भारतातील ‘या’ कंपन्यांमध्ये तुमची देखील गुंतवणूक आहे का? ‘या’ कंपन्यांमधील गुंतवणूक देईल दमदार परतावा, वाचा यादी

Ajay Patil
Published:
share market

कुठल्याही कंपन्यांमधील गुंतवणूक करण्याअगोदर त्या कंपनीचा एकूण आर्थिक अहवाल किंवा आर्थिक दृष्टिकोनातून अभ्यास करणे खूप गरजेचे असते. आर्थिक दृष्टिकोनातून संबंधित कंपनीची पार्श्वभूमी किंवा कामगिरी कशी आहे हे पाहूनच अशा कंपनीचे शेअर्स खरेदी करणे फायद्याचे ठरते.

कारण कुठलीही कंपनी आज काय काम करत आहे किंवा भविष्यात त्या कंपनीकडे कुठले प्रकल्प आहेत किंवा तिचे मार्केट इत्यादी सगळ्या गोष्टींचा सांगोपांग अभ्यास करणे खूप फायदेशीर ठरते. 2024 या आर्थिक वर्षांमधील एका अहवाल पाहिला तर त्यानुसार निफ्टी 50 कंपन्यांचा एकत्रित एकूण नफा 8.14 लाख कोटी रुपये होता व तो एका वर्षांपूर्वी 6.39 लाख कोटी रुपये होता.

म्हणजेच या नफ्यात वार्षिक आधारावर जर पाहिले तर तब्बल 27 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याकरिता आपण या लेखामध्ये अशा कोणत्या टॉप कंपन्या आहेत की त्या आर्थिक सुस्थितीत व फायद्यात असून त्यांची कामगिरी देखील उत्तम आहे.

 या आहेत भारतातील फायदेशीर कंपन्या

1- रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आपल्याला माहित आहे की ही कंपनी मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली काम करत असून 78 हजार 633 कोटी रुपयांसह सर्वात फायदेशीर कंपनी ठरली आहे. जर आपण या कंपनीचा वार्षिक आधारावर नफा पाहिला तर तो 60% ने वाढला असून या कंपनीच्या शेअर्समध्ये देखील एका वर्षात 23 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे.

2- एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया फायदेशीर कंपन्यांच्या यादीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचा दुसरा क्रमांक असून ही देशातील अग्रगण्य बँक असून या बँकेचा एकूण नफा 68 हजार 138 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरची प्राईस पाहिली तर ती एका वर्षात 49 टक्क्यांनी वाढली आहे.

3- एचडीएफसी बँक ही खाजगी क्षेत्रातील एक बडी बँक असून या बँकेचा एकूण नफा 65,466 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे व वार्षिक आधारावर 42 टक्क्यांनी नफ्यात वाढ झाली आहे. परंतु असे असताना देखील या बँकेचे शेअर्स बारा महिन्यात फक्त दोन टक्क्यांनीच वाढलेले आहेत.म्हणजे ही वाढ किरकोळ स्वरूपाची आहे.

4- ओएनजीसी हे तेल आणि गॅस क्षेत्रातील सरकारी कंपनी असून या कंपनीच्या नफ्यामध्ये तब्बल 61 टक्क्यांनी वाढ झाली आहे व इतकेच नाही तर शेअर मार्केटमध्ये देखील या कंपनीने खूप चांगली कामगिरी केलेली आहे. गेल्या बारा महिन्यात या कंपनीच्या पीएसयु शेअरची किंमत 70% ने वाढली असून या कंपनीचे मार्केट कॅपिटल सध्या 14.23 लाख कोटी रुपये आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe