Tourist Place: मित्रांसोबत ट्रीप प्लान करा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला भेट द्या! ‘ही’ पर्यटनस्थळे देतील तुम्हाला मानसिक शांतता

Ajay Patil
Published:
elora caves

Tourist Place:- महाराष्ट्र म्हटले म्हणजे तुम्हाला अनेक प्रकारची पर्यटन स्थळे या ठिकाणी बघायला मिळतात व यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात आपल्याला अशा निसर्गाने समृद्ध असलेल्या पर्यटन स्थळाचे दर्शन होते. अगदी याचप्रमाणे जर आपण पहिले तर छत्रपती संभाजी नगर जिल्हा हा पर्यटनाच्या बाबतीत खूपच अग्रेसर असून संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे.

छत्रपती संभाजी नगर मधील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी देशातीलच नव्हे तर विदेशातील अनेक पर्यटक दरवर्षी लाखोच्या संख्येने भेट देतात.त्यामुळे या पावसाळ्यात तुम्हाला देखील फिरायला जायचा प्लान बनवायचा असेल तर तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना भेट देऊ शकतात.

 छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील ही पर्यटनस्थळे आहेत उत्तम

1- अजिंठा आणि वेरूळच्या लेण्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा आणि वेरूळ या ठिकाणी असलेल्या लेण्या या जगप्रसिद्ध आहेत व लोकप्रिय पर्यटन स्थळ देखील आहेत. या ठिकाणी तुम्ही औरंगाबाद शहरातून बस किंवा टॅक्सीने देखील जाऊ शकतात. यापैकी अजंठा लेण्या या 30 कातळांमध्ये कोरलेल्या असून बौद्ध कालीन वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहेत.

अजिंठ्याच्या लेण्या या इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात घडविण्यात आल्या व वेरूळच्या लेण्या कातळात कोरलेले असून 34 हिंदू, बौद्ध व जैन देवालयांचा संगम या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतो. या लेण्यांची निर्मिती इसवीसन पूर्व सहाव्या शतकात करण्यात आली.तुम्हाला जर छत्रपती संभाजीनगर येथून जायचे असेल तर 45 मिनिटे वेरूळ लेण्यांना पोहोचण्यासाठी लागतो.

2- दौलताबाद किल्ला या किल्ल्याला देवगिरी किल्ला म्हणून देखील ओळखले जाते. समुद्रसपाटीपासून 200 मीटर अंतरावर असलेला हा किल्ला 200 मीटर उंच शंकाकृती पर्वतावर आहे. या किल्ल्याचे बांधकाम 12 व्या शतकात करण्यात आलेले आहे

व हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. दौलताबाद किल्ला हा साधारणपणे छत्रपती संभाजीनगर पासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्याला भेट द्यायची असेल तर सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेत भेट देता येणे शक्य आहे.

3- पितळखोरा लेणी या लेण्या भारतामधील बौद्धकालीन वास्तू शिल्पाचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखले जातात. या लेण्यांची स्थापना इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात झाली होती. बेसॉल्ट दगडामध्ये या लेण्यांचे बांधकाम करण्यात आलेले आहे व हवामानाच्या दृष्टीने अतिसंवेदनक्षम भाग म्हणून याला ओळखले जाते. वेरूळ लेण्यांपासून या 40 किलोमीटर तर छत्रपती संभाजीनगर पासून 80 किलोमीटर अंतरावर आहेत.

4- शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय या वस्तू संग्रहालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विविध छायाचित्र आणि दिमाखदार नमुना चित्र तुम्हाला बघायला मिळतात. शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयामध्ये सहा प्रदर्शन दालने असून त्यामध्ये शिवकालीन शस्त्रास्त्रे आणि इतर युद्ध साहित्य तुम्हाला बघायला मिळते.

साधारणपणे प्रौढ व्यक्तींसाठी इथे शंभर रुपये प्रवेश शुल्क असून लहान मुलांकरिता तीस रुपये द्यावे लागतात. या ठिकाणी तुम्हाला भेट द्यायचे असेल तर कोणत्याही दिवशी सकाळी 11 ते संध्याकाळी सात या वेळेत प्रवेश देण्यात येतो.

5- गोगा बाबा टेकडी भटकंती करणारे जे काही जोडपे असतात त्यांच्यामध्ये गोगाबाबा टेकडी खूप पसंतीची जागा आहे. या ठिकाणाहून तुम्ही संपूर्ण छत्रपती संभाजी नगर शहराचा नजारा डोळ्यांमध्ये सामावू शकतात. ट्रेकर्स करता देखील हे एक उत्तम ठिकाण आहे. या ठिकाणी असलेले थंड हवा खूप मनाला शांतता देते व या ठिकाणी गोगाबाबा टेकडीवर लहानसे समाधी स्थळ यामध्ये तुम्हाला मानसिक शांतता देते.

6- सूनहरी महल या महालामध्ये दोन मजले असून अतिशय आलिशान अशा भारतीय वास्तुशिल्पाचा असल नमुना या महलला मानले जाते. या ठिकाणी तुम्ही भेट दिली नाही तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची सफर पूर्ण होतच नाही.

जेव्हा तुम्ही या ठिकाणी जाल तेव्हा याच्या प्रवेशद्वाराजवळ सुंदर तयार करण्यात आलेले बगीचे आणि ताटवे तुमचे मन वेधून घेतात. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन पासून हे स्थळ चार ते सहा किलोमीटरवर आहे. या ठिकाणी संध्याकाळी सात ते रात्री अकरा या वेळेत अनेक कार्यक्रम होतात.

7- सिद्धार्थ गार्डन आणि प्राणी संग्रहालय सिद्धार्थ गार्डन हे छत्रपती संभाजी नगर रेल्वे स्टेशन पासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी जर तुम्ही भेट दिली तर तुम्हाला अनेक प्रकारचे वन्य प्राणी आणि सरपटणारे प्राणी बघायला मिळतात व यामध्ये मगर, तरस, वाघ, सिंह, साप तसेच कोल्हे व इतर प्राण्यांचा समावेश आहे. या ठिकाणी आठवड्याच्या शेवटी आणि संध्याकाळी खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe