चांगला पाऊस तुम्हाला शेअर बाजारात देखील मिळवून देईल भरपूर पैसा! शेतीशी निगडित असलेल्या ‘या’ कंपन्यांमध्ये पैसे गुंतवा, भरपूर परतावा मिळवा

Ajay Patil
Published:
share market

देशामध्ये मान्सूनचे आगमन झाले असून देशातील बऱ्याच राज्यांमध्ये चांगल्या प्रकारे पाऊस पडत आहे. तसेच यावर्षी भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून सरासरी पेक्षा देशात चांगला पाऊस होईल असा अंदाज वर्तवला असल्याने एकंदरीत शेती क्षेत्रामध्ये चांगले आणि समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.

परंतु हा चांगला पावसाचा परिणाम तुम्हाला शेअर बाजारातून चांगला पैसा मिळवून देण्यासाठी मदत करू शकतो. या कालावधीमध्ये जर तुम्ही अशा शेअर्समध्ये पैसे गुंतवले जे मान्सूनची निगडित आहेत व तुम्हाला चांगला पैसा या माध्यमातून मिळू शकतो कारण ते शेअर्स वाढण्याची शक्यता आहे.

यावर्षीच्या चांगल्या मान्सूनच्या अंदाजामुळे एफएमसीजी क्षेत्राला चांगला आधार मिळत असून त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांना देखील याचा फायदा होणार आहे. नेमके या कंपन्या कोणत्या आहेत याबद्दलची माहिती आपण या लेखात बघू.

 या कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवल्यावर मिळू शकतो चांगला परतावा

1- महिंद्रा अँड महिंद्रा कृषी उपकरणे आणि ट्रॅक्टर बनवणाऱ्या या महिंद्रा अँड महिंद्रा च्या शेअर्समध्ये सध्या तेजीचे वातावरण दिसून येत आहे. याचा परिणाम शेअर्सवर देखील दिसून येण्याची शक्यता आहे. कारण चांगल्या पावसामुळे या कंपनीच्या विक्रीत वाढ अपेक्षित आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे शेअर्स एका महिन्यात 2561.65 रुपयांवरून 2869.60 रुपयांपर्यंत वाढला आहे. हा स्टॉक एका वर्षापेक्षा 101 टक्क्यांनी वाढला असून ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांना विश्वास आहे की या वर्षाच्या अखेरीस तो 3310 पर्यंत जाऊ शकतो.

2- डाबर इंडिया लिमिटेड देशातील दुसरी सर्वात मोठी एफएमसीजी कंपनी असलेल्या डाबर इंडिया लिमिटेडचे शेअर्स देखील एप्रिल ते मे या कालावधीत सुमारे दहा टक्क्यांनी वाढले आहेत. इतकेच नाही तर मे ते जून पर्यंत या कंपनीचे शेअर्स 566.95 वरून 603.50 रुपयांपर्यंत वाढले आहेत. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांना विश्वास आहे की हा स्टॉक वर्षाच्या अखेरपर्यंत 650 रुपयांपर्यंत जाऊ शकतो.

3- मेरीको लिमिटेड सफोला आणि मेडिकेअर सारख्या लोकप्रिय ब्रँडची उत्पादने तयार करणारी ही एक महत्त्वाची कंपनी असून यामध्ये देखील पैसे गुंतवणे फायद्याचे ठरेल. या कंपनीच्या शेअर्समध्ये एप्रिल ते मे या कालावधीत 16% पेक्षा जास्त वाढ झाली असून गेल्या एका महिन्यात 606.25 रुपयांवरून या कंपनीचे शेअर्स 613.90 रुपयांपर्यंत वाढले आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत या कंपनीचे शेअर 636.71 पर्यंत वाढू शकतात.

4- एस्कॉर्ट देशातील ट्रॅक्टर आणि शेती उपकरणे तयार करणारी कंपनी असून या कंपनीच्या शेअर्समध्ये एप्रिल ते मे या कालावधीत सुमारे 16 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यानंतर मे ते जून दरम्यान हा शेअर 3819.55 वरून 4169.95 पर्यंत वाढला आहे. पुढील वर्षी या कंपनीचे शेअर्स पाच हजार शंभर रुपयापर्यंत पोहोचू शकतात असे तज्ञांचे मत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe