Toll Tax : गेल्या काही वर्षांमध्ये देशभरात महामार्गांचे मोठे जाळे विकसित करण्यात आले आहे. महाराष्ट्रात देखील रस्त्यांचे एक मोठे नेटवर्क तयार करण्यात आले आहे. खरे तर देशातील प्रत्येक महामार्गावर प्रवास करताना तुम्ही टोल प्लाझा पहिला असेल.
नवीन महामार्ग तयार झाला की त्यावर टोल प्लाजा उभारला जातो आणि वाहन चालकांकडून टोलची वसूली केली जाते. टोल प्लाजा मधूनच जे उत्पन्न मिळतं ते उत्पन्न महामार्गावरील पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी वापरले जाते सोबतच महामार्गाच्या देखभाली साठी सुद्धा या उत्पन्नाचा वापर केला जातो.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून टोल वसुलीबाबत नियम तयार करण्यात आले आहेत. या नियमानुसार भारतातील सर्वच व्यक्तींकडून समान टोल आकारावा लागणार आहे. तथापि, सरकारने काही लोकांना टोल माफी दिलेली आहे.
म्हणजेच भारतातील कोणत्याही महामार्गावर या लोकांनी प्रवास केला तर त्यांना टोल भरावा लागत नाही. नक्कीच तुम्हाला आता हा प्रश्न पडला असेल की कोणत्या लोकांना सरकारकडून टोल माफी देण्यात आली आहे.
तर आज आम्ही तुमच्यासाठी अशा लोकांची एक यादी घेऊन आलो आहोत. कोणकोणत्या लोकांना सरकारकडून टोलमाफी देण्यात आली आहे याचेच आज आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत.
या लोकांना टोल लागत नाही
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, भारतात रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि शववाहीका यांना टोलमाफी देण्यात आली आहे. याशिवाय दुचाकी वाहनांना टोल प्लाजावर टोल द्यावा लागत नाही. एवढेच नाही तर काही राज्यांमध्ये पत्रकारांना सुद्धा टोल माफी देण्यात आली आहे. मात्र ही टोलमाफी फक्त मान्यता प्राप्त पत्रकारांना लागू आहे.
याव्यतिरिक्त इतरही अनेक लोक आहेत ज्यांना सरकारकडून टोल माफी देण्यात आली आहे. आम्ही खाली 21 पदांची नावे दिली आहेत, ज्यांना सरकारकडून टोल माफी देण्यात आली आहे. या पदावर कार्यरत असणाऱ्या लोकांना भारतातील कोणत्याही हायवेवर विना टोल देता प्रवास करता येतो.
1) भारताचे राष्ट्रपती
2) भारताचे उपराष्ट्रपती
3) भारताचे पंतप्रधान
4) सरन्यायाधीश
5) लोकसभेचे अध्यक्ष
6) भारत सरकारचे सचिव
7) लोकसभेचे सचिव
8) राज्यसभेचे सचिव
9) लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे प्रमुख
10) कमांड क्षेत्रांचे कमांडर
11) राज्यांचे मुख्य सचिव
12) राज्य विधानसभा/विधान परिषदेचे सचिव
13) संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी (जे गणवेशात ड्युटीवर जातात आणि येतात)
14) पोलिस विभागाचे अधिकारी (जे गणवेशात ड्युटीवर जातात आणि येतात)
15) राज्यांचे राज्यपाल
16) राज्यांचे मुख्यमंत्री
17) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
18) उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
19) संसद सदस्य (खासदार)
20) राज्यांच्या विधान परिषदांचे सदस्य
21) विधानसभा सदस्य (आमदार) ( स्थानिक नेत्यांना फक्त राज्यातच सूट मिळते.)