Top BCA Colleges : दहावी आणि बारावी ही दोन्ही वर्ष विद्यार्थ्यांच्या करिअरच्या अनुषंगाने महत्त्वाची असतात. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या वेगवेगळ्या वाटा खुल्या होतात. बारावीनंतर बहुतांशी विद्यार्थी मेडिकल आणि इंजीनियरिंग ला ऍडमिशन घेतात. याव्यतिरिक्त असे अनेक अभ्यासक्रम आहेत ज्यात बारावीनंतर विद्यार्थी ऍडमिशन घेऊन एक चांगले करिअर घडवू शकतात.
असाच एक अभ्यासक्रम म्हणजेच बीसीए. बीसीए म्हणजेच बॅचलर ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन्स हा एक लोकप्रिय अभ्यासक्रम असून या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या खरच उल्लेखनीय आहे. दरम्यान आज आपण या अभ्यासक्रमासाठी देशातील टॉप पाच कॉलेजेस कोणती आहेत याची माहिती पाहणार आहोत.

गेल्या वर्षभरात महाविद्यालयांची शैक्षणिक कामगिरी, पायाभूत सुविधा, अध्यापन गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या निकालांमधील उल्लेखनीय प्रगती या सर्व गोष्टी विचारात घेऊन आज आपण देशातील टॉप पाच बीसीए कॉलेज कोणती आहेत याची माहिती जाणून घेऊयात.
ही आहेत देशातील टॉप 5 बीसीए कॉलेजेस
एमआयटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, आळंदी, पुणे : पुण्यातील हे प्रतिष्ठित कॉलेज बीसीए साठी बेस्ट ऑप्शन राहणार आहे. जर तुम्हाला महाराष्ट्रातून विशेषता पुण्यातून दिसण्याचे शिक्षण घ्यायचे असेल तर या कॉलेजचा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट राहील.
या कॉलेजची गेल्या वर्षभराची शैक्षणिक कामगिरी, पायाभूत सुविधा, अध्यापन गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचे निकाल समाधानकारक राहिले आहेत. म्हणूनच जर तुम्हाला या कॉलेजमध्ये बीसीए साठी ऍडमिशन मिळाले तर तुमच्या करिअर साठी ही गोष्ट फारच समाधानकारक राहणार आहे.
महाराजा सूरजमल इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली : जर तुम्हाला राष्ट्रीय राजधानी दिल्लीत बीसीएचे शिक्षण घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी महाराजा सुरजमल इन्स्टिट्यूट नवी दिल्ली हा पर्याय बेस्ट राहणार आहे. बीसीए साठी महाराजा सुरजमल इन्स्टिट्यूट एक चांगला ऑप्शन आहे, कारण की या कॉलेजची शैक्षणिक कामगिरी पायाभूत सुविधा अध्यापन गुणवत्ता इतर काही कॉलेज सोबत तुलना केली असता फारच उत्कृष्ट आढळले आहे.
माउंट कार्मेल कॉलेज (स्वायत्त), बेंगळुरू : जर तुम्हाला बेंगळुरू येथून बॅचलर ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन मधून डिग्री कम्प्लीट करायची असेल तर तुमच्यासाठी या कॉलेजचा ऑप्शन बेस्ट राहील. या कॉलेजची शैक्षणिक कामगिरी सुद्धा फारच उल्लेखनीय आहे. येथून शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना चांगल्या पॅकेजची नोकरी मिळते.
चितकारा विद्यापीठ अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था : बीसीए साठी हे देखील कॉलेज एक बेस्ट कॉलेज राहणार आहे. बारावीनंतर बीसीएला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या कॉलेजचा पर्याय फायद्याचा राहणार आहे.
एम.एस. रामय्या कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, बेंगळुरू : हे बेंगळुरूमधील आणखी एक बेस्ट कॉलेज आहे. येथून जर तुम्ही बीसीएची डिग्री घेतली तर तुमच करिअर खऱ्या अर्थाने सेट होईल असं आपण म्हणू शकतो. या कॉलेजची शैक्षणिक कामगिरी सुद्धा वाखाण्याजोगी आहे.