कोरोना विरोधात लढण्यासाठी राजमहल सोडून रुग्णालयात काम करतेय ही सुंदर राजकुमारी !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 :- कोरोना व्हायरसच्या संकटाशी लढण्यासाठी स्वीडनच्या राजकुमारी सोफिया या देखील पुढे आल्या असून, कोरोनाशी लढण्यासाठी त्या हॉस्पिटलमध्ये काम करत आहेत.

स्वीडनची राजकुमारी सोफिया कोरोनाव्हायरस संक्रमित रूग्णांवर उपचार करण्यात व्यस्त आहे. 35 वर्षीय सोफियाने तीन दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाईन शिकली आहे.

यासह, ती आता स्टॉकहोल्ममधील रुग्णालयात स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहे. विशेष म्हणजे सोफिया या रुग्णालयाचे मानद अध्यक्षही आहेत.

रॉयल सेंट्रलच्या म्हणण्यानुसार राजकुमारी सोफिया थेट कोरोनाच्या रूग्णांच्या उपचारामध्ये वैद्यकीय कामात ती डॉक्टरांना मदत करेल. ती रुग्णालयात आरोग्यसेवा सहाय्यक म्हणून काम करेल. यासाठी तीन दिवसांचा ऑनलाईन कोर्स तिने पूर्ण केला आहे.

हा कोर्स वैद्यकीय नसलेल्या मात्र रुग्णालयात आवश्यक कार्यासाठी सहाय्यक म्हणून लोकांना तयार करतो. यात साफसफाई करणे, स्वयंपाकघरात काम करणे आणि जंतुनाशक उपकरणे हाताळणे इ. समाविष्ट आहे.

डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचार्यांना  कांचे ओझे कमी करण्यासाठी आठवड्यातून 80 जणांना रुग्णालयाकडून प्रशिक्षण दिले जाते.

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी राजकुमारी सोफियाने स्वत:हून पुढाकार घेतल्याची माहिती मिळते आहे. राजकुमारीचा एक फोटो देखील सोशल मीडियावर  व्हायरल होत आहे, ज्यामध्ये स्टाफबरोबर राजकुमारी दिसत आहे.

दरम्यान ती सहाय्यक म्हणून काम करीत असलेल्या रुग्णालयाची मानद अध्यक्ष देखील आहे, 35 वर्षांच्या सोफियाने 40 वर्षांच्या प्रिन्स कार्ल फिलिपशी लग्न केले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment