Top Engineering Colleges : भारतात बहुतांशी विद्यार्थी मेडिकल आणि इंजीनियरिंग चे शिक्षण घेण्याला प्राधान्य दाखवतात. आपल्या देशात इंजिनियर्स ची संख्या फारच उल्लेखनीय आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतात.
यंदाही लाखो विद्यार्थी इंजिनिअरिंगला प्रवेश घेणार आहेत. अशा परिस्थितीत आज आपण देशाच्या राष्ट्रीय राजधानीतील म्हणजेच दिल्लीतील टॉप सात इंजीनियरिंग कॉलेजची माहिती जाणून घेणार आहोत.

ही आहेत दिल्लीतील टॉप सात इंजिनिअरिंग कॉलेजेस
नेताजी सुभाष तंत्रज्ञान विद्यापीठ (एनएसयूटी) : हेदेखील राजधानी दिल्लीमधील एक प्रतिष्ठित इंजिनिअरिंग कॉलेज आहे. या कॉलेजमधून शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये पासआऊट झालेल्या बीटेक विद्यार्थ्यांना सरासरी 17 लाख रुपयांच्या पगाराची नोकरी मिळाली. येथून दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळत आहे. या कॉलेजचा प्लेसमेंट रेकॉर्ड शानदार आहे.
IIIT दिल्ली : IIIT दिल्ली हे कॉलेज राजधानी दिल्लीतील एक प्रतिष्ठित इंजिनिअरिंग कॉलेज आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 मधून या शैक्षणिक संस्थेतून पास आऊट झालेल्या 390 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली होती. येथून पास आऊट होणाऱ्या विद्यार्थ्यांना सरासरी 18.50 लाख रुपये वार्षिक पॅकेजची नोकरी मिळत आहे.
गुरु गोविंद सिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठ (GGSIPU) : GGSIPU ही दिल्लीतील एक प्रमुख शैक्षणिक संस्था आहे. या शैक्षणिक संस्थेमधून शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये 190 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली होती. येथून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना सरासरी आठ लाख रुपयांच्या पगाराची नोकरी मिळत आहे. या कॉलेजचा प्लेसमेंट रेकॉर्ड पाहता अनेक जण येथून शिक्षण घेण्यास उत्सुक आहेत.
IIT Delhi : ही देशातील एक प्रमुख शैक्षणिक संस्था आहे. ही संस्था शैक्षणिक उत्कृष्टतेमध्ये आघाडीवर आहे. हे राजधानी दिल्लीतील एक सर्वोत्कृष्ट इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून ओळखले जाते.
या कॉलेज कडून प्राप्त झालेल्या मालतीनुसार शैक्षणिक वर्ष 2022 – 23 मध्ये बी टेकडा ऍडमिशन घेतलेला 835 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 676 विद्यार्थ्यांना कॉलेज कॅम्पस मध्ये प्लेसमेंट मिळाली. महत्त्वाची बाब म्हणजे येथून प्लेसमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांना सरासरी 20 लाख रुपये पगाराची नोकरी मिळते.
जामिया मिलिया इस्लामिया : हे देखील दिल्ली मधील एक प्रमुख इंजीनियरिंग कॉलेज आहे. जर तुम्हाला या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाले तर नक्कीच तुमची लाइफ सेट होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये या कॉलेजच्या 353 विद्यार्थ्यांपैकी 292 विद्यार्थ्यांना 11 लाख रुपयांच्या सरासरी पगारासह प्लेसमेंट मिळाली होती. नक्कीच या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळाले तर त्यांचे आयुष्य सेट होईल.
दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (DTU) : दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी हे देखील राजधानी दिल्लीतील एक प्रतिष्ठित इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून ओळखले जाते. शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये या कॉलेजमधील तब्बल 1965 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली होती आणि या विद्यार्थ्यांना सरासरी 14 लाखांच्या पगाराची नोकरी मिळाली होती. म्हणजेच या कॉलेजचा प्लेसमेंट रेकॉर्ड सुद्धा फारच दमदार आहे.
एनआयटी दिल्ली : एनआयटी दिल्ली हे देखील दिल्लीमधील एक प्रतिष्ठित इंजिनिअरिंग कॉलेज असून शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये या कॉलेजमधील तब्बल 143 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली होती. तसेच या प्लेसमेंट मिळालेला विद्यार्थ्यांना सरासरी 15 लाखांचे वेतन मिळाले होते. यामुळे जर तुम्हाला दिल्लीत शिक्षण घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी एनआयटी दिल्लीचा पर्याय बेस्ट राहणार आहे.