पावसाळ्यामध्ये मुंबई फिरायचा आनंद घ्या; मुंबईतील ‘ही’ ठिकाणे पाहाल तर पुन्हा व्हाल मनाने रिफ्रेश

Ajay Patil
Published:
worli sea face

महाराष्ट्रमध्ये अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत की ज्या ठिकाणी देशातूनच नव्हे तर देशी पर्यटक देखील लाखोंच्या संख्येने दरवर्षी भेट देत असतात. यामध्ये विविध ठिकाणी असलेले धबधबे तसेच गडकिल्ले, पावसाळ्यामध्ये हिरवाईने नटलेले डोंगर माथे, तुडुंब भरून वाहणारी नदी नाले इत्यादी निसर्गाचे सौंदर्य पाहण्याची मजा काही निराळीच असते.

त्यातल्या त्यात बरेच जण पावसाळ्यामध्ये मुंबईसारख्या शहरात फिरण्याची प्लॅनिंग करतात. मुंबई शहर म्हटले म्हणजे ही देशाची आर्थिक राजधानी व महाराष्ट्राची राजधानी असून मुंबईमध्ये पावसाळ्यात फिरता येतील अशी अनेक पर्यटन स्थळे आपल्याला पाहायला मिळतात.

पावसाळ्यामध्ये तर तुमचा देखील कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत मुंबई फिरायला जायचा प्लॅन असेल तर तुम्ही काही पर्यटन स्थळांना भेट देऊ शकतात.ज्या ठिकाणी वर्षभर पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. याच पर्यटन स्थळाविषयी माहिती आपण या लेखात बघू.

 मुंबईतील हे पर्यटन स्थळे आहेत पावसाळ्यात फिरायला उत्तम

1- मरीन ड्राईव्ह पावसाळ्यामध्ये मुंबईतील फिरण्यासाठी तुम्ही उत्तम ठिकाण शोधत असाल तर मरीन ड्राईव्ह हे पावसाळ्यात भेट देण्यासाठी एक उत्तम स्थळ आहे. मरीन ड्राईव्हला क्वीन्स नेकलेस म्हणून देखील ओळखले जाते व या नावाने हा भाग प्रसिद्ध आहे. तुम्ही जर मरीन ड्राईव्हला फिरायला गेला तर त्या ठिकाणी झिमझिम पडणाऱ्या पावसाळ्यात चहा घेत मस्तपैकी सूर्यास्त पाहण्याचा आनंद घेऊ शकतात. याशिवाय अनेक अंगानी मरीन ड्राईव्ह हा परिसर एक सुंदर परिसर म्हणून ओळखला जातो.

2- वांद्रे बँड स्टँड जर तुम्ही मुंबईला गेला तर बँड स्टॅन्ड येथे भेट देणे गरजेचे आहे. कारण या ठिकाणी बसून तुम्ही अरबी समुद्राचे विशाल स्वरूप पाहू शकतात आणि याच परिसरामध्ये बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलाकारांची घरी देखील तुम्ही पाहू शकतात. या ठिकाणी असलेल्या किल्ल्याच्या अवशेषांवर थोडे उंच चढून तुम्ही गेलात तर त्या ठिकाणहून तुम्ही समुद्राचे व मुंबई शहराचे अद्भुत आणि विलक्षण दृश्य पाहू शकतात.

3- कार्टर रोड, वांद्रे कार्टर रोड हे मुंबईतील एक प्रसिद्ध आणि सुंदर असे ठिकाण असून या ठिकाणी जर तुम्ही भेट दिली तर तुम्हाला शेजारी असलेल्या चकचकीत कॅफेमध्ये बसून अरबी समुद्र पाहता येतो. मुंबईमध्ये पावसाळ्यात फिरण्याचा प्लॅनिंग असेल तर कार्टर रोडला भेट देणे खूप गरजेचे आहे व हे पावसाळ्यात भेट देण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. अनेक कलाकारांची या ठिकाणी निवासस्थान आहेत.

4- जुहू चौपाटी किंवा जुहू बीच पावसाळ्यामध्ये जर तुम्ही मुंबईत फिरायला गेलात का तुम्हाला समुद्रकिनाऱ्यावर गरमागरम खाद्यपदार्थ खाण्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही जुहू बीचला घेऊ शकतात. तुम्ही जेव्हा जुहू बीचला भेट द्याल तेव्हा या बीचच्या प्रवेशद्वारावर असलेल्या चाट कॉर्नर मध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे स्ट्रीट फूड खायला मिळतात.

5- वरळी सीफेस तुम्ही जर मुंबईला गेला  आणि वरळी सी फेसला भेट दिली नाही तर मुंबईचे दर्शन पूर्ण होत नाही. या ठिकाणी हाजी अली दर्गा तसेच वरळीचा किल्ला आणि वांद्रे वरळी सीलिंकचे सुंदर दृश्य पाहण्यासाठी आणि या ठिकाणी समुद्राच्या भरतीच्या दरम्यान उसळणाऱ्या उंच लाटा पाहण्यासाठी प्रामुख्याने हा परिसर ओळखला जातो. तुम्हाला जर एकांत ठिकाण हवे असेल तर तुम्ही वरळी सी फेसला भेट देऊ शकतात.

6- गेटवे ऑफ इंडिया गेटवे ऑफ इंडिया आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. गेट ऑफ इंडिया एक जागतिक वारसा स्थळ असलेले ठिकाण आहे व या ठिकाणी जेव्हा पाऊस कोसळत असतो तेव्हा भेट देणे एक विलक्षण अनुभव ठरतो. या ठिकाणी असलेले जगातील प्रसिद्ध ताज हॉटेल देखील तुम्हाला पाहता येते.

7- पवई तलाव पवई तलाव हे मुंबई शहराच्या उत्तरेकडील उपनगरातील एक कृत्रिम तलाव असून डोंगरांनी वेढलेले  ठिकाण आहे. या ठिकाणी असलेली हिरवळ तसेच मोठ्या प्रमाणावर वनस्पती व प्राण्यांची वास्तव्य असलेले हे ठिकाण असून पडणाऱ्या पावसात शांतता शोधणाऱ्या लोकांसाठी हे उत्तम ठिकाण आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe