Tourist News:- वेगवेगळ्या डेस्टिनेशन बघण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तींसाठी अनेक टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून आकर्षक पॅकेजवर पर्यटनासाठी संधी उपलब्ध करून देण्यात येते व तशी ती संधी आयआरसीटीसीच्या माध्यमातून देखील उपलब्ध करून देण्यात येते. अशा पॅकेजच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेटी देऊ शकतात व तेही परवडणाऱ्या दरामध्ये.
परंतु भारता व्यतिरिक्त जर तुम्हाला इतर देशांमध्ये जाऊन पर्यटन करण्याची इच्छा असेल तर याकरिता देखील अनेक ट्रॅव्हल्स कंपन्या किंवा आयआरसीटीसीच्या माध्यमातून आकर्षक आणि परवडणारे पॅकेज दिले जातात व यातून पर्यटनाची संधी पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिली जाते. सध्या आयआरसीटीसी भारत गौरव ट्रेन च्या माध्यमातून अशा पर्यटनाच्या अनेक संधी निर्माण करून देत असून अशीच एक पर्यटनाचे सुवर्णसंधी हिमालयाच्या कुशीत वसलेल्या भूतान या देशात पर्यटनासाठी उपलब्ध करून दिलेली आहे.
भुतानला फिरण्याची आहे सुवर्णसंधी
हिमालयाच्या पर्वतराजी मध्ये वसलेला भूतान हा त्याच्या निसर्गसौंदर्यांसाठी खूप प्रसिद्ध असा देश आहे. अनेक हौशी पर्यटक भुतानला फिरायला जातात. हिवाळ्यामध्ये जास्त करून हा देश फिरण्याला पसंती दिली जाते. याच दृष्टिकोनातून आता आयआरसीटीसीच्या माध्यमातून एक आकर्षक पॅकेज भूतान फिरायला जाण्यासाठी आणण्यात आले असून हे एक इंटरनॅशनल पॅकेज आहे.
या पर्यटनामध्ये तुम्ही भूतान या देशातील प्रसिद्ध असलेले पुनाखा आणि पारो तसेच थिंपू या जगप्रसिद्ध ठिकाणांना भेट देता येणार आहे. या पॅकेज मध्ये तुम्हाला आठ दिवस व सात रात्री भूतान या ठिकाणी फिरता येणार असून या पॅकेजमध्ये तुम्हाला दुपारचे जेवण तसेच सकाळचा नाश्ता व रात्रीचे जेवण या सुविधा देखील मिळणार आहेत. तसेच या ठिकाणी असलेल्या अनेक ऐतिहासिक स्थळ पाहण्याचे देखील तुम्हाला सुवर्णसंधी मिळणार असून उत्तम पॅकेज ठरणार आहे.
किती आहेत तिकीट दर?
या अंतर्गत सर्व प्रकारची तिकिटे उपलब्ध करून देण्यात आली असून तुम्हाला या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी राहण्यासाठी हॉटेलची सुविधा देखील या पॅकेजमध्ये देण्यात आलेली आहे. तसेच ट्रेनच्या माध्यमातून तुम्हाला जाताना आणि येताना जेवणाची सुविधा देखील मिळणार आहे. जर तुम्हाला या पॅकेजेचा लाभ घ्यायचा असेल तर 71369 रुपये एका व्यक्तीसाठी मोजावे लागणार आहेत.
दोन व्यक्तींकरिता 51 हजार 839 रुपये प्रति व्यक्ती तिकीट असणार आहे. तसेच तीन व्यक्ती असतील दर 50 हजार 274 प्रति व्यक्ती एवढे तिकीट दर असणार आहे. या प्रवासाची किंवा ट्रीपची सुरुवात ही आगरताळा रेल्वे स्टेशन वरून होणार असून कांचनजंगा एक्सप्रेसने संपूर्ण रात्र प्रवास करता येणार असून अंतर कुचबिहार रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचेल.
त्यानंतर या ठिकाणहून भुतानचा प्रवास सुरू होईल. या पॅकेजेच्या माध्यमातून तुम्हाला सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत व काही अतिरिक्त सुविधा लागत असतील तर त्या देखील तुम्हाला मिळतील. त्यामुळे या हिवाळ्यात तुमचा जर एखाद्या विदेश फिरण्याची इच्छा असेल तर तुम्ही या पॅकेजेच्या माध्यमातून भूतानला भेट देऊ शकता.