Traffic Challan मेसेज आला! फसवणूक करणाऱ्यांची नवीन चाल,तुमचही होऊ शकत नुकसान

जर तुम्हालाही वाहतूक नियम मोडल्याबद्दल ऑनलाइन ट्रॅफिक चलन मिळाल्याचा मेसेज आला असेल तर लगेचच घाईगडबडीने पैसे भरू नका. सध्या सायबर गुन्हेगार नवीन पद्धतीने लोकांना गंडवत आहेत.ज्यामुळे लोकांचे बँक खाते काही सेकंदांतच रिकामे होत आहे. बेंगळुरूमध्ये नुकतीच अशी एक घटना घडली जिथे एका व्यक्तीला 70000 रुपयांचा फटका बसला.

Ratnakar Ashok Patil
Published:

Traffic Challan Scam:- जर तुम्हालाही वाहतूक नियम मोडल्याबद्दल ऑनलाइन ट्रॅफिक चलन मिळाल्याचा मेसेज आला असेल तर लगेचच घाईगडबडीने पैसे भरू नका. सध्या सायबर गुन्हेगार नवीन पद्धतीने लोकांना गंडवत आहेत.ज्यामुळे लोकांचे बँक खाते काही सेकंदांतच रिकामे होत आहे. बेंगळुरूमध्ये नुकतीच अशी एक घटना घडली जिथे एका व्यक्तीला 70000 रुपयांचा फटका बसला.

ट्रॅफिक चलन घोटाळा कसा केला जातो?

सायबर गुन्हेगार तुमच्या नंबरवर व्हॉट्सअॅप किंवा एसएमएसद्वारे एक संदेश पाठवतात. ज्यामध्ये लिहिले असते की, “तुमच्या गाडीने वाहतूक नियम मोडले आहेत, त्यामुळे तुम्हाला चलन भरावे लागेल.” या मेसेजबरोबर एक फसवे लिंक दिलेले असते. जेव्हा तुम्ही त्या लिंकवर क्लिक करता तेव्हा तुमच्या फोनमध्ये एक धोकादायक अॅप डाउनलोड होते.

एकदा का हे अॅप इन्स्टॉल झाले की, हॅकर्सना तुमच्या फोनचा पूर्ण अॅक्सेस मिळतो. तुमच्या बँक खात्याची माहिती, ओटीपी आणि पासवर्ड सहजपणे मिळवले जातात. यानंतर काही मिनिटांतच तुमच्या खात्यातील रक्कम गायब होते.

बेंगळुरूमध्ये 70000 रुपयांची फसवणूक

बेंगळुरूमधील हरीकृष्णन नावाच्या व्यक्तीला व्हॉट्सअॅपवर एक ट्रॅफिक चलन मेसेज आला. त्या मेसेजमध्ये एक फेक लिंक होती. जी अधिकृत सरकारी पोर्टलसारखी दिसत होती. जेव्हा त्यांनी त्या लिंकवर क्लिक करून अॅप डाउनलोड केले तेव्हा काही वेळाने त्यांना त्यांच्या बँक खात्यातून 70000 हजार रुपयांचे व्यवहार त्यांना मेसेज आला.

गंभीर गोष्ट म्हणजे, त्यांना कुठलाही OTP टाकावा लागला नाही. फक्त अॅप डाउनलोड करून त्याने दिलेल्या परवानग्या Allow केल्या आणि त्यांच्या खात्यातील पैसे गायब झाले.फसवणूक करणाऱ्यांनी त्यांच्या पत्नीच्या खात्यातही घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला.पण वेळेत सावध झाल्यामुळे ते रोखले गेले.

अशा फसवणुकीपासून स्वतःला आणि कुटुंबीयांना कसे वाचवायचे?
ऑनलाइन ट्रॅफिक चलन भरायचे असेल तर नेहमी अधिकृत सरकारी पोर्टलवरच जा. व्हॉट्सअॅप किंवा एसएमएसद्वारे आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका.

कधीही अनोळखी अॅप डाउनलोड करू नका जरी ते सरकारी किंवा पोलिसांकडून आलेले वाटत असले तरीही बँक खात्यासंबंधित कोणतीही माहिती कोणाबरोबरही शेअर करू नका. जर तुमच्यासोबत फसवणूक झाली असेल तर त्वरित 1930 हेल्पलाइन नंबरवर किंवा सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार करा.

सावधान राहा

सध्या सायबर गुन्हेगार अत्यंत हुशारीने लोकांना गंडवत आहेत. म्हणूनच कुठलाही संशयास्पद मेसेज आला की त्यावर लगेच विश्वास ठेवू नका. सरकार आणि ट्रॅफिक पोलिस कधीही व्हॉट्सअॅप किंवा एसएमएसद्वारे ट्रॅफिक चलन भरण्यासाठी लिंक पाठवत नाहीत. त्यामुळे अधिकृत वेबसाईटशिवाय कुठेही चलन भरू नका आणि आपली मेहनतीची कमाई वाचवा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe