कमी शेती आणि फळबागांच्या कामांसाठी उत्कृष्ट ठरेल 750 किलो वजन उचलण्याची क्षमता असलेले ‘हे’ मिनी ट्रॅक्टर! वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

बरेच शेतकरी आता मिनी ट्रॅक्टर खरेदीकडे वळल्याचे चित्र आहे. याप्रकारे तुमच्याकडे कमी शेती असेल आणि फळबाग असेल व याकरिता तुम्ही मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या करिता व्हीएसटी MT 270 ॲग्रीमास्टर हे ट्रॅक्टर एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

Ajay Patil
Published:
vst mini tractor

VST MT 270 Agrimaster Mini Tractor:- भारतीय ट्रॅक्टर बाजारपेठ जर बघितली तर यामध्ये अनेक कंपन्यांनी उत्कृष्ट ट्रॅक्टर भारतीय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले असून ज्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करायचे असते ते त्यांचा आर्थिक बजेट आणि शेतीचे क्षेत्र इत्यादी पाहून ट्रॅक्टरची निवड करत असतात.

तसेच सध्या महाराष्ट्रामध्ये पाहिले तर फळबागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे फळबागातील अंतर मशागतीच्या कामांकरिता मोठ्या ट्रॅक्टर ऐवजी मिनी ट्रॅक्टर खूप फायदेशीर ठरतात.

त्यामुळे बरेच शेतकरी आता मिनी ट्रॅक्टर खरेदीकडे वळल्याचे चित्र आहे. याप्रकारे तुमच्याकडे कमी शेती असेल आणि फळबाग असेल व याकरिता तुम्ही मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या करिता व्हीएसटी MT 270 ॲग्रीमास्टर हे ट्रॅक्टर एक उत्तम पर्याय ठरू शकतो. यास मिनी ट्रॅक्टरची थोडक्यात माहिती या लेखात बघू.

काय आहेत व्हीएसटी MT 270 ऍग्रीमास्टर मिनी ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये?
या मिनी ट्रॅक्टरमध्ये TREM IIIA, नॅचरल, 1306 सीसी क्षमतेमध्ये चार सिलेंडरसह एस्पिरिटेड चार स्ट्रोक इंजिन देण्यात आले आहे. इंजिन 27 अश्‍वशक्तीसह ७२ एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कंपनीने या मिनी ट्रॅक्टरला ड्राय टाईप एयर फिल्टर दिले असून त्यामुळे या ट्रॅक्टरच्या इंजिनचे धुळी पासून बचाव होतो.

या ट्रॅक्टरची कमाल पिटीओ पावर २२ एचपीचे असून त्याचे इंजिन 3000 आरपीएम निर्माण करते. या मिनी ट्रॅक्टरचा फॉरवर्ड स्पीड 1.48- 24.74 किलोमीटर पर अवर इतका असून

त्याचा रिव्हर्स स्पीड 1.89 ते 8.30 किलोमीटर पर अवर इतका ठेवण्यात आला आहे. या ट्रॅक्टरची हायड्रोलिक क्षमता 750 kg इतकी ठेवण्यात आली असल्यामुळे शेतकऱ्यांना एकावेळी जास्त पिकांची वाहतूक करता येते. या ट्रॅक्टरचा व्हीलबेस १४२० मीमी इतका आहे.

व्हीएसटी MT 270 ॲग्रीमास्टर ट्रॅक्टरची इतर वैशिष्ट्ये
या मिनी ट्रॅक्टरमध्ये कंपनीने पावर स्टेरिंग दिली असून त्यामुळे शेतात देखील सुरळीतपणे ड्रायव्हिंग करण्याची क्षमता प्राप्त होते. कंपनीने हा ट्रॅक्टर 8 फॉरवर्ड+ दोन रिव्हर्स गिअरसह गिअरबॉक्ससह येतो.

या ट्रॅक्टरमध्ये सिंगल क्लच आणि स्लाइडिंग मेष प्रकारचे ट्रान्समिशन देण्यात आले आहे. हा मिनी ट्रॅक्टर ऑइल एमर्स डिस्क ब्रेकसह येतो जो टायरवर मजबूत पकड ठेवण्यासाठी सक्षम आहे. चार व्हील ड्राईव्हमध्ये येणारा हा मिनी ट्रॅक्टर चारही टायर्सना पूर्णपणे शक्ती प्रदान करण्याचे महत्त्वपूर्ण काम करतो.

किती आहे या मिनी ट्रॅक्टरची किंमत?
जर आपण भारतीय ट्रॅक्टर बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून बघितले तर या व्हीएसटी MT 270 ॲग्रीमास्टर मिनी ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत पाच लाख 36 हजार रुपये ते पाच लाख 75 हजार रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

तसेच भारतातील काही ठिकाणी आरटीओ नोंदणी आणि रोड टॅक्समुळे या ट्रॅक्टरची ऑन रोड किंमत बदलू शकते. तसेच हे मिनी ट्रॅक्टर आणि टीलर या ट्रॅक्टरसह दोन वर्षाची वारंटी देखील मिळते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe