सध्या अनेक वाहन उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून अनेक वेगवेगळी कार्स तसेच बाईक उत्पादित केले जात असून ग्राहकांना आता वाहन खरेदीमध्ये अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत. कारमध्ये पाहिले तर अनेक इलेक्ट्रिक तसेच सीएनजी कारचे पदार्पण कार बाजारपेठेत झाले आहे.
अगदी याच पद्धतीने बाईक बाजारपेठ पाहिली तर यामध्ये देखील अनेक इलेक्ट्रिक बाइक्सने दमदार एन्ट्री केलेली आहे. याशिवाय बजाज सारख्या कंपनीने तर सीएनजी बाईक देखील मार्केटमध्ये लॉन्च केलेली आहे.

अगदी याच पद्धतीने आता या ऑगस्ट महिन्यामध्ये देखील नामांकित कंपन्यांच्या माध्यमातून बाईक लॉन्च केल्या जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला देखील बाईक खरेदी करायची असेल तर तुम्ही अगदी या महिन्यातील थोडे दिवस वाट पाहणे गरजेचे आहे.
या ऑगस्टमध्ये लॉन्च होणार या धमाकेदार बाईक
1-BSA गोल्ड स्टार– जर आपण टू व्हीलर मध्ये पाहिले तर बीएसए ही एक ब्रिटिश टू व्हीलर उत्पादक कंपनी असून या कंपनीच्या माध्यमातून अनेक वैशिष्ट्यपूर्ण अशा बाईक जागतिक पातळीवर लॉन्च करण्यात आलेले आहेत. अगदी याच प्रमाणे आता BSA ही कंपनी 15 ऑगस्ट रोजी बीएसए गोल्ड स्टार नावाची बाईक लॉन्च करणार असून ही नवीन बाईक जावा तसेच रॉयल एनफिल्डच्या बाईकशी कडवी टक्कर देईल.
कंपनीचे या नवीन बीएसए गोल्ड स्टार 650 बाईक मध्ये 650 सीसी सिंगल सिलेंडर इंजिन मिळू शकते जे 45 बीएचपी पावर आणि 55 एनएम टॉर्क जनरेट करते. याशिवाय या बाईकला 17 आणि 18 इंच टायर देण्यात आले आहेत व अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, सिंगल सीट तसेच ड्युअल डिस्क ब्रेक,
41 मीमी टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स, डिजिटल स्पीडोमीटर तसेच एलईडी हेड लॅम्प व एलईडी हेडलाईट यासारखे वैशिष्ट्ये देण्यात आलेले आहेत. या बाईकची किंमत अजून पर्यंत किती राहील याबाबत कुठलीही माहिती नाही. परंतु एक अंदाज वर्तवला तर ती तीन लाख पर्यंत असू शकते अशी शक्यता आहे.
2- रॉयल एनफिल्ड क्लासिक 350- रॉयल एनफिल्ड नवीन J सिरीज प्लेटफॉर्मर नवीन फेसलिफ्टेड क्लासिक 350 लॉन्च करणार असून साधारणपणे ही बाईक 12 ऑगस्ट 2024 रोजी लॉन्च केली जाणार आहे. या बाईकच्या बॉडी टॅंक ते ग्राफिक्स पर्यंत अनेक बदल केले जाणार आहेत.
या नवीन मॉडेलमध्ये 350cc इंजिन दिले जाईल व हे 20.2 बीएचपी पावर आणि 27 एनएम टॉर्क जनरेट करते. मायलेज बाबत रॉयल एनफिल्डने दवा केला आहे की ही बाईक 32 किलोमीटर पर लिटर पर्यंत मायलेज देईल.
3- ओला इलेक्ट्रिक बाइक– ओला इलेक्ट्रि च्या माध्यमातून 15 ऑगस्ट रोजी एक नवीन बाईक लॉन्च केली जाणार आहे. हे नवीन मॉडेल एन्ट्री लेव्हल सेगमेंटमध्ये असणारा असून याची किंमत कमी असणार आहे
व मायलेज जास्त असू शकते. रेंज बद्दल अजून काहीही माहिती मिळालेली नाही. परंतु ही बाईक लॉन्च झाल्यानंतर या बाईकची किंमत,असलेली वैशिष्ट्ये किंवा रेंज याबद्दलची ठळक माहिती मिळू शकणार आहे.













