Top MBBS Colleges : बारावी सायन्स उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी मेडिकल आणि इंजीनियरिंग ला ऍडमिशन घेतात. मेडिकल मध्ये एमबीबीएस ला ऍडमिशन घेणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. यासाठी देशातील विद्यार्थी नीट युजी परीक्षा देतात.
दरम्यान नीट यु जी 2025 चा निकाल नुकत्याच काही दिवसांपूर्वी जाहीर झाला आहे. या निकालात अनेक विद्यार्थ्यांना इच्छित रँक मिळाली आहे तर काही विद्यार्थ्यांना अपेक्षित रँक मिळालेली नसल्याने ते काहीसे नाराज झाले आहेत.

दरम्यान जर तुम्हालाही नीट युजी परीक्षेत अपेक्षित गुण मिळालेले नसतील आणि तुम्हाला एमबीबीएस करायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा पाच देशांची माहिती सांगणार आहोत जिथे तुम्ही स्वस्तात एमबीबीएस कोर्स करू शकता.
या पाच देशात स्वस्तात करता येणार एमबीबीएस
किर्गिस्तान : या देशात विद्यार्थ्यांना स्वस्तात एमबीबीएस चा कोर्स पूर्ण करता येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार या किर्गीस्तांमध्ये विद्यार्थ्यांना 15 ते 22 लाख रुपयांमध्ये एमबीबीएस चे शिक्षण घेता येते.
रशिया : एमबीबीएस करायचे असेल तर तुमच्यासाठी रशियाचा ऑप्शन बेस्ट ठरणार आहे. सर्वात कमी खर्चात रशियामध्ये एमबीबीएस चा कोर्स करता येऊ शकतो. मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवायचे झाले तर रशियात एमबीबीएस कोर्सची एकूण फी सुमारे 18 ते 35 लाख रुपये एवढी आहे.
पण, रशियामध्ये एमबीबीएस चा कोर्स हा सहा वर्षांचा असतो. येथील ओरेनबर्ग स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये पहिल्या वर्षाची फी फक्त 3.40 लाख रुपये इतकी आहे.
फिलीपिन्स : या देशातून एमबीबीएस केल्यास विद्यार्थ्यांना नक्कीच चांगला लाभ मिळणार असून त्यांचे करिअर खऱ्या अर्थाने सेट होणार आहे. येथून एमबीबीएस करायचे झाल्यास वीस ते तीस लाख रुपये इतका खर्च करावा लागू शकतो.
चीन : या यादीत चीनचा सुद्धा नंबर लागतो. चीनमध्ये देखील विद्यार्थ्यांना कमी खर्चात एमबीबीएस चा कोर्स करता येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार चीनमध्ये एमबीबीएस चा कोर्स सहा वर्षांचा असतो. इथून एमबीबीएस करण्यासाठी 15 ते 35 लाखांचा खर्च येऊ शकतो.
कझाकस्तान : या देशातही स्वस्तात एमबीबीएस चा कोर्स पूर्ण करता येईल. मीडिया रिपोर्टनुसार 18 ते 25 लाख रुपयांच्या खर्चात येथून एमबीबीएस चे शिक्षण घेता येणार आहेत.