Google Maps Traffic Features:- जेव्हा आपण कुठे जाण्यासाठी कारने प्रवास करत असतो तेव्हा आपल्याला वाहतुकीचे नियम पाळूनच तो प्रवास करणे खूप गरजेचे असते व हे स्वतःसाठी आणि दुसऱ्यासाठी देखील फायद्याचे ठरते. आपल्याकडून जर सीटबेल्ट न लावणे किंवा स्पीड लिमिट पेक्षा जास्त वेगाने वाहन चालवणे किंवा आवश्यक ती कागदपत्र तुमच्याकडे नसणे इत्यादी कारणामुळे वाहतूक पोलीस तुम्हाला अडवतात
तेव्हा तुम्ही वाहतुकीचे नियम पाळताना जर दिसून आले नाही तर मात्र तुम्हाला चलन भरणे गरजेचे असते. कधी कधी आपल्या स्वतःच्या हातून नकळत चुका घडून देखील चलन भरावे लागते व आपल्याला आर्थिक फटका बसतो.

परंतु जर तुम्हाला या सगळ्या समस्येपासून वाचायचे असेल व चलन भरायचे नसेल तर तुम्ही गुगल मॅप्स चा वापर करू शकतात. हे एप्लीकेशन सगळ्यांना माहिती असून यातील काही फीचर्स तुम्हाला चलन भरण्यापासून वाचवू शकतात.
ही फीचर्स वापरा आणि स्वतःला चलन भरण्यापासून वाचवा
1- स्पीड लिमिट वार्निंग- बऱ्याचदा आपण एखाद्या महामार्गावरून प्रवास करत असताना त्या ठिकाणी वेग मर्यादा दिलेली असते. परंतु बऱ्याचदा वाहन चालवत असताना आपण दिलेला वेग लिमिट पार करतो व जास्त वेगाने गाडी चालवत असतो.
अशावेळी तुम्हाला स्पीड लिमिट वार्निंग हे फीचर खूप कामाला येऊ शकते. हे फीचर्स तुमच्या कारचा स्पीड ट्रॅक करते आणि तुम्ही जर स्पीड लिमिट पेक्षा जास्त वेगात गाडी चालवत असाल तर तुम्हाला तशी वार्निंग देते. म्हणजे तुम्ही स्पीड नियंत्रणात आणून चलन भरण्यापासून वाचू शकतात.
2- स्पीड कॅमेरा अलर्ट- बऱ्याच महामार्गांवर स्पीड कॅमेरे लावलेले असतात. या कॅमेराच्या माध्यमातून स्पीड लिमिटच्या बाहेर एखादे वाहन वेगात जात असेल तर ते ट्रॅक केले जाते व अशाप्रकारे तुम्हाला वेग लिमिट मोडल्याबद्दल चलन भरावे लागू शकते.
परंतु स्पीड कॅमेरा अलर्ट हे फीचर तुम्हाला मार्गावरील येणाऱ्या स्पीड कॅमेरा बद्दलची माहिती देत असते. अशाप्रकारे मार्गावर असलेल्या स्पीड कॅमेऱ्यांपासून तुम्ही वाचू शकतात.
3- ट्रॅफिक अलर्ट- हे फीचर देखील गुगल मॅप्स मधील एक महत्त्वाचे असून तुम्ही प्रवास करत असताना रस्त्यावर असणारी वाहतूक कोंडी किंवा इतर अडथळ्यांची माहिती तुम्हाला अगोदरच मिळते. अगोदर अशा प्रकारची माहिती तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकण्यापासून स्वतःला वाचवू शकतात व वेळेत इच्छित स्थळी पोहोचू शकतात.
हे फीचर्स कसे कराल ऍक्टिव्हेट?
तुम्हाला जर हे फीचर्स ऍक्टिव्हेट करायचे असतील तर त्याकरिता तुम्हाला तुमच्या गुगल मॅप्स एप्लीकेशन मधील सेटिंगमध्ये जावे लागते व त्या ठिकाणी असलेल्या नेवीगेशन टॅबवर जावे लागेल आणि या ठिकाणी असलेला ड्रायव्हिंग पर्याय निवडावा लागेल.
हे फीचर्स ऍक्टिव्हेट करण्यासाठी तुम्हाला टॉगल स्विच मात्र चालू करावा लागेल. अशाप्रकारे तुम्ही हे फीचर्स वापरून स्वतःला चलन कापण्यापासून वाचवू शकतात आणि सुरक्षितपणे वाहन देखील चालवू शकतात.