मराठी माणूस म्हटले म्हणजे साधारणपणे नोकरी करून दर महिन्याला येणारा पगारावर स्थिर आणि समाधानाने आयुष्य जगणारा व्यक्ती असे वर्णन केले तरी वावगे ठरणार नाही. व्यवसाय म्हटले म्हणजे मराठी माणूस जास्त करून व्यवसायांच्या नादी लागत नाहीत. परंतु आता मराठी माणसाची ही प्रतिमा पूसली जात असून अनेक मराठी उद्योजक अनेक क्षेत्रांमध्ये त्यांच्या त्यांच्या व्यवसायात यशाला गवसणी घालत असून उत्तम अशी आर्थिक समृद्धी देखील मिळवली आहे.
व्यवसाय म्हटले म्हणजे कठोर परिश्रम, व्यवसाय वाढवण्यासाठी सतत करावा लागणारा अभ्यास आणि त्या दृष्टीने नियोजन, व्यवसायाचे गणित बसवताना बाजारपेठेचा मागोवा घेत राहणे, अनेक प्रकारची आर्थिक अडीअडचणी आले आणि तोटा झाला तरी अभ्यास पूर्ण रीतीने या संकटातून मात करण्याची क्षमता इत्यादी गुण असावेच लागतात. व्यवसायामध्ये स्वतःच्या मर्जीनुसार आपल्याला जगता तर येते परंतु स्वतः निर्णय घेण्याची सुविधा व्यवसायामध्ये असल्यामुळे चांगले निर्णय लवकर व्यवसाय स्थिरस्थावर करायला मदत करू शकतात.
आर्थिक उत्पन्नाच्या बाबतीत जर नोकरी आणि व्यवसायाची तुलना केली तर व्यवसायामध्ये सर्वाधिक जास्त पैसा मिळतो. त्यामुळे बरेच मराठी तरुण आता नोकरीच्या मागे न लागता एखाद्या व्यवसायात पडून तो व्यवसाय वृद्धिंगत करत आर्थिक विकास साधताना दिसून येत आहेत. अशाच एका मराठी व्यक्ती जी कोल्हापूर मध्ये सर्वसामान्य घरात जन्माला आली. परंतु जीवनातील असंख्य अडीअडचणी तसेच समाज काय म्हणेल याची परवा न करता हॉटेल व्यवसायामध्ये आला व यशाला गवसणी घातली.
कोल्हापूर मधील राहुल सावंत यांची कहाणी
महाराष्ट्र मध्ये अनेक परप्रांतीय अनेक छोटे मोठे व्यवसाय करतात. अगदी पाव वड्याची गाडी जरी आपण पाहिली तरी परप्रांतीयांची दिसून येते. तसेच हॉटेल व्यवसायामध्ये देखील मारवाडी तसेच गुजराती समाजाचा अंतर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. परंतु या सगळ्या गोष्टींना छेद देत कोल्हापूरचे राहुल सावंत यांनी अनेक संकटांवर मात करत स्वतःचे 7/12 नावाचे हॉटेल उभे केले असून ते यशस्वीपणे चालवले देखील आहे.
ही हॉटेल सुरू करण्या अगोदरची त्यांची कहाणी ही खूप रोमहर्षक आणि प्रेरणादायी अशी आहे. एका माध्यमात दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांची रोमहर्षक कहाणी व प्रवासाबद्दल काही माहिती शेअर केली. राहुल सावंत यांचा जन्म कोल्हापूर मध्ये एक सर्वसामान्य कुटुंबामध्ये झाला. त्यांचे वडील हे रिक्षा ड्रायव्हर होते व घरची परिस्थिती ही सर्वसाधारण होती. राहुल सावंत हे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून खूप मागे राहिले व ते दहावीत नापास झाले.
दहावी नापास झाल्यानंतर त्यांनी मिळेल ती कामे करायला सुरुवात केली. अक्षरशः झेरॉक्स सेंटर असो किंवा मोबाईलचे दुकान या ठिकाणी त्यांनी कामे केली.तसेच एमआयडीसी मध्ये हमाली काम देखील केले. परंतु अंगात कष्ट करण्याची उर्मी असल्यामुळे एमआयडीसी मध्ये दिवसा हमाली व रात्री चहाची टपरी लावून ते अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी झटत होते. या सगळ्या परिस्थितीमध्ये 2000 यावर्षी सरकारी कार्यालयामध्ये सातबारा लिहिण्याची कामे त्यांनी सुरू केली व पुढे पाच वर्ष हेच काम केले. परंतु हळूहळू एक एक व्यवसायाला सुरुवात करत त्यांनी त्यानंतर इस्टेट एजंट म्हणून काम करण्याचे ठरवले.
या माध्यमातून ते इन्वेस्टर आणि बिल्डर लाईन म्हणजेच बांधकाम व्यवसाय मध्ये शिरले व त्यामध्ये त्यांनी खूप मोठा आर्थिक फायदा देखील मिळवला. सगळे व्यवस्थित सुरू असताना मध्यंतरीच्या कालावधीत कोरोना आला व इतर व्यवसायांप्रमाणे त्यांचा हा व्यवसाय देखील बंद झाला. परंतु नाउमेद न होता पुन्हा ते भरारी घ्यायला तयार झाले व हॉटेल व्यवसायात उतरले. परंतु या व्यवसायात आल्यानंतर त्यांना खूप मोठे अडचणींना तोंड द्यायला लागले.
समाजाकडून होणारी बदनामी देखील त्यांनी सहन केली. लोकांनी त्यांना अनेक पद्धतीने खूप त्रास दिला. परंतु मनात जिद्द आणि काहीतरी करण्याची उर्मी असेल तर माणूस कुठल्याही प्रकारच्या संकटांना डगमगत नाही. अगदी त्याच पद्धतीने राहुल सावंत हे हिंमतीने उभे राहिले. जिद्दीने उभेच नाही तर हॉटेल 7/12 देखील यशस्वीपणे त्यांनी उभे केले व ते आता यशस्वीपणे चालवत देखील आहेत. अशा पद्धतीने जिद्दीने ते कुठल्याही संकटाला न घाबरता चालत राहिले व आज यशस्वी झाले. त्यांचं एक वाक्य नक्कीच मनात घर करून राहते ते म्हणजे ” हिसखाऊन खाणाऱ्याचं कधी पोट भरत नाही आणि वाटून खाणारा कधीही उपाशी राहत नाही” हे होय.