Best Tractor For Farmer:- शेती क्षेत्रामध्ये ट्रॅक्टरचा वापर आता मोठ्या प्रमाणावर होऊ लागला असून शेतीची पूर्व मशागती पासून तर थेट पीक काढणी पर्यंतची अनेक कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जातात. तसेच कृषी क्षेत्रामध्ये अनेक यंत्रे विकसित करण्यात आली असून त्यातील बहुतेक यंत्र ही ट्रॅक्टरचलीत असल्याने ट्रॅक्टरचा उपयोग आणखीनच वाढतो.
त्यामुळे आता शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर खरेदीकडे असल्याचे आपल्याला दिसून येते. भारतामध्ये अनेक कंपन्यांचे ट्रॅक्टर सध्या उपलब्ध असून शेतकरी त्यांना परवडणाऱ्या किमतीत आणि चांगले वैशिष्ट्य असलेल्या ट्रॅक्टर खरेदीला प्राधान्य देतात.
यामध्ये जर आपण पावरट्रेक कंपनीचे डीजीट्रॅक पीपी-46i ट्रॅक्टर बघितले तर हे शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याचे ट्रॅक्टर असून शेतकऱ्यांची पहिली पसंती बनली आहे.
विशेष म्हणजे हे ट्रॅक्टर कमी डिझेलमध्ये खूप जास्त प्रकारे काम करू शकते व शेतकऱ्यांची दररोज एक हजार रुपयांपर्यंतची अतिरिक्त बचत देखील करू शकते. त्यामुळे या लेखात आपण या ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये समजून घेऊ.
काय आहे डीजीट्रॅक पीपी-46i ट्रॅक्टरचे वैशिष्ट्ये?
मिळालेल्या माहितीनुसार, हे ट्रॅक्टर 50 अश्वशक्ती क्षमतेचे असल्यामुळे कुठलेही कृषी उपकरणे अतिशय सहजतेने चालवण्यास ते सक्षम आहे व चांगला परफॉर्मन्स देते.
याबद्दल कंपनीचा दावा आहे की कोणत्याही कंपनीने 50 एचपी श्रेणीतील असा ट्रॅक्टर आजपर्यंत तयार केलेला नाही. या ट्रॅक्टरची किंमत आठ लाख 50 हजार रुपये आहे व हा ट्रॅक्टर 46 हॉर्स पावर ने तयार करण्यात आला आहे.
यामुळे सुपर सिडर तसेच स्ट्रॉ रिपर आणि रोटावेटर चालवण्यासाठी हे अतिशय उपयुक्त असे ट्रॅक्टर आहे. या ट्रॅक्टरचे एकूण वजन 24 क्विंटल 80 किलो असून उत्कृष्ट बॅलन्स ठेवून हे ट्रॅक्टर तयार करण्यात आले आहे. तसेच या ट्रॅक्टरला 60 लिटर क्षमतेची डिझेल टाकी देण्यात आली आहे.
तसेच या ट्रॅक्टरच्या हायड्रोलिक पावर बद्दल बघितले तर त्याचे हायड्रोलिक क्षमता दोन हजार किलो आहे. तसेच या ट्रॅक्टरला उत्कृष्ट बॅलन्स पावर स्टेरिंगसह डिझाईन केले गेले आहे. या ट्रॅक्टरची लांबी 3785 मीमी आणि रुंदी १९०० मीमी आहे. तसेच यामध्ये डबल क्लच देण्यात आला आहे व पीटीओचलित यंत्रे सहजपणे चालवण्यास सक्षम आहे.
तसेच या ट्रॅक्टरला वेगळ्या पद्धतीचा लूक दिला असून साधारणपणे ब्लॅक सिल्वर रंगाने डिझाईन करण्यात आले आहे व त्यामुळे त्याला ब्लॅक टायगर असे देखील म्हणतात. सुपर सिडर हे यंत्र चालवण्यासाठी हे ट्रॅक्टर अतिशय उपयुक्त आहे. या ट्रॅक्टरमध्ये चार सिलेंडरचा वापर करण्यात आला असल्याने हे ट्रॅक्टर उत्कृष्ट असे परफॉर्मन्स देते.