टोमॅटो लागवड : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या ‘या’ जातीची लागवड करा, 60 टनापर्यंत मिळणार उत्पादन

Published on -

Tomato Farming : आगामी काही दिवसात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. राज्यातील शेतकरी बांधव या खरीपात सोयाबीन, कापूस, भात, तूर, मका, कांदे यासारख्या पिकांची लागवड करणार आहेत. यासोबतच अनेक शेतकरी भाजीपाला वर्गीय पिकांची देखील शेती करतात.

यामध्ये टोमॅटो पिकाची लागवड आपल्या राज्यात सर्वाधिक पाहायला मिळते. अशा परिस्थितीत जर यंदाच्या खरीप हंगामामध्ये टोमॅटो लागवड करायची असेल तर शेतकऱ्यांनी टोमॅटोच्या काही सुधारित जातींची लागवड केली पाहिजे.

जेणेकरून त्यांना खरीप हंगामातून पारंपारिक पिकाच्या तुलनेत अधिक उत्पन्न आणि कमाई करता येईल. दरम्यान, आज आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या काही सुधारित वाणाची माहिती जाणून घेणार आहोत.

टोमॅटोचे सुधारित वाण खालीलप्रमाणे

खरंतर यंदा मान्सून चांगलाच लांबला आहे. मात्र येत्या काही तासात मान्सूनचे राज्यात आगमन होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी सुखावला असून पीक पेरणीपूर्व जमिनीची मशागत करण्यात सध्या शेतकरी व्यस्त आहेत. तसेच बी-बियाण्यांची आणि खतांची देखील साठवणूक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

तसेच ज्या शेतकऱ्यांना टोमॅटोची लागवड करायची असेल ते जून अखेरपर्यंत टोमॅटोची रोपवाटिका तयार करणार आहेत कारण की, जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत टोमॅटोची लागवड करणे आवश्यक आहे. टोमॅटोची रोपवाटिका सुधारित वाणाच्या बियाणेची पेरणी करून तयार करावी. चला तर मग आता महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या तीन सुधारित वाणाची माहिती पाहूया. 

हे पण वाचा :- मोठी बातमी ! शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने घेतला ‘हा’ निर्णय, जीआर निघाला, वाचा…

 

फुले राजा :- महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि विकसित केलेली ही एक संकरित जात म्हणून शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. लोकप्रिय बनण्याचे कारण म्हणजे या जातीपासून शेतकऱ्यांना कमाल 60 टन प्रती हेक्टर उत्पादन मिळते. या जातीचा पीक परिपक्व कालावधी साधारणता 180 दिवसाचा असल्याची माहिती देण्यात आली आहे. शिवाय या जातीचे टोमॅटो लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी खूपच फायदेशीर राहते. म्हणजेच बाजारपेठ लांब असली तरी देखील टोमॅटो खराब होत नाहीत. या जातींचे टोमॅटो पीक फळे पोखरणारी अळी आणि विषाणूजन्य रोगास प्रतिकारक्षम असल्याचा दावा केला जातो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राज्यातील हवामान या जातीसाठी सर्वात अनुकूल आहे. म्हणून या जातीपासून चांगले उत्पादन शेतकऱ्यांना मिळत असून जाणकार लोक देखील अधिक उत्पादनासाठी विशेष ओळखल्या जाणाऱ्या या जातीची लागवड करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देतात.

फुले केसरी :- महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेला हा देखील एक महत्त्वाचा टोमॅटोचा संकरित वाण आहे. टोमॅटोची फुले केसरी ही देखील जात अधिक उत्पादनासाठी ओळखली जाते. मिळालेल्या माहितीनुसार, टोमॅटोच्या या संकरित वाणापासून शेतकऱ्यांना कमाल 57 टन प्रती हेक्टर एवढे उत्पादन मिळू शकते. हा देखील वाण विषाणूजन्य रोगास प्रतिकारक्षम असल्याचा दावा करण्यात आला आहे. निश्चितच अधिक उत्पादनासाठी ही देखील जात शेतकरी बांधव उत्पादित करू शकतात. ही जात महाराष्ट्रात लागवडीसाठी योग्य असून राज्यातील हवामान या जातीला मानवते परिणामी यातून शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन मिळते. 

हे पण वाचा :- तुम्हाला जमिनीचा, जागेचा नकाशा हवा आहे का ? मग ‘या’ पद्धतीने 2 मिनिटात मोबाईलवरच मिळवा ऑनलाईन नकाशा, वाचा संपूर्ण प्रोसेस

फुले जयश्री (चेरी टोमॅटो) :- चेरी टोमॅटोची जर शेतकऱ्यांना लागवड करायची असेल तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली फुले जयश्री ही जात त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. फुले जयश्री ही देखील टोमॅटोची एक संकरित जात असून ही देखील उच्च उत्पादन देणारी जात म्हणून महाराष्ट्रात ओळखली जाते. राज्यातील हवामान या जातीसाठी अनुकूल असल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात या जातीची शेती पाहायला मिळते. ही जात प्रती हेक्टर कमाल 55 टन पर्यंत उत्पादन देऊ शकते असा दावा केला जातो. ही देखील जात विषाणूजन्य रोगास प्रतिकारक्षम असल्याचे मत काही तज्ञ लोकांनी व्यक्त केले आहे. राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांनी या जातीची यशस्वी शेती फुलवली असून त्यांना याचा फायदा देखील झाला आहे. जर खरीप हंगामात टोमॅटो लागवडीचा शेतकऱ्यांचा प्लॅन असेल तर निश्चितच या वाणाची शेती देखील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. मात्र कोणत्याही जातीची निवड करताना आपल्या परिसरातील हवामानाचा आणि जमिनीच्या मगदूराप्रमाणे आणि आपल्या पीक नियोजनाप्रमाणे तज्ञांचा सल्ला घेऊन जातीची निवड करणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.

हे पण वाचा :- ब्रेकिंग ! राज्यातील ‘या’ लोकांची रेशन कार्ड होणार रद्द; 1 लाख 27 हजार शिधापत्रिका कायमच्या रद्दीत जमा होणार, कारण काय?

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe