Top 40 HP Tractor: दिवाळी सणाच्या मुहूर्तावर 40 एचपीचा ट्रॅक्टर घ्यायचा आहे का? ‘ही’ आहेत भारतातील टॉप अशी 40 HP श्रेणीतील शक्तिशाली ट्रॅक्टर

शेतीसाठी ट्रॅक्टर हे अतिशय उपयुक्त असे यंत्र असून ट्रॅक्टरच्या साह्याने शेतीची पूर्व मशागती पासून तर पीक काढणीपर्यंतची सगळी कामे केली जातात. विशेष म्हणजे शेतीमध्ये जे काही इतर महत्वाची यंत्र आहेत,त्यातील बहुतेक यंत्र ही ट्रॅक्टरचलित असल्याने ट्रॅक्टरचे महत्त्व शेतीच्या दृष्टिकोनातून अनन्यसाधारण असे आहे.

Ajay Patil
Published:
swaraj tractor

Top 40 HP Tractor:- शेतीसाठी ट्रॅक्टर हे अतिशय उपयुक्त असे यंत्र असून ट्रॅक्टरच्या साह्याने शेतीची पूर्व मशागती पासून तर पीक काढणीपर्यंतची सगळी कामे केली जातात. विशेष म्हणजे शेतीमध्ये जे काही इतर महत्वाची यंत्र आहेत,त्यातील बहुतेक यंत्र ही ट्रॅक्टरचलित असल्याने ट्रॅक्टरचे महत्त्व शेतीच्या दृष्टिकोनातून अनन्यसाधारण असे आहे.

त्यामुळे शेतकरी बंधू ट्रॅक्टर खरेदी करताना परवडणाऱ्या किमतीत पावरफुल ट्रॅक्टर मिळेल अशा पद्धतीने ट्रॅक्टरची निवड करतात. तुम्हाला देखील या सणासुदीच्या निमित्ताने शेती करिता 40 एचपी श्रेणीतील पावरफूल ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर या लेखात आपण अशाच भारतातील पावरफुल अशा 40 एचपी श्रेणीतील ट्रॅक्टरची माहिती थोडक्यात घेणार आहोत.

 ही आहेत भारतातील 40 एचपी श्रेणीतील टॉप ट्रॅक्टर

1- महिंद्रा ओजा 3140 ट्रॅक्टर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे हे एक शक्तिशाली ट्रॅक्टर असून या ट्रॅक्टरमध्ये तीन सिलेंडर इंजिन पाहायला मिळते. जे चाळीस हॉर्स पावर आणि 133 एनएम टॉर्क जनरेट करते. या ट्रॅक्टरमध्ये ड्राय टाइप एअर फिल्टर देण्यात आला असून या ट्रॅक्टरची कमाल पीटीओ पावर 34.8 एचपी आहे.

तसेच या ट्रॅक्टरचे इंजिन 2500 आरपीएम जनरेट करते. कंपनीने आपल्या या मिनी ट्रॅक्टरची हायड्रोलिक क्षमता 950 kg इतकी ठेवली असून या ट्रॅक्टरमध्ये पावर स्टेरिंग देण्यात आली आहे.

तसेच 12 फॉरवर्ड+ 12 रिव्हर्स गियरसह गीयरबॉक्स देण्यात आला आहे. हा ट्रॅक्टर चार व्हील ड्राईव्हमध्ये येतो व यामध्ये ऑइल एमर्स ब्रेक देण्यात आलेले आहेत. महिंद्रा ओजा 3140 ट्रॅक्टरची भारतीय बाजारपेठेतील एक्स शोरूम किंमत सात लाख 69 हजार ते आठ लाख दहा हजार रुपये इतकी ठेवण्यात आलेली आहे व या ट्रॅक्टरला सहा वर्षांची वॉरंटी आहे.

2- स्वराज 735 XT ट्रॅक्टर स्वराज कंपनीच्या या ट्रॅक्टरमध्ये 3307 सीसी क्षमतेचे तीन सिलेंडर इंजिन देण्यात आलेले असून जे 40 एचपी पावर जनरेट करते. तसेच स्वराज कंपनीच्या या ट्रॅक्टरमध्ये तीन स्टेज ऑइल बाथ प्रकारचे एअर फिल्टर देण्यात आले आहे.

या ट्रॅक्टरची कमाल पीटीओ पावर 33 एचपी आहे व त्याचे इंजिन 1800 आरपीएम जनरेट करते. या ट्रॅक्टरची हायड्रोलिक क्षमता 1500 kg ठेवण्यात आलेली आहे. वजन जर बघितले तर ते 1930 किलो असून हे ट्रॅक्टर 1925mm व्हील बेसमध्ये तयार करण्यात आलेले आहे.

तसेच हे ट्रॅक्टर मेकॅनिकल तसेच पावर( पर्यायी ) स्टेरिंगसह येतो आणि आठ फॉरवर्ड आणि दोन रिव्हर्स गिअर्ससह गिअर बॉक्स देण्यात आला आहे. तसेच हे दोन व्हील ड्राईव्ह असलेले ट्रॅक्टर आहे. या ट्रॅक्टरची भारतातील एक्स शोरूम किंमत पाहिली तर ती सहा लाख तीस हजार रुपये ते सहा लाख 73 हजार रुपये इतकी आहे.

3-ACE DI 350 NG ट्रॅक्टर या ट्रॅक्टरमध्ये कंपनीने 2858 सीसी क्षमतेसह तीन सिलेंडरमध्ये वॉटर कुल्ड नॅचरल ऍस्पिरिटेड डिझेल इंजिन दिले आहे. जे 40 एचपी पावर जनरेट करते. तसेच कंपनीने यामध्ये ड्राय टाइप एअर फिल्टर दिले असून या ट्रॅक्टरची कमाल पिटीओ पावर 34 एचपी आहे व त्याचे इंजिन 1800 आरपीएम जनरेट करते.

या ट्रॅक्टरची हायड्रोलिक क्षमता 1200 kg इतकी ठेवण्यात आलेली आहे व या ट्रॅक्टरमध्ये  ड्राफ्ट, पोझिशन आणि रिस्पॉन्स कंट्रोल प्रकार थ्री पॉईंट लिंकेज देण्यात आले आहे. ट्रॅक्टरचे हायड्रोलिक क्षमता १९३० किलो असून ते 1960mm व्हील बेसमध्ये तयार केले आहे.

हे ट्रॅक्टर पावर स्टेरिंग सहित व यामध्ये आठ फॉरवर्ड आणि दोन रिव्हर्स गिअरसह एक गिअरबॉक्स आहे. हे ट्रॅक्टर दोन व्हील ड्राईव्ह मध्ये येते व या ट्रॅक्टरची भारतातील एक्स शोरूम किंमत पाच लाख 55 हजार ते पाच 95 हजार रुपये पर्यंत असून या ट्रॅक्टरला दोन हजार तास किंवा दोन वर्षाची वारंटी कंपनीने दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe