Tourist Place In Konkan:- उन्हाळ्याच्या कडक उष्णतेचा त्रास सहन करून आपण जेव्हा आतुरतेने पावसाची वाट पाहत असतो व ही वाट पाहत असताना जून महिन्याची सुरुवात होते व रिमझिम स्वरूपात बरसणारा पाऊस हजेरी लावतो आणि या पावसाच्या सुरुवातीलाच काही दिवसांनी अवघी सृष्टी हिरवाईने नटायला लागते व हळूहळू सर्व सृष्टी हिरवाईची चादर पांघरून जणूकाही पृथ्वीवर एक स्वर्गच निर्माण झाल्याची स्थिती तयार करते.
साहजिकच अशा या अल्हाददायी वातावरणामध्ये बऱ्याच जणांची पावले निसर्गाच्या सानिध्याकडे वळतात व महाराष्ट्रातील अशी अनेक निसर्गाने समृद्ध असलेले ठिकाणांना बरेच जण भेट देतात. पर्यटन स्थळांच्या दृष्टीने जर आपण महाराष्ट्र पाहिला तर हा खूप महत्त्वाचा असून या ठिकाणी अनेक पर्यटन स्थळे आहेत.
परंतु त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील कोकण हा भाग निसर्गसौंदर्याने भरलेला असून या ठिकाणी बरेच असे पर्यटन स्थळे आहेत ज्यांना निसर्गाने सढळ हाताने भेट दिली आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
अगदी तुमचा देखील या पावसाळ्यामध्ये कुठे फिरायला जायचं प्लॅन असेल तर तुम्ही लोणावळा आणि खंडाळा किंवा इतर तेच तेच पर्यटन स्थळांना जाण्यापेक्षा कोकणातील राजापूर या ठिकाणची निवड करू शकतात. हे ठिकाण निसर्गाने भरलेले असे ठिकाण असून ठिकाणी तुम्हाला अनेक सुंदर सुंदर ठिकाणे पाहायला मिळतात.
या पावसाळ्यात फिरा कोकणातील राजापूर
पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्र मध्ये जे काही सुंदर पर्यटन स्थळे उपलब्ध आहेत यामध्ये कोकणातील राजापूर हे देखील कमी नाही. अरबी समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर वसलेल्या या ठिकाणी अनेक पर्यटक दरवर्षी भेट देतात.
राजापूरला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर सगळ्यात अगोदर तुमच्यासमोर गंगा धबधबा आहे नाव पहिल्यांदा येते. गंगा धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा लहान मोठे पर्वत आणि घनदाट जंगलांमध्ये असून या धबधब्याचे पाणी तीस फुटांपेक्षा जास्त उंचीवरून पडते. जुलै आणि ऑगस्टमध्ये या ठिकाणी सर्वात जास्त गर्दी होते.
अर्जुन नदीचा पूल आहे पाहण्यासारखा
राजापूरमध्ये अर्जुन नावाची नदी वाहते व या नदीचे पावसाळ्यामध्ये अतिशय लोभस असे दृश्य असते. या ठिकाणी थांबून जर तुम्ही निसर्गाचे अप्रतिम दृश्य पाहिले तर मनाला खूप शांतता लाभते. हा पूल राष्ट्रीय महामार्ग 66 पासून थोड्या अंतरावर आहे व तुम्ही जर मुंबई ते गोवा बाय रोड जात असाल तर या ठिकाणी थांबून या पुलावरून निसर्गाचे दर्शन घेऊ शकतात.
धूतपापेश्वर मंदिर आहे अतिशय पवित्र
धूत पापेश्वर मंदिर हे राजापूर आणि महाराष्ट्रातील एक अतिशय पवित्र आणि लोकप्रिय असे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे डोंगराच्या अगदी मध्यभागी वसलेले असून त्याच्या आजूबाजूला नैसर्गिक अद्भुत असे दृश्य पाहायला मिळतात.
या मंदिराच्या एका बाजूला जंगल आहे तर मध्यभागी मंदिर आहे व दुसऱ्या बाजूला एक सुंदर धबधबा कोसळतो. तुम्ही जर या ठिकाणी जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये फिरायला गेला तर रिमझिम पावसात तुम्हाला निसर्गाचे दर्शन घेता येते.
राजापूरचा पीन पॉईंट आहे महत्त्वाचा
राजापूरला गेल्यानंतर त्या ठिकाणचा राजापूर पिन पॉइंट हे पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. या ठिकाणाहून तुम्ही राजापूर शहराचे सौंदर्य सहजतेने पाहू शकतात राजापूरची नैसर्गिक हिरवळ तुम्हाला या पॉईंटवरून बघता येते. फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी हा पॉईंट एक अविस्मरणीय असे अनेक क्षण उपलब्ध करून देतो.