Tourist Place In India:- आपल्यापैकी बऱ्याच लोकांना प्रवास करणे खूप आवडते व असे प्रवासाची आवड असलेले लोक वर्षाच्या वेगवेगळ्या कालावधीमध्ये भारतातील आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी भेट देतात. काही लोकांना तर पर्यटनाची खूप मोठ्या प्रमाणावर आवड असते व असे व्यक्ती जेव्हा वेळ मिळेल तेव्हा निसर्ग समृद्ध अशा पर्यटन स्थळांना भेट देतात
व काही कालावधी निसर्गाच्या सानिध्यात घालवतात.अगदी याचप्रमाणे तुमचा देखील या जुलै महिन्यात व पावसाच्या कालावधीत भारतात कुठे फिरायला जायचा प्लान असेल तर आपण या ठिकाणी अशा काही अलौकिक आणि अद्भुत व निसर्गाने समृद्ध पर्यटन स्थळांची माहिती घेणार आहोत जी तुमच्यासाठी फायद्याची ठरेल.
जुलै महिन्यात भेट देण्यासाठी बेस्ट आहेत भारतातील ही ठिकाणे
1- लडाख– जम्मू काश्मीर आणि उत्तरेकडील राज्यांचा बराच भाग पाहिला तर तो निसर्गाने समृद्ध आहे व या ठिकाणीच असलेले लडाख हे एक निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या ठिकाणी जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये पर्यटकांची फार मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. या ठिकाणाचे सौंदर्य मनमोहक आहे व त्यामुळे तुम्ही या जुलै महिन्याच्या कालावधीत लडाखला जाऊ शकतात.
2- केरळ– तुम्ही जर केरळ राज्याला भेट दिली तर या ठिकाणी तुम्ही कोझिकोड तसेच कोलम आणि कोची यासारख्या निसर्गाने समृद्ध असलेल्या पर्यटन स्थळांना भेट देऊ शकतात. पावसाच्या कालावधीमध्ये जर तुम्ही केरळला भेट द्याल तर या ठिकाणी तुम्हाला पसरलेली हिरवाई तुमच्या मनाला अगदी ताजे आणि टवटवीत करते.
3- शिमला– तुम्हाला जर बर्फाने झाकोळलेले पर्वत पाहायचे असतील तर तुम्ही शिमला या ठिकाणी भेट देऊ शकतात. शिमला येथे वास्तू कलेचे अप्रतिम नमुने तुम्हाला पाहायला मिळतात. तसेच या ठिकाणी असलेले पर्वत डोळ्यांचे पारणे फेडणारे आहेत. याशिवाय या ठिकाणी अनेक पर्यटनस्थळे असल्यामुळे पर्यटक शिमला या ठिकाणी भेट द्यायला प्रथम पसंती देतात.
4- ऋषिकेश– ऋषिकेश नैसर्गिक पर्यटनासाठी देखील उत्तम आहे व आध्यात्मिक पर्यटनासाठी देखील तितकेच महत्त्व आहे. त्यामुळे दोन्ही प्रकारचे पर्यटक या ठिकाणी भेट देऊ शकतात. आपल्याला माहित असेलच की हरिद्वार यालाच ऋषिकेश म्हणून देखील ओळखले जाते. योगाचे शहर म्हणून ऋषिकेशला संपूर्ण जगात ओळख आहे.
5- गोवा– गोवा हे प्रत्येकाला माहिती आहे व आपल्यापैकी किती जणांनी या ठिकाणी भेट दिली असेलच. गोव्यात असलेले विस्तीर्ण आणि सुंदर असे समुद्रकिनारे आणि त्या ठिकाणची नाईटलाईफ खास तरुणांना वेड लावणारी आहे. तुम्हाला जर मित्रांसोबत ट्रीप प्लान करायचे असेल तर तुमच्यासाठी गोवा हा एक उत्तम पर्याय आहे व या ठिकाणाचे निसर्ग सौंदर्य जुलै महिन्यामध्ये म्हणजेच पावसाळ्याच्या कालावधीत खूप अनोखे असे दिसते.
6- तीर्थन व्हॅली– तुम्हाला जर नद्याचा नजारा पाहायचा असेल व नदीकाठी आराम करायचा असेल तसेच कॅम्पिंग करायची असेल तर हे ठिकाण खूप उत्तम आहे. ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क मधील तीर्थन नदीच्या नावावरून या दरीला हे नाव देण्यात आलेले आहे. या ठिकाणचे खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही रात्रीच्या वेळेला या ठिकाणी तार्यांनी सजलेले सौंदर्य पाहू शकतात.
7- माउंट आबू– राजस्थान मधील हे एकमेव असे हिल स्टेशन असून त्या ठिकाणी असलेल्या उष्णतेपासून तुम्हाला आरामदायी आणि सुखद अनुभव देण्यासाठी खूप महत्त्वाचे ठिकाण आहे. या ठिकाणी असलेले चित्त थरारक लँडस्केप आणि विविध प्रकारच्या वनस्पती आपले मन वेधून घेतात.
माउंट आबू या ठिकाणी तुम्ही भेट दिल्यानंतर तुम्हाला इतिहासाच्या अनेक खुणा आणि स्थापत्यशास्त्राने समृद्ध असे अनेक प्राचीन ठिकाणे पाहायला मिळतात. जुलै महिन्यामध्ये तुम्हाला भेट देण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
8- कामशेत– तुम्हाला जर पॅराग्लायडिंगची आवड असेल तर तुम्ही कामशेत हा पर्याय निवडू शकता. यासोबत या ठिकाणी असलेले नयनरम्य नैसर्गिक दृश्यांचा आनंद घेण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. ज्या पर्यटकांना पॅराग्लायडिंगची आवड असते अशा लोकांना हे महाराष्ट्रातील हिल स्टेशन खूप आवडते.