला वेळ घालवता यावा याकरिता अशा ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅनिंग बनवतात. त्यामुळे या लेखात आपण गुगलने टॉप 10 ट्रॅव्हलिंग डेस्टिनेशनची जी काही यादी प्रसिद्ध केली आहे ती आपण बघणार आहोत.
भारतीयांनी गुगलवर सर्च केलेली दहा टॉप ट्रॅव्हलिंग डेस्टिनेशन
1- अझरबैजान- वर्ष 2024 मध्ये भारतीयांनी सर्वाधिक सर्च केलेल्या ट्रॅव्हलिंग डेस्टिनेशनमध्ये अझरबैजान हे टॉप 10 प्रवास स्थळांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.
या ठिकाणी जर फिरायला जायचे असेल तर तुम्ही तीस हजार रुपयांमध्ये या ठिकाणी भेट देऊ शकतात. हे ठिकाण एक कमीत कमी खर्चामध्ये म्हणजेच बजेट फ्रेंडली असून यावर्षी भारतीयांची पहिली पसंती अझरबैजानला असल्याचे दिसून येते.
2- बाली- भारतीयांनी सर्च केलेल्या टॉप 10 पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये दुसरे स्थान किंवा दुसरा क्रमांक हा बालीला आहे. बालीला देवांचे बेट म्हणून देखील ओळखले जाते.
या ठिकाणी असलेली मंदिर आणि तीर्थक्षेत्रे लोकांना खूप मोठ्या प्रमाणात आकर्षित करतात. विशेष म्हणजे हनिमून साठी देखील जोडप्यांकडून बाली या ठिकाणाला पहिली पसंती देण्यात येते.
3- मनाली- गुगलच्या या टॉप 10 ट्रॅव्हलिंग डेस्टिनेशनमध्ये मनाली हे तिसऱ्या क्रमांकावर आहे. आपल्याला माहित आहे की मनालीला भारताचे मिनी स्वित्झर्लंड असे देखील म्हटले जाते व हे हिमाचल प्रदेश मध्ये आहे
. भारतीय जोडप्यांमध्ये हनिमून डेस्टिनेशन म्हणून हे आवडते ठिकाण आहे. मनालीला ट्रेकिंगचा आनंद देखील उत्तमपणे घेता येतो व येथील नैसर्गिक सौंदर्य देशातीलच नव्हे तर परदेशातील पर्यटकांना देखील भुरळ घालते.
4- कझाकीस्तान- या टॉप ट्रॅव्हल डेस्टिनेशन यादीमध्ये कझाकिस्तानला चौथा क्रमांक मिळाला आहे. भारतीय पर्यटकांमध्ये जे काही आवडते ठिकाणे आहेत त्यापैकी हे ठिकाण एक आहे. या ठिकाणी तुम्ही 14 दिवसांपर्यंत व्हिसा शिवाय प्रवास करू शकतात.
5- जयपुर- पिंक सिटी किंवा गुलाबी शहर म्हणून ओळखले जाणारे जयपूर हे राजस्थान राज्यात असून जगात प्रसिद्ध आहे. गुगलच्या या टॉप 10 यादीमध्ये जयपूरला पाचवे स्थान मिळाले आहे.
जयपुरला गेल्यावर सिटी पॅलेस तसेच आमेर किल्ला, हवा महल तुम्ही पाहू शकतात. बॉलीवूड जोडप्यांसाठी हे आवडते व प्रसिद्ध असलेले वेडिंग डेस्टिनेशन देखील आहे.
6- जॉर्जिया- गुगलने प्रसिद्ध केलेल्या भारतीयांनी सर्च केलेल्या टॉप दहा ट्रॅव्हलिंग डेस्टिनेशन यादीत जॉर्जिया या देशाला सहावा क्रमांक मिळाला असून या ठिकाणी असलेले रस्ते आणि बागा पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करतात.
7- मलेशिया- याशिवाय टॉप 10 पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये मलेशियाचा देखील समावेश असून मलेशियाला या यादीमध्ये सातवा क्रमांक मिळाला आहे. मलेशियाला असलेले ट्वीन टॉवर्स आणि लँगकावीचा ओल्ड बीच पर्यटकांमध्ये आकर्षणाचे केंद्र आहे.
8- अयोध्या- 2024 मध्ये भगवान श्रीरामांची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अयोध्या गुगलवर मोठ्या प्रमाणावर सर्च केले गेले आहे. आपल्याला माहित आहे की हे तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील लोक श्रद्धेने भेट देत असतात. गुगल सर्च ट्रॅव्हलिंग डेस्टिनेशन लिस्टमध्ये आयोध्या आठव्या स्थानावर आहे.
9- काश्मीर- गुगलच्या टॉप 10 ट्रॅव्हलिंग डेस्टिनेशन यादीमध्ये काश्मीर हे नवव्या स्थानावर असून या ठिकाणी असलेले हिल स्टेशन हे पर्यटकांमध्ये खास आकर्षणाचे केंद्र असते.
जगभरातून अनेक पर्यटक सुट्टी घालवण्यासाठी देखील काश्मीरची निवड करतात. इतकेच नाहीतर जोडप्यांमध्ये आवडते हनिमून डेस्टिनेशन म्हणून देखील काश्मीर प्रसिद्ध आहे.
10- गोवा- गुगलच्या टॉप 10 सर्च करण्यात आलेल्या ट्रॅव्हलिंग डेस्टिनेशन मध्ये गोव्याला दहावा क्रमांक मिळाला असून गोवा हे त्या ठिकाणी असलेल्या सुंदर अशा समुद्रकिनाऱ्यांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. तसेच या ठिकाणच्या लोकांचे लाइफस्टाइल हे इतर ठिकाणांच्या लोकांपेक्षा खूपच वेगळे आहे. गोव्याला दरवर्षी विदेशी पर्यटक देखील मोठ्या संख्येने भेट देतात.