Car Information: ‘या’ आहेत तगडे मायलेज देणाऱ्या सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक कार; ट्रॅफिकमध्ये देखील चालवाल आरामात, वाचा स्वस्त कारची यादी

Ajay Patil
Published:
cheapest automatic car

Car Information:- भारतीय कार बाजारपेठेमध्ये अनेक कार उत्पादक कंपन्यांनी वेगवेगळे वैशिष्ट्य असलेल्या कार उत्पादित केल्या असून यामध्ये ग्राहकांची गरज ओळखून वेगवेगळ्या कारची निर्मितीवर कंपन्यांकडून भर देण्यात आलेला आहे. कार उत्पादक कंपन्यांकडून एसयुव्ही कारपासून तर एएमटी गिअर बॉक्स असलेले अनेक कार बाजारपेठेमध्ये लॉन्च करण्यात आलेले आहेत.

त्यामुळे ग्राहकांना कार खरेदी करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले असून ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार कार खरेदी करणे सोपे झाले आहे. यामध्ये जर आपण शहरातील ट्राफिक पाहिली तर त्या दृष्टिकोनातून बऱ्याचदा कारचा प्रवास हा डोकेदुखी ठरतो. कारण रहदारीमध्ये आपल्याला सतत क्लच आणि ब्रेक दाबावे लागतात यामुळे आपण त्रस्त होतो. या समस्येवर एक जालीम उपाय म्हणजे ऑटोमॅटिक कार खरेदी करणे हा होय.

आपल्याला माहित असेल की या ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन म्हणजेच एएमटी प्रकारच्या कारमध्ये मॅन्युअल गिअरबॉक्स असतो. परंतु यामध्ये क्लच ऑपरेशन एका विशिष्ट एएमटी युनिटच्या मदतीने केले जाते. यामध्ये मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये ज्या पद्धतीने क्लच पॅडल असतो तो नसतो.

परंतु इंजिनच्या आतमध्ये एक क्लच असतो व त्याचे नियंत्रण आटोमॅटिक असते. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे जेव्हा गिअर बदलेल तेव्हा क्लच एएमटी युनिटच्या मदतीने कार्य करतो.

हे एक स्वस्त आणि तितकेच प्रभावी ऑटोमॅटिक तंत्रज्ञान असून इंजिनमध्ये असलेल्या क्लचमुळे एटीपेक्षा थोडे हळू काम करतो. त्यामुळे तुम्हाला देखील अशी ऑटोमॅटिक स्वस्तातली  कार घ्यायची असेल तर तुम्ही या लेखात दिलेल्या कार पैकी एक घेऊ शकतात.

 या आहेत स्वस्तातल्या ऑटोमॅटिक कार

1- मारुती सेलेरिओ ही परफेक्ट अशी हॅचबॅक कार असून या कारमध्ये मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्स देण्यात आला आहे. या कारमध्ये चांगली जागा उपलब्ध असून सामान ठेवण्यासाठी 242 लिटरची मोठी बूट स्पेस तुम्हाला मिळते.

या कारमध्ये 998 सीसी क्षमतेचे इंजिन देण्यात आले आहे व ते 65.71 बीएचपीची पावर जनरेट करते. अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि पुढच्या बाजूला एअरबॅग देण्यात आलेले आहेत. या कारची एक्स शोरूम किंमत सहा लाख 28 हजार रुपयांपासून सुरू होते.

2- टाटा टियागो टाटा मोटरची ही कार देखील ऑटोमॅटिक श्रेणीतील एक उत्तम पर्याय आहे. या कारमध्ये 1.2 लिटरचे पेट्रोल इंजिन देण्यात आले असून त्यामध्ये पाच स्पीड एमटी/ ऑटोमॅटिक ट्रान्समिशन चा पर्याय देण्यात आला आहे

व यामध्ये मोठी स्पेस तुम्हाला उपलब्ध होते. प्रवाशांच्या सुरक्षकरिता या कारमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम तसेच एअरबॅग, सिट बेल्ट आणि डिस्क ब्रेक देण्यात आलेले आहेत व या कारची एक्स शोरूम किंमत सहा लाख 94 हजार रुपये आहे.

3- मारुती वॅगनआर मारुतीची ही सर्वात लोकप्रिय अशी हॅचबॅक कार असून मारुतीच्या इतर कारपेक्षा या कारचे जास्त प्रमाणात युनिट विकले जातात. या कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. कितीही ट्रॅफिक असली तरी देखील ही कार तुम्ही आरामात चालवू शकतात.

या कारमध्ये एक 1.0 लिटर आणि 1.2 लिटरचे पेट्रोल इंजिन देण्यात आलेले आहे व या कारमध्ये पाच स्पीड एएमटी/ ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय मिळतो. वॅगनआर या कारच्या ऑटोमॅटिक व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत सहा लाख 49 हजारपासून सुरू होते.

4- मारुती सुझुकी एक्सप्रेसो ही एक चांगल्या पद्धतीची ऑटोमॅटिक कार असून यामध्ये तुम्हाला चांगली स्पेस मिळते तसेच या कारमध्ये 1.0 लिटरचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे व पाच स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

शहरातील ट्रॅफिकमध्ये चालवण्यासाठी ही एक उत्तम कार आहे व हीची किंमत पाच लाख 71 हजार रुपयांपासून सुरू होते. प्रवाशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या कारमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, बेल्ट आणि डिस्क ब्रेक देण्यात आलेले आहेत.

5- मारुती सुझुकी अल्टो के 10- ही एक दमदार फॅमिली कार आहे. या कारमध्ये 1.0 लिटरचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे व या इंजिनला मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्याय दिला आहे.

ही कार 25 किलोमीटर पर्यंत मायलेज देते व या कारमध्ये स्पेस देखील बऱ्यापैकी आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम तसेच एअर बॅग, सीट बेल्ट आणि डिस्क ब्रेक अशा सुविधा देण्यात आलेल्या आहेत व या कारच्या एमटी व्हेरिएंटची किंमत पाच लाख 56 हजार रुपयांपासून सुरू होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe