सापापेक्षा कमी विषारी नाहीत ‘हे’ पाच प्राणी, विषाने करतात स्वतःचे संरक्षण… या प्राण्यांशी केलेली छेडछाड देखील बेतू शकते जीवावर

Ajay Patil
Published:
dart frog

सध्या संपूर्ण देशामध्ये आता पावसाळ्याचा कालावधी सुरू असून बऱ्याच ठिकाणी धो धो पाऊस कोसळत आहे. परंतु या पावसाच्या कालावधीमध्ये मात्र साप आणि इतर घातक असलेल्या कीटक किंवा प्राण्यांपासून व्यक्तीला धोका संभवतो. कारण पावसामुळे या कालावधीत सापांचे किंवा इतर प्राण्यांची बिळे बुजली जातात व यामुळे अनेकदा साप बाहेर पडतात व मानवी वस्तीत शिरतात.

परंतु सापाव्यतिरिक्त इतर काही प्राणी असे आहेत की ते देखील तितकेच विषारी असून धोकादायक आहेत. परंतु हे सापाव्यतिरिक्त असलेले जे इतर प्राणी आहेत ते त्यांचे विषाचा वापर स्वतःच्या संरक्षणासाठी आणि शिकारीसाठी करतात. ते पाच प्राणी कोणते याबद्दलची माहिती या लेखात आपण घेऊ.

 सापा इतकेच विषारी असतात हे पाच प्राणी

1- डार्ट बेडूक या प्रजातीचे बेडूक रंगाने पिवळे, केशरी, लाल, हिरव्या आणि निळ्या रंगाचे असते व विषाने पूर्णपणे भरलेले असते. हा बेडूक विषारी असतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की एक डार्ट बेडूक म्हणजेच डार्ट फ्रॉगमध्ये इतके विष असते की ते वीस हजार उंदीर मारण्यासाठी पुरेसे असते. याबाबत शास्त्रज्ञ म्हणतात की,या बेडकाला हे विष काही कीटकांपासून मिळते ज्यांचा तो अन्न म्हणून वापर करतो. त्याची जीभ खूप लांब असते व या जिभेच्या मदतीने तो शिकार पकडतो आणि क्षणात गिळतो.

2- स्टोनफिश स्टोनफिश हा एक मासा असून तो स्वतःचे संरक्षण करण्यासाठी त्याला धोका असलेल्या प्राण्याचे फसवणूक करण्यात खूप माहीर समजला जातो. या माशाला धोका जाणवताच तो त्याच्या सभोवतांचे वातावरणात अशा प्रकारे मिसळतो की त्यांच्या शिकारींना आणि अगदी मानवी स्कुबा डायवर्सना देखील त्याला शोधणे कठीण होते.

स्टोनफिश हा सर्वात विषारी मासा आहे व तो मानवासाठी अत्यंत धोकादायक आहे. या माशाचे डोळे लहान असतात व डोके मोठे असते व हा चिखलात आणि खडकांमध्ये लपलेला असतो. म्हणून त्याला डोळ्यांनी पाहणे खूप कठीण आहे. परंतु त्याच्यावर चुकून पाऊल जरी पडले तरी तो त्याच्या पंख्यांच्या मणक्यांमध्ये बनवलेल्या खोबणीतून विष टोचतो.

3- बुलेट मुंगी जगामध्ये मुंग्यांच्या बारा हजार पेक्षा जास्त प्रजाती आहेत व त्यामध्ये बुलेट मुंगी ही सर्वात धोकादायक समजली जाते. या मुंगीने चावा घेतला तर 24 तास असह्य वेदना होत राहतात. ही लालसर तपकिरी रंगाची मुंगी अडीच सेंटीमीटर आकाराची असते

व तिचे जबडे खूप मोठे असून पंख नसलेल्या कुंड्यांसारखे दिसतात. या मुंग्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना ज्या प्राण्यापासून किंवा ज्यापासून धोका आहे  त्याच्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आणि शिकार करताना त्यांचा डंकाचा वापर करतात.

4- विंचू विषारी प्राण्यांमध्ये विंचूचा देखील समावेश होतो व त्याचे पंजे इतके तीक्ष्ण असतात की तो एका क्षणात त्याची शिकार पकडतो. तसेच त्याच्या शेपटीचे विषारी टोक पुढे करून तो शिकार करतो. विंचू हा प्रामुख्याने शिकार मारण्यासाठी आणि भक्षकांपासून वाचण्यासाठी त्याचा विषाचा वापर करतो. जगात अस्तित्वात असलेल्या विंचूंच्या केवळ 30 किंवा 40 पदार्थांकडे माणसाला मारण्यासाठी पुरेसे विष आहे असे म्हटले जाते.

5- निळा रिंग्ड ऑक्टोपस पृथ्वीवरील सर्वात विषारी प्राण्यांमध्ये याचा समावेश केला जातो. या ऑक्टोपसचे विष इतके धोकादायक आहे की त्याच्या विषामुळे एखाद्या व्यक्तीला अर्धांगवायूचा झटका देखील येऊ शकतो. तसेच अनेकदा मृत्यू देखील होऊ शकतो. परंतु जेव्हा त्याला एखाद्याकडून धोका वाटतो तेव्हाच तो त्याचा विषाचा वापर करतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe