होंडा एक्टिवाचा खेळ खल्लास! टीव्हीएसची ‘ही’ स्कूटर बाजारात करणार मोठी धमाल, वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

भारतीय दुचाकी बाजारपेठेमध्ये अनेक महत्त्वाची वैशिष्ट्ये असलेल्या बाईक असून यामध्ये स्कूटरचा देखील मोठ्या प्रमाणे समावेश आहे. जर आपण स्कूटर उत्पादक कंपनीच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये होंडा आणि टीव्हीएस या दोन कंपनीच्या स्कूटर मोठ्या प्रमाणावर विकल्या जातात व ग्राहकांमध्ये देखील या कंपन्यांच्या स्कूटर्सना मोठ्या प्रमाणावर पसंती आहे.

उदाहरणच घ्यायचं झाले तर होंडाची ऍक्टिवा ग्राहकांमध्ये अतिशय पसंतीची स्कूटर असून या स्कूटरची विक्री देखील मोठ्या प्रमाणावर होते. अगदी याच प्रकारे देशातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी टीव्हीएस मोटरच्या माध्यमातून उत्पादित करण्यात आलेली ज्युपिटर देखील सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे

व हीच जुपिटर आता नवीन अवतारात लॉन्च करण्याची पूर्ण तयारी टीव्हीएसच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे ही नवीन अपडेट केलेली नवीन टीव्हीएस ज्युपिटर ही स्कूटर 22 ऑगस्ट रोजी लॉज होणार असल्याची माहिती देखील कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.

 टीव्हीएस करणार नवीन ज्युपिटर लॉन्च

याबाबत सविस्तर वृत्त असे की, टीव्हीएस कंपनीच्या माध्यमातून नवीन ज्युपिटर 22 ऑगस्ट रोजी लॉन्च होणार असल्याची माहिती कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली असून मिळालेल्या माहितीनुसार ही स्कूटर नवीन डिझाईन आणि नवीन फीचर्स सह जुपिटर 110 लॉन्च करणार आहे व या स्कूटरची थेट स्पर्धा ही होंडा एक्टिवा या स्कूटरशी होणार हे मात्र निश्चित.

या नवीन जुपिटरमध्ये अनेक नवनवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत व यामध्ये  स्कूटरचा फ्रंट लूक अतिशय आकर्षक बनवण्यात आला असून यामध्ये एक नवीन एलईडी हेडलाईट देण्यात आला आहे तर मागच्या बाजूला नवीन एलईडी टेडलाईट देखील देण्यात आलेला आहे.

तसेच या नवीन टीव्हीएस ज्युपिटरमध्ये एक लांब आणि मऊ अशी आरामदायी सीट  असण्याची शक्यता असून ते लांब अंतराच्या प्रवासात आरामदायी ठरणार आहे.

या स्कूटरमध्ये एलसीडी डिस्प्ले देण्यात आला असून जो ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीने सज्ज असणार आहे. तसेच यामध्ये नेव्हिगेशनची सुविधा देखील मिळणार आहे. यामध्ये कॉम्बी ब्रेक देण्यात आली असून ड्रम ब्रेक देण्यात आलेले आहेत व टायर हे 21/13 इंचाचे आहेत.

 कसे असणार नवीन ज्युपिटरचे इंजिन आणि पावर?

टीव्हीएसच्या माध्यमातून या नवीन ज्युपिटरच्या इंजिनला 109.7CC इंजिन देण्यात आले असून जे 7.4 बीएचपी आणि 8.4nm टॉर्क जनरेट करते.

तसेच हे इंजिन सीव्हीटी गिअरबॉक्सने सुसज्ज आहे व ते व्यवस्थित अपडेट केले जाणार असून जेणेकरून ते चांगले मायलेज देईलच परंतु परफॉर्मन्स देखील चांगला देईल. ही स्कूटर इको आणि पावर मोड सोबत येते. विशेष म्हणजे टीव्हीएसने या नवीन ज्युपिटर स्कूटरवर तब्बल 17 कलर पर्याय दिलेले आहेत.

 किती असणार टीव्हीएस नवीन ज्युपिटरची किंमत?

टीव्हीएस ज्युपिटर 110 ची किंमत साधारणपणे 73 हजार रुपयांपासून सुरू होते. परंतु टीव्हीएसच्या माध्यमातून लॉन्च होऊ घातलेली या नवीन स्कूटरची किंमत आधीच्या स्कूटरपेक्षा पाच हजार रुपयांनी वाढू शकते असे बोलले जात आहे.