सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून जवळपास मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्याचे चित्र आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सगळीकडे रिमझिम पाऊस सुरू असतो व निसर्गाने देखील हिरवा शालू पांघरलेला असतो. या सगळ्या निसर्गरम्य वातावरणामध्ये मनाला भुरळ पडते.
रिमझिम पडणाऱ्या पावसामध्ये मस्त बाहेर फिरायला जाऊन पावसात भिजून चहाचा घोट पावसाचा आनंद घेणे हा अनुभव सगळ्यांपेक्षा खूप वेगळा असतो. त्यामुळे बरेच जण पावसाळ्याच्या कालावधीमध्ये एका दिवसासाठी बाहेर फिरायचा प्लान बनवतात.

म्हणजेच वन डे ट्रिप प्लान करतात व ही ट्रीप कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत प्लान केली जाते. महाराष्ट्र मध्ये अशी अनेक निसर्गरम्य अशी ठिकाणी असून निसर्गाने समृद्ध असे आहेत. त्यामुळे या लेखात आपण अशा काही ठिकाणांची माहिती घेणार आहोत जी एका दिवसाच्या ट्रीपकरिता खूप महत्त्वाची व मनाला भूरळ घालणारे ठरतील.
वन डे ट्रिप साठी महाराष्ट्रातील या ठिकाणांना द्या भेट
1- माथेरान– माथेरान हे महाराष्ट्रातील एक निसर्गरम्य ठिकाण असून मुंबई शहरापासून शंभर किलोमीटर अंतरावर असून एक डोंगरी शहर म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी असलेले शांत वातावरण आणि निसर्गरम्य दृश्याकरिता हे ठिकाण संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.
जर तुम्हाला वन डे ट्रीप प्लान करायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी जाऊन असलेल्या टॉय ट्रेनने प्रवास करून निसर्गाचा आनंद घेऊ शकतात. एवढेच नाही तर या ठिकाणी तुम्ही नौकाविहार आणि हॉर्स रायडिंगचा आनंद देखील घेऊ शकतात.
2- अलिबाग– अलिबाग हे एक सुंदर असे शहर असून मुंबईपासून जवळपास शंभर किलोमीटर अंतरावर आहे व अलिबाग हे समुद्रकिनाऱ्यावर वसलेले शहर आहे. अलिबागला गेल्यावर तुम्हाला अनेक सुंदर समुद्रकिनारे पाहायला मिळतात.
या ठिकाणी असलेले नागाव बीच तसेच अक्षी बीच खूप पाहण्यासारखे आहे. या ठिकाणी तुम्ही मनसोक्त जल क्रीडा तसेच सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकतात. खवय्यांसाठी या ठिकाणी असलेले स्वादिष्ट समुद्रीखाद्यपदार्थांचा आनंद काही वेगळाच असतो.
3- लोणावळा–खंडाळा– लोणावळा आणि खंडाळा ही देखील खूप सुंदर आणि निसर्गाने समृद्ध अशी ठिकाणे असून मुंबईपासून शंभर ते 120 किलोमीटर अंतरावर आहेत.
ही दोन्ही ठिकाणे डोंगरावर वसली असून या ठिकाणी पावसाळ्यामध्ये धबधबे तसेच हिरवीगार डोंगरे आणि थंडगार हवामानाचा अनुभव घेता येतो. तुम्हाला जर बोटिंग तसेच ट्रेकिंगची आवड असेल तर तुम्ही लोणावळा आणि खंडाळा या ठिकाणी घेऊ शकतात.
4- मुंबई–पुणे महामार्ग– आपल्यापैकी बऱ्याच जणांना निसर्गाच्या सानिध्यामध्ये वेळ घालवण्याची इच्छा असते व दररोजच्या धावपळीच्या जीवनशैली पासून आणि शहरी गोंगाटापासून आरामात काही क्षण घालवता यावेत अशी इच्छा असते. तुमची देखील अशा प्रकारची इच्छा असेल तर तुम्ही मुंबई ते पुणे महामार्गावरून प्रवास करून तुमची ही इच्छा पूर्ण करू शकता.
जर तुम्ही या महामार्गावरून प्रवास कराल तेव्हा तुम्हाला लोणावळा तसेच खंडाळा, कर्जत आणि सिंहगड किल्ला यासारखे निसर्गरम्य ठिकाणे बघता येणे शक्य आहे व या ठिकाणी असलेल्या निसर्गरम्य दृश्यांचा तुम्ही मनसोक्त आनंद घेऊ शकतात व थांबून या ठिकाणी शांततेचा अनुभव देखील घेऊ शकतात.