Mukesh Ambani Facts : तुम्हाला माहित आहेत का जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या काही रंजक गोष्टी? वाचा नीता अंबानी यांच्याशी ओळख ते बरच काही….

dd

Mukesh Ambani Facts :- जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी कोणाला माहिती नाहीत. जगातील उद्योग जगतातील एक प्रसिद्ध नाव म्हणून मुकेश अंबानी यांच्याकडे पाहिले जाते. परंतु व्यक्ती कितीही मोठे राहिले तरी अशा व्यक्तींचे समोरील आपल्याला जी काही बाजू दिसते त्यापेक्षा त्यांची दुसरी बाजू खूप रंजक असते. नेमकी हीच बाब मुकेश अंबानी यांच्या बाबतीत देखील आहे. मोठेपणाचा कुठलाही लवाजमा न ठेवता अगदी साधेपणाने त्यांचा वावर आपल्यापैकी बऱ्याच व्यक्तींनी प्रत्यक्षात किंवा टेलिव्हिजनवर देखील पाहिला असेल.

उद्योग जगतामध्ये येण्या अगोदर त्यांनी केमिकल इंजिनिअरिंग चे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर साधारणपणे 1981 मध्ये ते त्यांचे वडील धीरूभाई अंबानी यांच्यासोबत उद्योग जगतात पाऊल ठेवत रिलायन्स पेट्रोलियम ची सुरुवात केली. पेट्रोलियम उद्योगचं नाही तर दूरसंचार क्षेत्रात देखील त्यांनी खूप प्रगती केली रिलायन्स कम्युनिकेशन लिमिटेड ची स्थापना केली.

अनेक प्रकारचे उद्योग उभारून उद्योग जगतामध्ये एक प्रसिद्ध नावलौकिक त्यांनी मिळवला. एवढे यश संपादन केलेल्या व्यक्तीची जर दुसरी बाजू पाहिली तर ती नक्कीच खूप रंजक अशी आहे. त्यांनी मध्यंतरीच्या कालावधीमध्ये एका दिलेल्या मुलाखतीमध्ये काही गोष्टी शेअर केल्या होत्या त्या आपण पाहू.

 मुकेश अंबानी यांच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी

1- आवडता खेळ हॉकी

खेळांच्या बाबतीत जर आपण मुकेश अंबानी यांची ओळख पाहिली तर ती मुंबई इंडियन्स या आयपीएलमधील त्यांच्या संघाच्या निमित्ताने होते. या माध्यमातून त्यांनी क्रिकेटला देखील खूप मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्याचे काम केलेले आहे. परंतु ते क्रिकेटव्यतिरिक्त त्यांच्या शालेय आणि कॉलेजच्या दिवसात त्यांनी हॉकी हा खेळ खूप आवडीने खेळला. हा खेळ त्यांचा आवडता खेळ आहे.

2-  कशाची वाटते भीती ?

मुकेश अंबानी यांचा विचार केला तर ते भिडस्त स्वभावाचे असून खूप लाजाळू आहेत आणि ते सार्वजनिक पणे काही विषय बोलायला घाबरतात. असे देखील त्यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये शेअर केले होते.

3- मुकेश अंबानी आणि नीता यांचा विवाह

मुकेश अंबानी आणि त्यांचे धर्म पत्नी नीता अंबानी यांच्या विवाह बद्दल म्हटले तर यांचा विवाह हा धीरूभाई अंबानी यांनीच करून दिला होता. एका ट्रॅडिशनल डान्स प्रोग्राम मध्ये धीरूभाईंनी निता यांना पाहिले होते. त्यानंतर त्यांनी निता यांना फोन केला. पण जेव्हा नीता यांना धीरूभाईंनी कॉल केला तेव्हा त्यांना वाटले की कोणीतरी हा प्रँक कॉल केला असे त्यांना वाटले. म्हणून त्यांनी चक्क दोनदा फोन ठेवला. परंतु तिसऱ्यांदा जेव्हा धीरूभाईंनी फोन केला तेव्हा  निता यांच्या वडिलांनी तो फोन उचलला व दोघांमध्ये काही वेळा संभाषण झाले. त्यानंतर यांना भेटण्यासाठी धीरूभाईंनी त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावले.

4- ट्राफिक मध्ये गाडी चालवताना निता यांना प्रपोज

याबद्दल नीता अंबानी यांनी म्हटले होते की नोव्हेंबर 1984 ची ही गोष्ट असून रात्रीचे आठ वाजले होते. यावेळी रस्त्यावर प्रचंड प्रमाणात ट्राफिक होती. या ट्राफिक मध्ये अचानक मुकेश यांनी त्यांचे कार थांबवली आणि नीता यांना प्रपोज केले. मुकेश यांनी निता यांना विचारले की तू माझ्याशी लग्न करशील का? प्रपोज केल्यानंतर त्याचे उत्तर देखील मुकेश यांनी लगेच मागितले.

या सगळ्या प्रकारामध्ये बाहेरून लोक ओरडायला लागले. काही लोक हॉर्न वाजवायला लागले. परंतु तरीदेखील मुकेश अंबानी यांनी गाडी न हलवता निता यांना विचारले की आत्ताच सांग माझ्याशी लग्न करशील का? मग निता यांनी त्यांच्या प्रपोजला होकार दिला. त्यानंतर तेही एकमेकांना खूप वेळ देऊ लागले. यामध्ये मुकेश अंबानी हे रोज सकाळी निता यांना लाल गुलाब भेट द्यायचे.

5- मुंबईच्या रस्त्यावरील पावभाजीचे मुकेश अंबानी आहेत फॅन

प्रसिद्ध उद्योगपती आणि कोट्याधीश असताना देखील मुकेश अंबानी यांना मुंबईतील रस्त्याच्या कडेला पावभाजी खाणे यामध्ये खूप आवड आहे. याबद्दल एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले होते की मुंबईत जर रात्री साडे अकरा नंतरचा सर्वात चांगला खाद्यपदार्थ असेल तर तो म्हणजे पावभाजी होय.

6- अँटिलिया निवासस्थान आहे विशेष

अँटिलीया हे मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असून त्याची किंमत वन बिलियन डॉलर्स इतके आहे. यामध्ये सत्तावीस फ्लोअर असून त्यातील सहा फ्लोर हे पार्किंग आणि गॅरेज यांचे आहेत. या पार्किंग मध्ये 167 गाड्या एका वेळेस पार्किंग होऊ शकतात. तसेच या घरामध्ये 50 सिटचे एक थेटर देखील असून तीन हेलिपॅड देखील आहेत. अशा अनेक सोयी सुविधांनी अँटिलिया सुसज्ज आहे.

7- मुकेश अंबानी यांचे कार कलेक्शन

मुकेश अंबानी यांच्याकडे अत्यंत महागड्या अशा कार असून यामध्ये प्रामुख्याने एस्टोन मार्टिन रॅपिड, बेंटली कॉन्टिनेन्टल फ्लाईंग स्पर, मर्सिडिज-बेंझ  मे बॅक 62 या महागड्या कार सोबतच त्यांच्याकडे स्वतःची एक व्हॅनिटी व्हॅन देखील आहे. या वॅनची किंमत 25 कोटी रुपये इतकी आहे. एवढेच नाही तर त्यांच्याकडे स्वतःचे प्रायव्हेट जेट विमान देखील आहे. त्यांच्या घराची किंमत आहे 14000 करोड, एक त्यांनी 319 जेट एअरबस खरेदी केले असून त्याची किंमत आहे 735.6 कोटी रुपये तसेच त्यांच्याकडे बीएमडब्ल्यू 760I ही कार देखील असून बुलेट प्रूफ अशी कार आहे. या कारची किंमत 10.3 कोटी रुपये आहे.

8- झेड प्लस सुरक्षा

साहजिकच आहे की माणूस जेवढा श्रीमंत असतो त्या प्रमाणामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्यांना काळजी घ्यावी लागते. याकरिता मुकेश अंबानी यांच्याकडे झेड प्लस लेव्हल  सुरक्षा असून भारतामध्ये अगदी कमीत कमी लोक ही सुरक्षा घेतात किंवा त्यांना प्रदान केली जाते. भारतामध्ये साधारणपणे 10 ते 17 व्यक्तींना ही सिक्युरिटी पुरवले जाते. मुकेश अंबानी भारतातील पहिले उद्योगपती असे आहेत की त्यांना झेड प्लस सुरक्षा आहे. या सुरक्षेत 55 जवान असतात. ते उच्च दर्जाचे प्रशिक्षित असतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe