Top Engineering Colleges : पुण्यातील टॉपचे इंजिनिअरिंग कॉलेज कोणते? याची माहिती जाणून घ्यायची आहे का? मग आजचा हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा. आज आपण शिक्षणाचे माहेरघर म्हणून ख्यातनाम असणाऱ्या पुण्यातील टॉप पाच अभियांत्रिकी महाविद्यालयांची माहिती जाणून घेणार आहोत.
खरे तर, महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून नुकत्याच काही दिवसांपूर्वी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. पाच मे रोजी राज्य बोर्डाने बारावीचा निकाल जाहीर केला आहे. खरे तर दरवर्षी बारावीचा निकाल हा मे महिन्याच्या शेवटी जाहीर होत असतो मात्र यावर्षी मे महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच बारावीचा निकाल जाहीर झाला असून यामुळे विद्यार्थ्यांना आपले मनपसंत कॉलेज निवडण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.

दरवर्षी राज्यातील लाखो विद्यार्थी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतात. आता बारावीचा निकाल जाहीर झाला असल्याने राज्यातील अनेक विद्यार्थी इंजीनियरिंग कॉलेजच्या शोधात आहेत. त्यामुळे आज आपण पुण्यातील टॉप पाच इंजिनिअरिंग कॉलेजची माहिती जाणून घेणार आहोत.
‘ही’ आहेत पुण्यातील टॉप 5 इंजिनिअरिंग कॉलेज
विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VIT) : तुम्हालाही शिक्षणाचे माहेरघर म्हणून ख्यातनाम असणाऱ्या पुण्यात इंजिनिअरिंग करायची आहे का? मग विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच व्हीआयटी हे पुण्यातील एक प्रमुख अभियांत्रिकी महाविद्यालय तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. या महाविद्यालयाबाबत बोलायचं झालं तर हे महाविद्यालय त्याच्या शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी, आधुनिक पायाभूत सुविधांसाठी आणि शिक्षणाच्या सक्रिय दृष्टिकोनासाठी ओळखले जाते.
हे कॉलेज संशोधन, नवोपक्रम आणि उद्योग भागीदारीवर लक्ष केंद्रित करून अभियांत्रिकीमध्ये पदवीपूर्व आणि पदव्युत्तर कार्यक्रम ऑफर करत आहे. या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळते यामुळे येथून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराची नोकरी सुद्धा ऑफर होते. म्हणूनच इंजीनियरिंगसाठी तुम्ही या कॉलेजचा 100% विचार करू शकता.
आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (AIT) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे देशातील एक प्रमुख विद्यापीठ असून याच विद्यापीठाशी संलग्न असलेले AIT हे कॉलेज इंजिनिअरिंगसाठी बेस्ट आहे. जर तुम्हाला पुण्यातून इंजीनियरिंग करायचे असेल तर तुम्ही या कॉलेजचा विचार करू शकता. शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरण आणि तांत्रिक शिक्षणावर भर देण्यासाठी या कॉलेजला संपूर्ण देशभरात ओळखले जाते. या कॉलेजमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी शिक्षण घेतात राज्याबाहेरीलही अनेकजण या कॉलेजमध्ये शिक्षण घेण्याची स्वप्न पाहतात. हे कॉलेज प्रामुख्याने लष्करी कर्मचाऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षण ऑफर करत आहे.
भारती विद्यापीठ : भारती विद्यापीठ हे एक अभिमत विद्यापीठ म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. हे कॉलेज इंजीनियरिंग साठी सर्वोत्कृष्ट आहे. हे कॉलेज त्याच्या दर्जेदार शिक्षणासाठी आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या व्यापक श्रेणीसाठी ओळखले जाते. या ठिकाणी विद्यार्थ्यांना विविध कोर्सेस उपलब्ध आहेत. हे कॉलेज व्यावहारिक शिक्षण, उद्योगातील अनुभव आणि समग्र विकासावर भर देते. जर तुम्हाला पुण्यातून इंजिनिअरिंग करायची असेल तर तुम्ही भारती विद्यापीठाचा नक्कीच विचार करू शकता.
सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी : सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे पुण्यातील एक नामांकित कॉलेज आहे. पुण्यातील टॉप पाच कॉलेजमध्ये या कॉलेजचा समावेश होतो. प्रतिष्ठित सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा भाग असलेले एसआयटी हे आंतरविद्याशाखीय शिक्षण आणि उद्योग-केंद्रित कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ओळखले जाते. या कॉलेजमध्ये राज्यातील तसेच राज्याबाहेरील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, परदेशातील विद्यार्थी सुद्धा येथे शिकतात.
अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे : पुण्यात इंजीनियरिंग करण्याचे स्वप्न असेल तर अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे हे महाराष्ट्रातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे. हे देशातील तिसरे सर्वात जुने अभियांत्रिकी महाविद्यालय असून याची स्थापना 1854 मध्ये करण्यात आली होती. सीओईपी हे भारतातील सर्वात जुन्या अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी एक आहे. जे की शैक्षणिक उत्कृष्टता आणि संशोधनावर भर देण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये फारच लोकप्रिय आहे.