Tourist Place: पावसाळ्यामध्ये फिरण्यासाठी ‘या’ कारणांमुळे महाबळेश्वर ठरते उत्तम! महाबळेश्वरचे निसर्गसौंदर्य म्हणजे जणू पृथ्वीवरचा स्वर्गच

Ajay Patil
Published:
venna pond mahabaleshwar

Tourist Place:- महाराष्ट्र मध्ये प्रामुख्याने जर पाहिले तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टी हा परिसराला निसर्गाने भरभरून दिलेले महाराष्ट्रातील एक सुंदर परिसर आहे व या भागांमध्ये महाराष्ट्रातील अनेक पर्यटन स्थळे असल्याचे आपल्याला दिसून येते. महाराष्ट्रामध्ये लोणावळा खंडाळा तसेच माथेरान,महाबळेश्वर तसेच परिसरात असलेले अनेक गड किल्ले हे महाराष्ट्राचे खरे वैभव आहे.

या परिसरामध्ये जर पावसाळ्याच्या कालावधीमध्ये भेट दिली तर आपल्याला निसर्गाचे भव्य दिव्य असे स्वरूप पाहायला मिळते व दररोजच्या धकाधकीचे जीवन आणि गोंगाटापासून आपल्याला काही काळ निवांत आणि शांतपणे घालवता येतो. यामध्ये जर तुमचा देखील पावसाळ्याच्या कालावधीमध्ये कुठे फिरायला जायचा प्लान असेल तर तुम्ही महाबळेश्वरला भेट देऊ शकता. खरे निसर्गाचे सौंदर्य आणि वैभव तुम्हाला पाहायचे असेल तर महाबळेश्वर खूप उत्तम ठरते.

 या कारणामुळे तुम्हाला महाबळेश्वर पावसाळ्याच्या पर्यटनासाठी उत्तम ठरते

1- जर तुम्ही पावसाळ्याच्या कालावधीमध्ये महाबळेश्वरला गेले तर तुम्हाला या ठिकाणी खडाळून वाहणारे धबधबे पाहायला मिळतात व पर्यटकांच्या माध्यमातून या ठिकाणी धबधबे पाहायला खूप मोठी पसंती दिली जाते. पावसाळ्यामध्ये महाबळेश्वरला तुम्ही लिंगमाला तसेच धोबी व वजराई ही धबधबे पाहू शकतात. यामधील वजराई हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच धबधबा असून पर्यटक या ठिकाणी या धबधब्याचा मनमुराद आनंद लुटतात.

2- तसेच पावसाळ्याच्या कालावधीमध्ये महाबळेश्वरच्या वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणावर मनाला सुखद असा गारवा तुम्हाला अनुभवायला मिळतो. तसेच डोंगरावरून दिसणारा इंद्रधनुष्य आणि धुक्यामध्ये हरवलेले महाबळेश्वरचे सौंदर्य प्रत्येकाने तरी एकदा अनुभवने गरजेचे आहे.

3- या ठिकाणी असलेला वेण्णा तलाव महाबळेश्वरला भेट देण्यासाठी खूप महत्त्वाचे ठिकाण असून या ठिकाणी येणारे पर्यटक हे कायम या तलावाला भेट देतात. यांना तलावाच्या स्वच्छ पाण्यामध्ये तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकतात.

4- तसेच महाबळेश्वरला पावसाळ्यामध्ये जर तुम्ही गेलात तर या ठिकाणी हिरवीगार हिरवाई तुम्हाला पाहायला मिळते व जणू काही हिरवा शालू डोंगरांनी पांघरला आहे असे वाटते. या ठिकाणी माणसांची वर्दळ खूप कमी असते व त्यामुळे तुम्हाला सिनेमाच्या शूटिंग किंवा फोटोग्राफी करिता हे ठिकाण उत्तम ठरते.

5- महाबळेश्वरला गेल्यानंतर त्या ठिकाणची स्ट्रॉबेरी म्हणजेच महाबळेश्वरची एक खास ओळख आहे. जर तुम्हाला स्ट्रॉबेरी खायला आवडत असेल तर पावसाळ्यामध्ये या ठिकाणी भेट देऊन तुम्ही स्ट्रॉबेरी खाण्याचा मनमुराद आनंद घेऊ शकता.

6- तसेच महाबळेश्वरचे सगळ्यात महत्त्वाचे एक ठिकाण म्हणजे त्या ठिकाणी असलेले मसाई पठार हे होय. मसाई पठार हे पर्यटकांचे खास आकर्षणाचे ठिकाण असून  या ठिकाणी असलेले विस्तीर्ण पसरलेले आभाळ आणि विविध प्रकारच्या रानफुलांनी सजलेले मसाई पठार हे जणू काही महाबळेश्वरचे स्वर्गच आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

7- तर तुम्हाला ट्रेकिंग करायची हौस असेल किंवा ट्रेकिंग करायचा छंद असेल तर तुमच्याकरिता महाबळेश्वर एक उत्तम ठिकाण आहे. तसेच पावसाळ्यामध्ये तुम्ही मनसोक्त भिजत पावसाळ्यामध्ये भजी खाण्याची व चहा पिण्याची मजा काही औरच असते.

या कारणांमुळे महाबळेश्वर हे  पावसाळ्यामध्ये फिरण्याकरिता उत्तम ठिकाण ठरते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe